Headlines

Aamir Khan Exits Ashneer Grover Biopic

9 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक बॉलिवूड अभिनेता आमिर खान भारतपेचे माजी सह-संस्थापक आणि व्यावसायिक अश्नीर ग्रोवर यांच्या बायोपिकमधून बाहेर पडला आहे. मीडिया रिपोर्टनुसार, चित्रपटाचे दिग्दर्शक राहुल मोदी यांच्यासोबत क्रिएटिव्ह मतभेदामुळे आमिरने हा प्रकल्प सोडण्याचा निर्णय घेतला आहे. आधी बातमी होती की आमिर या चित्रपटात अश्नीर ग्रोवरची भूमिका साकारणार होते आणि त्याच्यासोबत श्रद्धा कपूर मुख्य भूमिकेत होती….

Read More

कर्जमाफीची फक्त 553 शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर:तांत्रिक अडचणींमुळे उशीर, सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांची पत्रकार परिषद

राज्यातील लाखो शेतकऱ्यांच्या प्रतीक्षेला अखेर पूर्णविराम मिळाला आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना 2026 अंतर्गत कर्जमाफीची पहिली यादी आज (22 जुलै) जाहीर करण्यात आली आहे. या संदर्भात सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी पत्रकार परिषद घेत माहिती दिली आहे. या कर्जमाफीच्या यादीत फक्त 553 शेतकऱ्यांचेच नाव असल्याचे समोर आले आहे. बाबासाहेब पाटील म्हणाले, ही योजना…

Read More

"कोकणाला तुमची गरज आहे, तुम्ही आम्हाला पाहिजे":भास्कर जाधवांना भाजपकडून थेट ऑफर; प्रमोद जठार आणि जाधवांच्या गळाभेटीची चर्चा

सध्या भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेकडून विरोधी पक्षातील आमदार व खासदारांना आपल्याकडे खेचण्याचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत. नुकतेच उद्धव ठाकरेंच्या सहा खासदारांनी त्यांची साथ सोडून शिंदे गटात प्रवेश केल्याने, आता त्यांचे आमदारही पक्षाला रामराम ठोकणार असल्याच्या चर्चांना राजकीय वर्तुळात उधाण आले आहे. यातच विरोधी पक्षनेतेपदासाठी इच्छुक असलेले ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांचेही…

Read More

काळी पट्टी बांधून पत्रकार परिषदेसाठी आले राहुल गांधी:दिल्लीत आंदोलकांवर लाठीचार्जचे फुटेज दाखवले, विचारले- हे का झाले?

काँग्रेस नेते राहुल गांधी माध्यमांना संबोधित करत आहेत. त्यांनी नीट पेपरफुटी आणि कॉकरोच जनता पार्टीतील पोलीस कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. राहुल म्हणाले- विद्यार्थी शांततेत आंदोलन करत असताना त्यांच्यावर लाठीमार का करण्यात आला? यासोबतच राहुल यांनी स्टेजवर आंदोलनाच्या दिवसाचे फुटेज दाखवले. राहुल यांनी मंगळवारी पंतप्रधान मोदींच्या अधिकृत निवासस्थान 7, लोक कल्याण मार्गजवळ धरणे आंदोलन केले होते….

Read More

वेरूळमध्ये 'सीतेचा नहाना' धबधबा ओसंडून वाहिला:सातही कुंड तुडुंब भरले; नयनरम्य दृश्य पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी! VIDEO

जगप्रसिद्ध वेरूळ लेणी येथील लेणी क्रमांक 29 वरील धबधबा या पावसात दुसऱ्यांदा पूर्ण क्षमतेने वाहू लागला आहे. ‘सीतेचा नहाना’ म्हणून ओळखला जाणारा हा धबधबा आणि त्यावरील सात कुंड पाण्याने तुडुंब भरल्याने लेणी परिसराचे मनमोहक दृश्य पाहण्यासाठी पर्यटकांनी मोठी गर्दी केली आहे. सात कुंड भरून कोसळतोय धबधबा वरच्या बाजूला असलेल्या जोगेश्वरी लेणी परिसरातील सातही कुंड पावसाच्या…

