मिरा-भाईंदरमध्ये स्वयं पुनर्विकासाला चालना:5 इमारतींचा प्रायोगिक प्रकल्प सुरू करण्याचे दरेकरांचे आवाहन
विकासकांकडून प्रकल्प रखडण्याच्या समस्येवर स्वयं पुनर्विकास हा प्रभावी पर्याय ठरू शकतो. मिरा-भाईंदरच्या विकासाला स्वयं पुनर्विकासाची चळवळ दिशादर्शक ठरेल, असा विश्वास महाराष्ट्र गृहनिर्माण स्वयं/समूह पुनर्विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष आणि भाजपा गटनेते आमदार प्रवीण दरेकर यांनी व्यक्त केला. मिरा-भाईंदरमध्ये स्वयं पुनर्विकासाला चालना देण्यासाठी आमदार नरेंद्र मेहता यांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आलेल्या शिबिरात ते बोलत होते. आमदार दरेकर यांनी…