आशा स्वयंसेविका, गटप्रवर्तकांची केंद्रीयमंत्री गडकरी यांच्याशी चर्चा:डॉ.नड्डांशी चर्चा करुन समस्या सोडवण्याचे आश्वासन
आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांच्या विविध प्रलंबित मागण्यांकडे केंद्र शासनाचे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र आशा गटप्रवर्तक फेडरेशन (सीआयटीयू)च्या शिष्टमंडळाने केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. आशा व गटप्रवर्तकांच्या प्रश्नांवर केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. जे. पी. नड्डा यांच्याशी चर्चा करून तोडगा काढण्यासाठी पाठपुरावा करण्याचे आश्वासन केंद्रीय मंत्री गडकरी यांनी शिष्टमंडळाला दिले…