Headlines

जुन्या पैठणमध्ये नागरिकांची पिण्याच्या पाण्यासाठी गैरसोय:जलकुंभाचे काम पूर्ण होऊनदेखील चालू करण्यास टाळाटाळ‎

शहराच्या उशाशी जायकवाडी जलाशय असतानाही, जुन्या पैठण शहरातील जनतेचा पिण्याच्या पाण्याचा वनवास संपताना दिसत नाही. नवनाथ मंदिर परिसरात उभारण्यात आलेल्या पिण्याच्या पाण्याच्या टाकीचे काम पूर्ण होऊनही ते सुरू न झाल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. या पाण्याच्या टाकीचे भूमिपूजन २०१८ मध्ये झाले होते. २०२० मध्ये टाकीचे काम पूर्ण झाल्यानंतर २०२२ आणि २०२३ मध्ये टाकीची…

Read More

फुलंब्री तालुक्यातील 55 पाझर तलाव पावसाअभावी कोरडेच:वाकोद प्रकल्पात 8, फुलंब्री तलावात 31 टक्के साठा‎

तालुक्यात या वर्षी पावसाने पाठ फिरवल्यामुळे तब्बल चौदा वर्षांनंतर अत्यंत भयंकर दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. पावसाच्या अपुऱ्या प्रमाणामुळे येथील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले असून, या भीषण स्थितीने तालुक्यातील अनेक गावांमधील वयोवृद्ध नागरिकांना १९७२ च्या ऐतिहासिक दुष्काळाची आठवण करून दिली आहे. तालुक्यात पावसाची अत्यंत अल्प नोंद झाल्यामुळे येथील एकही मुख्य धरण भरलेले नाही. यामुळे जेवढा…

Read More

शिवाची वाडीमध्ये 10 हजार लिटर क्षमतेचा उभारला जलकुंभ:ज्ञान प्रबोधिनी व एव्हीएन्ट कंपनीचापाणी टंचाई निवारणासाठी उपक्रम‎

ज्ञान प्रबोधिनी, पुणे व एव्हीएन्ट कंपनी, अमेरिका यांच्या संयुक्त विद्यमाने इगतपुरी तालुक्यातील अतिदुर्गम भागातील पाणीटंचाईवर उपाय म्हणून उभारण्यात आलेल्या जलकुंभांपैकी शेनवड येथील शिवाची वाडी येथे १० हजार लिटर क्षमतेच्या जलकुंभाचे लोकार्पण करण्यात आले. एव्हीएन्ट कंपनीचे राजेश पवार, मनोज पाटील, ज्ञान प्रबोधिनीचे स्वामी देवसेवानंदजी, ग्रामसेविका सरला राठोड, सुरेश शीद यांच्यासह ग्रामस्थ व मोठ्या संख्येने महिला उपस्थित…

Read More

दिंडोरीचा दुष्काळ‎यादीत समावेश करा‎:नितीन देशमुख यांचे उपमुख्यमंत्र्यांना निवेदन‎

​दिंडोरी राज्य शासनाने नुकत्याच जाहीर केलेल्या दुष्काळग्रस्त व दुष्काळसदृश तालुक्यांच्या यादीतून नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्याला वगळल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे. या पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यकर्ते नितीन देशमुख, तालुकाप्रमुख अमोल कदम, नगरसेविका ज्योती देशमुख यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन तालुक्यातील गंभीर परिस्थितीबाबत निवेदनाद्वारे लक्ष वेधले. ​कदम यांनी निवेदनात नमूद केले की, यंदा वेळेवर…

Read More

33 विद्यार्थ्यांची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड‎:विंचूरच्या विद्यार्थ्यांचे मैदानी स्पर्धेमध्ये यश

लासलगाव महाविद्यालय येथे झालेल्या तालुकास्तरीय मैदानी क्रीडा स्पर्धेत विंचूर येथील कर्मवीर भाऊराव पाटील ज्युनिअर कॉलेज विभागाच्या विद्यार्थ्यांनी विविध क्रीडा प्रकारांत यश संपादन केले. मैदानी क्रीडा स्पर्धेत ज्युनिअर कॉलेज विभागाने १३ क्रीडा प्रकारांत विजय मिळवत उल्लेखनीय कामगिरी केली. या स्पर्धांमध्ये एकूण १५ क्रीडा स्पर्धांत विद्यार्थ्यांनी प्रथम क्रमांक मिळवला. तसेच १८ विद्यार्थ्यांनी द्वितीय क्रमांक, तर ०९ विद्यार्थ्यांनी…

