Headlines

ठाकरे बंधू महाराष्ट्राची करमणूक करतायेत:रामदास कदमांचा घणाघात, म्हणाले- एक दिवस दूध का दूध, पाणी का पाणी होईल

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार आणि मतदारयादीच्या पुनर्रनिरीक्षण प्रक्रियेवरून महाराष्ट्रातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. मतदारयादीतील कथित अनियमितता आणि SIR प्रक्रियेच्या मुद्द्यावरून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र येत आंदोलनाची भूमिका घेतली आहे. उद्या, 4 ऑक्टोबर रोजी मुंबईत निवडणूक आयोगाच्या विरोधात ठाकरे बंधूंच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चाला विविध राजकीय पक्षांनी सहभागी…

Read More

सुवेंदू म्हणाले- ममतांनी पायाला फ्रॅक्चर झाल्याचे नाटक केले होते:दावा- वैद्यकीय अहवालात असे काहीही नाही; 2021मध्ये TMC ला सर्वात मोठा विजय मिळाला होता

पश्चिम बंगाल सरकार ममता बॅनर्जी यांना 2021 मध्ये झालेल्या दुखापतीची चौकशी करणार आहे. मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांनी शनिवारी दावा केला की, या दुखापतीत फ्रॅक्चर झाल्याचे पुरावे मिळालेले नाहीत. 10 मार्च 2021 रोजी पश्चिम बंगालमधील नंदीग्राम येथे विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर प्रचारादरम्यान ममता बॅनर्जी यांनी पायाला दुखापत झाल्याचा दावा केला होता. त्यांनी सांगितले होते…

Read More

मातंग समाजाच्या उपवर्गीकरणावरून सदावर्तेंचा आक्रमक पवित्रा:‘एकनाथ शिंदेंसारखे पाच जण आले तरी निर्णय होऊ देणार नाही’

अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाच्या मुद्द्यावरून महाराष्ट्रातील राजकीय आणि सामाजिक वातावरण तापले आहे. अनुसूचित जातींमधील विविध समाजघटकांना त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षणाचा लाभ मिळावा, अशी मागणी काही संघटनांकडून केली जात आहे. मात्र, या उपवर्गीकरणाला विरोधही होत असून अ‍ॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी नाशिकमध्ये आक्रमक भूमिका मांडली आहे. मातंग समाजाचा अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणात समावेश करण्याच्या मुद्द्यावर बोलताना सदावर्ते यांनी या…

Read More

SSC 2026 Exam Schedule Released; Clash With IBPS PO & BPSC Dates Causes Panic

7 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक कर्मचारी निवड आयोगाने (SSC) तीन मोठ्या भरती परीक्षांच्या परीक्षा तारखा जाहीर केल्या आहेत. या वेळापत्रकात कनिष्ठ अभियंता (JE) परीक्षा, दिल्ली पोलिस आणि केंद्रीय सशस्त्र पोलिस दलातील उपनिरीक्षक परीक्षा तसेच संयुक्त उच्च माध्यमिक (10+2) स्तर परीक्षा (CHSL) यांचा समावेश आहे. उमेदवार SSC च्या अधिकृत वेबसाइट ssc.gov.in वर जाऊन परीक्षा वेळापत्रक पाहू शकतात….

Read More

हैदराबादमध्ये लष्कराच्या जवानांनी चोरली होती शस्त्रे:हवालदारच होता मुख्य आरोपी, साथीदारांच्या मदतीने कुलपे तोडली, बँक लुटणार होते; 7 जणांना अटक

हैदराबादमधील आर्मी फॅसिलिटीमधून शस्त्रे चोरी केल्याप्रकरणी शनिवारी 3 लष्करी कर्मचाऱ्यांसह 7 जणांना अटक करण्यात आली. ही माहिती मल्काजगिरीचे पोलिस आयुक्त बी. सुमती यांनी दिली. या प्रकरणातील मुख्य आरोपी तेलंगणातील नागरकुर्नूल जिल्ह्यातील माजी हवालदार उप्पुथल्ला मल्लेश आहे. त्याला 11 सप्टेंबर रोजी अटक करण्यात आली होती. 30 आणि 31 ऑगस्टच्या मध्यरात्री बोलारम येथील कोटे आणि बटालियन मॅगझिनमधून…

