गणेशोत्सवात दोन गटांत जोरदार राडा:मारहाण, विनयभंगाच्या तक्रारी, 21 जणांवर गुन्हा
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सातारा शहरातील मध्यवर्ती भागात दोन गटांमध्ये जोरदार हाणामारी झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेनंतर परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. दोन्ही गटांकडून शहर पोलीस ठाण्यात परस्परविरोधी तक्रारी दाखल करण्यात आल्या असून, मारहाण, विनयभंग आणि जिवे मारण्याची धमकी दिल्याचे आरोप करण्यात आले आहेत. या प्रकरणात तब्बल 21 जणांविरोधात तक्रारी दाखल झाल्या…