Read More

पुणे गॅसची एलपीजी कार्यक्षम वापरासाठी धोरणाची मागणी:व्यावसायिक, औद्योगिक क्षेत्रांसाठी केंद्राला शिफारसी सादर

भारताची ऊर्जा सुरक्षा अधिक मजबूत करण्यासाठी व्यावसायिक आणि औद्योगिक क्षेत्रांमध्ये एलपीजीचा कार्यक्षम वापर वाढवणारे देशातील पहिले व्यापक धोरण तयार करावे, अशी मागणी ‘पुणे गॅस’ने केंद्र सरकारकडे केली आहे. कंपनीने पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाला यासंदर्भातील धोरणात्मक शिफारसी सादर केल्या आहेत. पश्चिम आशियातील भू-राजकीय तणावामुळे जागतिक एलपीजी पुरवठा साखळीवर दबाव निर्माण झाला आहे. वर्षाच्या सुरुवातीला सुमारे…

Read More

तालुकानिहाय वीज बिल माफीची रक्कम जाहीर करा:विजय जावंधिया यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

शेतकरी संघटनेचे ज्येष्ठ नेते विजय जावंधिया यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून ४८,००० कोटी रुपयांच्या शेतकरी वीज बिल माफी योजनेची तालुकानिहाय पारदर्शक माहिती आणि आकडेवारी जाहीर करण्याची मागणी केली आहे. नागपूर येथून पाठवलेल्या या पत्रात त्यांनी ही योजना जाहीर केल्याबद्दल सरकारचे आभार मानले, परंतु शेतकऱ्यांची सद्यस्थिती अजूनही बिकट असल्याचे नमूद केले आहे. जावंधिया यांनी…

Read More

राजभवनासमोर काँग्रेसचे काळे झेंडे दाखवून आंदोलन:विद्यार्थ्यांवरील कथित पोलीस कारवाईविरोधात निषेध व्यक्त

पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीने बुधवारी पुण्यातील राजभवनाच्या प्रवेशद्वारासमोर काळे झेंडे दाखवून आंदोलन केले. दिल्लीतील जंतर-मंतर येथे आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित पोलीस कारवाईच्या निषेधार्थ हे आंदोलन करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या हक्कांसाठी काँग्रेस पक्ष अखेरपर्यंत लढेल, असा निर्धार यावेळी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी व्यक्त केला. काँग्रेसने आरोप केला की, दिल्लीतील विद्यार्थी आपल्या मागण्यांसाठी शांततेच्या मार्गाने आंदोलन करत…

Read More

लावणी कलाकारांना शासनाने अनुदान द्यावे:सुरेखा पुणेकर यांची मागणी, म्हणाल्या- कलाकार टिकला तर महाराष्ट्राची शान टिकेल

प्रसिद्ध लावणी कलावंत सुरेखा पुणेकर यांनी लावणी कलाकारांना शासनाकडून अनुदान आणि आवश्यक सुविधा मिळाव्यात अशी मागणी केली आहे. लावणी ही महाराष्ट्राची शान आणि समृद्ध सांस्कृतिक परंपरा असून, ही लोककला जिवंत ठेवण्यासाठी आयुष्यभर योगदान देणाऱ्या कलाकारांना पाठिंबा मिळणे आवश्यक असल्याचे त्यांनी म्हटले आहे. सुरेखा पुणेकर यांनी सांगितले की, त्या गेल्या ४० वर्षांपासून लावणी क्षेत्रात कार्यरत आहेत….

Read More

दिल्लीतील आंदोलने परदेशी निधीतून स्पॉन्सर:रवींद्र चव्हाण यांचा दावा, सत्य लवकरच समोर येणार

भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी दावा केला आहे की, दिल्लीत सुरू असलेली आंदोलने परदेशी निधीतून प्रायोजित आहेत. या आंदोलनांना परदेशातून कोण निधी पुरवत आहे आणि त्यांचे मुख्य सूत्रधार कोण आहेत, हे सत्य लवकरच जनतेसमोर आणले जाईल, असे चव्हाण यांनी नागपूर येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमासाठी ते नागपुरात आले होते….

Read More