Headlines

प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी:पाचोडच्या पैठण चौकामध्ये वाहतूक‎कोंडीचा विळखा; वाहनधारक त्रस्त‎, वळण घेण्यासाठी वाहनचालकांची होेतेय कसरत‎

पैठण तालुक्यातील पाचोड येथील पैठण चौकात दररोज मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण होत असल्याने वाहनचालकांसह सर्वसामान्य नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. धुळे-सोलापूर या राष्ट्रीय महामार्गावरील महत्त्वाचे ठिकाण म्हणून पाचोडची ओळख आहे. मात्र, पैठण चौकातील वाहतूक व्यवस्थेचा प्रश्न दिवसेंदिवस अत्यंत गंभीर होत असून, या समस्येकडे संबंधित प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप स्थानिकांकडून केला जात…

Read More

'काला हिरण' चित्रपटाचा फर्स्ट लुक रिलीज:सलमान खान आणि लॉरेन्सचा नाव बदलून उल्लेख करण्यात आला; पाहा व्हिडिओ

सलमान खानच्या बहुचर्चित काळवीट प्रकरणावर आधारित ‘काला हिरण: द बॅटल फॉर लेगेसी’ या चित्रपटाचा फर्स्ट लुक जारी करण्यात आला आहे. चित्रपटाचा पहिला व्हिडिओ शुक्रवारी प्रदर्शित झाला. ज्यात सलमान खानचा उल्लेख अयान खान आणि लॉरेन्सचा उल्लेख लॉयन या नावाने करण्यात आला आहे. व्हिडिओमध्ये काळवीट शिकार प्रकरण आणि कायदेशीर लढाईशी संबंधित प्रकरण दाखवण्यात आले आहे. अनेक संवाद…

Read More

4.5 लाख विद्यार्थ्यांचा डेटा लीक झाल्याचं CET सेलने मान्य केलं:850 कोटींच्या कंत्राटात मोठा मलिदा; रोहित पवारांचा थेट आरोप, कारवाईची मागणी

महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाच्या (CET Cell) कारभारावर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी जोरदार निशाणा साधला आहे. राज्यातील तब्बल साडेचार लाख विद्यार्थ्यांचा डेटा लीक झाल्याची बाब खुद्द सीईटी सेलने मान्य केल्याचा दावा करत त्यांनी संपूर्ण परीक्षा पद्धतीत आणि कंत्राटात शेकडो कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला. मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत ते…

Read More

कर्ज कसे फेडायचे या विवंचनेतून 50 वर्षीय शेतकऱ्याची आत्महत्या:हिंगोलीमधील पारडाच्या शेतकऱ्यांने घेतले विष, उपचारादरम्यान मृत्यू

हिंगोली तालुक्यातील पारडा येथे नापिकी व कर्जामुळे विषारी औषध पिलेल्या शेतकऱ्याचा उपचार सुरु असतांना मृत्यू झाला असून याप्रकरणी बासंबा पोलिस ठाण्यात शनिवारी ता. 3 अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या घटनेमुळे गाववर शोककळा पसरली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंगोली तालुक्यातील पारडा येथील अल्पभुधारक शेतकरी राजुअप्पा भिमाअप्पा तोरकड (50) यांना पारडा शिवारात दिड एकर शेती…

Read More

बँजोच्या तालावर वराहाची ट्रॅक्टरमधून उत्साहात मिरवणूक:स्वयंभू गणेश मंदिरात भजन, पूजा, नामस्मरण‎

पांडे करमाळा तालुक्यात प्रथमच वराह जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. सकल हिंदू समाज करमाळाच्या वतीने रविवारी वराह जयंतीनिमित्त जिवंत वराहाची ट्रॅक्टरमधून मिरवणूक काढण्यात आली. यावेळी बँजोच्या तालावर जयघोष करत मिरवणूक काढण्यात आली. या अनोख्या उपक्रमामुळे वराह जयंतीची चर्चा परिसरात रंगली आहे. सकल हिंदू समाज करमाळाच्या वतीने वराह जयंतीनिमित्त मौलालीनगर येथून सायंकाळी ५ वाजता मिरवणुकीला सुरुवात…

Read More

दिल्लीत पाक उच्चायुक्तालयाच्या बाहेर बुलडोझर चालला:बॅरिकेड-फेन्सिंग हटवले; 2 दिवसांपूर्वी इस्लामाबादमधील भारतीय उच्चायुक्तालयाच्या बाहेर कारवाई