Read More

पैठण तालुक्यात दुष्काळाची छाया;‎मजुरांचे डोळे ‘रोहयो’च्या कामांकडे‎:पुढील आठवड्यात आ. भुमरे यांच्या मार्गदर्शनाखाली बैठक

पावसाच्या दीर्घ खंडामुळे पिकांचे झालेले अतोनात नुकसान आणि शेतीची कामे ठप्प झाल्याने पैठण तालुक्यातील ग्रामीण भागात मजुरांच्या हाताला काम उरलेले नाही. ऐन दुष्काळाच्या तोंडावर रोजगाराचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून, मजुरांना आधार देणाऱ्या महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेची (रोहयो) कामे तातडीने कधी सुरू होणार, याकडे ग्रामीण भागातील गरीब कुटुंबांचे लक्ष लागले आहे. तालुक्यात यंदा खरिपाची…

Read More

जिल्ह्यात जिल्हाधिकारी गौैडा यांचा दुष्काळ पाहणी दौरा:काँग्रेसचे बोरसे यांनी केली सरसकट मदतीची मागणी‎

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात निर्माण झालेल्या भीषण दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी जिल्ह्यातील छत्रपती संभाजीनगर, खुलताबाद, फुलंब्री या तालुक्यांमधील माळीवाडा, सराई, चौका, वारेगाव परिसराचा प्रत्यक्ष पाहणी दौरा केला. या दौऱ्यात त्यांनी पिण्याच्या पाण्याचे साठे, जनावरांचा चारा, टँकरद्वारे पाणीपुरवठा आणि रोजगाराच्या उपलब्धतेची पाहणी केली. तसेच पिण्याच्या पाण्याचा अनधिकृत उपसा तातडीने थांबवून पाण्याचे स्रोत संरक्षित…

Read More

संशोधन करून कल्पनाशक्तीचा विकास साधावा- मानसिंग पवार:कन्नडच्या श्री छत्रपती शिवाजी कॉलेज ऑफ फार्मसीत कार्यक्रम‎

विद्यार्थ्यांनी केवळ पाठ्यपुस्तकापुरते व परीक्षानिष्ठ अभ्यासापुरते मर्यादित न राहता नवीन संशोधन करून आपल्या कल्पनाशक्तीचा आणि सर्जनशीलतेचा विकास साधावा, असे प्रतिपादन उद्योजक मानसिंग पवार यांनी केले. कन्नड येथील श्री छत्रपती शिवाजी कॉलेज ऑफ फार्मसी येथे जागतिक फार्मासिस्ट दिनाचे औचित्य साधून महाविद्यालयाच्या वतीने मोफत आरोग्य तपासणी शिबिर तसेच विद्यार्थ्यांसाठी संस्थास्तरीय ‘आविष्कार’ संशोधन स्पर्धेचे भव्य आयोजन करण्यात आले…

Read More

बायकोची पोत गहाण ठेवूनही कर्ज संपेना:बुलढाण्यात हताश शेतकऱ्याने घेतला फास, चिठ्ठीत मांडली दुष्काळाची भीषणता; महसूलमंत्र्यांच्या दौऱ्यापूर्वी घटना

“वावर विकून कर्ज फिटले नाही, बायकोची पोत गहाण ठेवूनही पाहिजे तितके पैसे भेटले नाहीत…” अशी हृदयद्रावक चिठ्ठी लिहून चोंडी टाकळेश्वर (ता. संग्रामपूर) येथील अल्पभूधारक शेतकरी शंकर रामभाऊ भारसाकळे यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. शनिवारी, ३ ऑक्टोबर रोजी . यंदा पडलेला दुष्काळ, पिकांचे झालेले नुकसान आणि वाढत्या कर्जामुळे शंकर भारसाकळे मानसिक तणावात होते. डोक्यावरचा कर्जाचा डोंगर…

Read More

राज्यात अनेक भागांतून मान्सूनची माघार:20 जिल्ह्यांत पावसाची तूट, मराठवाड्यात सर्वाधिक दुष्काळी झळ

नैऋत्य मान्सूनने महाराष्ट्राच्या काही भागांतून माघार घेतली असून, राज्यातील ३६ पैकी २० जिल्ह्यांत पावसाची तूट नोंदवली. मराठवाड्यात पावसाची सर्वाधिक तूट असून, ७० टक्क्यांहून अधिक तालुक्यांमध्ये राज्य सरकारने दुष्काळ जाहीर केला आहे, अशी माहिती भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) शनिवारी दिली. राज्यात सर्वाधिक पावसाची तूट सोलापूरमध्ये (५८%) नोंदवली गेली. त्यापाठोपाठ बीड (५१ %), हिंगोली (४९%), जालना (४८%),…

Read More