अमरावती जिल्हा बँकेच्या प्रशासक नियुक्तीचा निकाल:संचालकांच्या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयाचा आदेश उद्या, 5 ऑक्टोबरला येणार
अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (एडीसीसी) संचालक मंडळाला मुदतवाढ मिळणार की प्रशासक नेमला जाणार, याचा निर्णय उद्या, ५ ऑक्टोबरला होणार आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात या याचिकेवर सुनावणी पूर्ण झाली आहे. बँकेच्या विद्यमान संचालकांचा कार्यकाळ ४ ऑक्टोबरला संपत आहे. सत्ताधारी आणि विरोधकांमधील वादामुळे वेळेत निवडणूक होऊ शकली नाही. सत्ताधारी संचालकांनी नवीन मंडळ येईपर्यंत मुदतवाढ…