दिल्लीतील पाकिस्तान उच्चायुक्तालयाच्या बाहेर बांधलेले अनधिकृत बांधकाम हटवण्यासाठी बुलडोझर चालवण्यात आला. अधिकाऱ्यांच्या मते, हे बांधकाम उच्चायुक्तालयाच्या मंजूर मर्यादेबाहेर होते. कारवाईदरम्यान, बॅरिकेड्स, कुंपण आणि व्हिसा विभागाजवळ रांग व्यवस्थापनासाठी उभारलेले बांधकाम देखील हटवण्यात आले. ही कारवाई अशा वेळी झाली आहे, जेव्हा दोन दिवसांपूर्वी इस्लामाबादमधील भारतीय उच्चायुक्तालयाच्या बाहेरूनही बॅरिकेड्स आणि पार्किंग पोल हटवण्यात आले होते. व्हिसा विभागाजवळील बांधकामही…

Read More

पुणे महात्मा फुले मंडईतील गाळेधारकांवर भाडेवाढ:नगरसेवक राघवेंद्र मानकर यांची पुनर्विचार करण्याची मागणी

पुणे शहरातील ऐतिहासिक महात्मा फुले मंडईतील २२०० गाळेधारकांच्या भाडेवाढीचा पुनर्विचार करण्याची मागणी पुणे महानगरपालिकेचे नगरसेवक राघवेंद्र (बाप्पू) मानकर यांनी केली आहे. गाळेधारकांची आर्थिक परिस्थिती, व्यवसायाचे स्वरूप आणि मागील काही वर्षांतील प्रतिकूल परिस्थिती लक्षात घेऊन न्याय्य व परवडणारे भाडे निश्चित करावे, असे त्यांनी म्हटले आहे. कोविड-१९ महामारी, दीर्घकाळाचे लॉकडाऊन, ग्राहकसंख्येत झालेली घट तसेच मंडई परिसरातील मेट्रो…

Read More

अनन्या पांडेच्या भरतनाट्यमवर भडकल्या काँग्रेस प्रवक्त्या:म्हणाल्या- आमच्या आवडत्या नृत्य प्रकाराला मारले; 'चांद मेरा दिल' चित्रपटातील डान्स सीनवर वाद

बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडेच्या नवीन चित्रपट ‘चांद मेरा दिल’ मधील एका डान्स सीनवरून नवीन वाद सुरू झाला आहे. चित्रपटातील तिच्या भरतनाट्यम आणि कंटेम्पररी मिक्स (फ्यूजन) डान्स सीक्वेंसवर टीका होत आहे. काँग्रेस प्रवक्त्या शमा मोहम्मद आणि क्लासिकल डान्सर अनिता रत्नम यांच्यासह अनेक सोशल मीडिया युजर्सनी यावर नाराजी व्यक्त केली आहे. शमा मोहम्मद म्हणाल्या की, अनन्याने त्यांच्या…

Read More

SIR मध्ये राहिलेल्या अन् नव्या मतदारांची नावे जोडणार:EC 20 राज्यांत राबवणार विशेष मोहीम; महाराष्ट्रात सर्वाधिक 2 कोटी नावे वगळली

विशेष सखोल पुनरावलोकन (SIR) पूर्ण केलेल्या 20 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये निवडणूक आयोग विशेष मोहीम राबवणार आहे. यात SIR मध्ये राहून गेलेल्या व्यक्तींची तसेच वयाची 18 वर्षे पूर्ण केलेल्या नव्या मतदारांची नावे मतदार यादीत समाविष्ट केली जातील. द इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार, निवडणूक आयोगाने हे निर्देश 29 सप्टेंबर रोजी लेखी स्वरूपात दिले होते. गुरुवारी सर्व राज्यांच्या…

Read More

Mungantiwar Hits Back at Thackeray; Recalls 2019 Press Meet

सत्तेसाठी काहीपण हे तुम्हीच शिकवले ना? मग लोकं सत्ताधारी पक्षासोबत येत असतील तर त्यामध्ये वाईट काय आहे. 24 सप्टेंबर 2019 ला दुपारी 4 वाजता एक पत्रकार परिषद घेण्यात आली त्यामुळे राज्यातील राजकारणाची दिशा बदलली ती पुढचे 100 वर्षे लक्षात राहणार आहे, असे . आदित्य ठाकरेंकडून सध्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर ‘ऑपरेशन देवेंद्र’ म्हणत टीका करण्यात…

Read More