Read More

Satej Patil Questions Maharashtra Govt Over MPSC Inquiry

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) कारभारावरून सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते सतेज पाटील यांनी सरकारच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले आहेत. MPSC च्या पदाधिकाऱ्यांची चौकशी करायची असेल, तर संबंधित व्यक्ती पदावर असताना . MPSCच्या विविध परीक्षांमध्ये कथित गैरप्रकार, पेपरफुटीचे आरोप, परीक्षा पद्धती आणि विद्यार्थ्यांच्या तक्रारींवरून गेल्या काही दिवसांपासून पुण्यात आंदोलन सुरू आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री…

Read More

महाराष्ट्रातील दुष्काळाचे भयाण वास्तव:करपलेली पिके अन् डोळ्यांत हतबलतेचे अश्रू! अकोल्यात दुष्काळाचे अत्यंत भयाण वास्तव

निसर्गाच्या लहरीपणाचा सर्वाधिक फटका जर कोणाला बसत असेल, तर तो जगाच्या पोशिंद्याला. सध्या महाराष्ट्रात दुष्काळाचे अत्यंत भयाण वास्तव समोर येत असून, अकोला जिल्ह्यातील चित्र काळीज पिळवटून टाकणारे आहे. काळ्या आईची सेवा करण्यासाठी अहोरात्र घाम गाळणाऱ्या बळीराजाच्या डोळ्यांत आज केवळ आणि केवळ हतबलतेचे अश्रू आहेत. आकाशाकडे डोळे लावून बसलेल्या शेतकऱ्याच्या पदरी यंदाही घोर निराशाच पडली असून,…

Read More

9 महिन्यांत 56 खून अन् नाक्यानाक्यांवर ड्रग्ज!:ठाणे आता धर्मवीरांचे राहिले नाही, हे गँग्ज ऑफ वासेपूर झालेय; पूर्णेकर हत्येनंतर भयमुक्त ठाण्यासाठी सर्वपक्षीय वज्रमूठ

“ठाणे हे एकेकाळी सुसंस्कृत लोकांचे, तलावांचे आणि धर्मवीर आनंद दिघेंच्या विचारांचे शहर म्हणून ओळखले जात होते. मात्र, गेल्या काही वर्षांत राजकीय आश्रयाखाली पोसलेल्या गुंडगिरीमुळे ठाण्याची अवस्था बिहारपेक्षा भयंकर आणि ‘गँग्ज ऑफ वासेपूर’सारखी झाली आहे. गेल्या अवघ्या नऊ महिन्यांत शहरात तब्बल 56 खून झाले असून प्रत्येक नाक्यावर आणि शाळा-कॉलेजबाहेर उघडपणे ड्रग्ज विकले जात आहेत. बाळू पूर्णेकर…

Read More

पुणे पदवीधरसाठी 55, शिक्षकसाठी 28 अर्जांचे वाटप:आजअखेर पदवीधरसाठी 205 तर शिक्षकसाठी 1387 अर्ज वाटले गेले

पुणे पदवीधर आणि पुणे शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अर्ज वाटप प्रक्रियेला वेग आला आहे. शनिवार, ३ ऑक्टोबर रोजी पुणे पदवीधर मतदारसंघासाठी ५५ अर्जांचे वाटप झाले. हे अर्ज ३३ व्यक्तींनी घेतले. तर पुणे शिक्षक मतदारसंघासाठी २८ अर्जांचे वाटप झाले असून, १६ व्यक्तींनी अर्ज घेतले. आजअखेरच्या आकडेवारीनुसार, पुणे पदवीधर मतदारसंघासाठी एकूण २०५ अर्जांचे वाटप झाले आहे. हे…

Read More

ग्रामसभेत प्रश्न विचारला अन् वाद पेटला:तरुणाला मारहाण केल्याचा आरोप,जळगावातील घटनेने खळबळ

ग्रामसभेत गावातील समस्यांबाबत प्रश्न विचारणे एका तरुणाला चांगलेच महागात पडल्याची घटना जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यात समोर आली आहे. जारगाव ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत धूर फवारणी यंत्राच्या वापराबाबत तरुणाने प्रश्न उपस्थित केला. यावरून तरुण आणि माजी सरपंच यांच्यात वाद झाला. हा वाद वाढल्यानंतर तरुणाला मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात…

Read More