"अहिल्यानगर प्रीमियर चॅम्पियनशिप'चे शिवाजीयन्स संघाने पटकावले जेतेपद:अटीतटीच्या अंतिम सामन्यात सुमन एंटरप्रायझेसचा 2-1 ने पराभव
नमोह फुटबॉल क्लबच्या वतीने आयोजित ‘अहिल्यानगर प्रीमियर चॅम्पियनशिप २०२६’ या फुटबॉल स्पर्धेचा उत्साहात समारोप झाला. अशोकभाऊ फिरोदिया हायस्कूलच्या मैदानावर पार पडलेल्या या स्पर्धेत शहरातील १८ संघांनी सहभाग नोंदवून फुटबॉलप्रेमींना खिळवून ठेवणाऱ्या अटीतटीच्या सामन्यांचा थरार अनुभवता दिला. स्पर्धेच्या अंतिम सामन्यात ‘शिवाजीयन्स फुटबॉल क्लब’ आणि ‘सुमन एंटरप्रायझेस फुटबॉल क्लब’ यांच्यात काट्याची टक्कर पाहायला मिळाली. दोन्ही बाजूंनी आक्रमक…