Headlines

चिमुरड्यांच्या जीवाशी खेळ:अंगणवाडीच्या आहार पाकिटात मृत पक्षी…, नाशिक जिल्ह्यात देवगावातील धक्कादायक प्रकार

शासनाच्या एकात्मिक बालविकास सेवा योजनेंतर्गत लहान बालके, गर्भवती व स्तनदा मातांना पोषण आहाराच्या माध्यमातून सकस आहार उपलब्ध करून देण्यात येतो. मात्र, निफाड-1 प्रकल्पांतर्गत देवगाव बिट क्र. 2 मधील इंदिरानगर अंगणवाडी केंद्रातून वितरित केलेल्या पोषण आहार पाकिटात कुजलेला मृत पक्षी आढळल्याचा आरोप लाभार्थीने केला आहे. या घटनेने लाभार्थी पालकांमध्ये संताप व्यक्त होत असून, संबंधित यंत्रणांच्या निष्काळजीपणाबाबत…

Read More

तरुणीने रेल्वेत छेड काढणाऱ्या आरोपीचा केला मेकअप, बांगड्या घातल्या:माकडाची किंमत ₹25 लाख; सापाने चावल्याने ₹11 कोटींचे उपचार

रेल्वेत मुलीची छेड काढल्याने लोकांनी एका आरोपीचा लिपस्टिक लावून मेकअप केला. तर, चीनमध्ये माकडांची मागणी इतकी वाढली आहे की, त्यांची किंमत ₹25 लाखांपर्यंत पोहोचली आहे. तिकडे, अमेरिकेत सापाने चावल्याने एका व्यक्तीला ₹11 कोटींचा उपचार घ्यावा लागला. आग्र्यात एका कुटुंबाने आपल्या हरवलेल्या पोपटाच्या शोधात शहरभर होर्डिंग्ज लावले आहेत. त्याचबरोबर त्याला शोधणाऱ्याला ₹50 हजारांचे बक्षीस ठेवले आहे….

Read More

गुन्हा दाखल, प्रियकर तुरुंगात;तरीही मुली म्हणतात तोच होणार माझा धनी:किशोरवयातील भावनिक निर्णयांचे गंभीर सामाजिक, कायदेशीर परिणाम

“माझे माझ्या नवऱ्यावर खूप प्रेम आहे आणि मला त्याच्यासोबतच संसार करायचा आहे,” असे ठामपणे सांगणारी 18 वर्षांची तरुणी आजही आपल्या निर्णयावर ठाम आहे. अल्पवयीन असताना ती प्रियकरासोबत घरातून निघून गेली. त्यानंतर तिच्या तक्रारीवरून संबंधित तरुणावर पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल झाला आणि त्याला कारागृहात जावे लागले. मुलगी मात्र आजही त्याच्यासोबत आयुष्य घालवण्याचा निर्धार व्यक्त करते. ही…

Read More

जफ्फी डालो, प्यार करो वर शहनाज गिल ट्रोल:पंजाबी चित्रपट 'इश्कनामा'च्या ट्रेलर लाँचिंगवर विधान करून अडकली; पाक इन्फ्लुएंसर म्हणाला- कथा बोगस

अभिनेता जय रंधावा आणि अभिनेत्री शहनाज गिल यांचा आगामी पंजाबी चित्रपट ‘इश्कनामा’ प्रदर्शनापूर्वीच वादात सापडला आहे. 24 जुलै रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाची कथा भारतीय पंजाबी शीख युवक निम्मा आणि पाकिस्तानी पंजाबी युवती नसीमा यांच्या प्रेमावर आधारित आहे. 14 जुलै रोजी ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर वाद सुरू झाला. चित्रपटाच्या कथेवर आणि पात्रांवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले…

Read More

निसर्ग संवर्धन:कस्तुरी ट्रस्टसह नोएल स्कूलचा वृक्ष‎लागवड महाअभियानात सहभाग‎, ‘एक वृक्ष एक जीवन’उपक्रमांतर्गत देशभर लावणार झाडे‎

. पर्यावरण संवर्धनासाठी दैनिक दिव्य मराठी व दैनिक भास्कर माध्यम समूहाने देशभरात ‘एक वृक्ष एक जीवन’ उपक्रमांतर्गत ७५ लाख झाडे लावण्याचे महाअभियान हाती घेतले आहे. या उपक्रमाचा शुभारंभ ७ जुलै रोजी येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात कुलगुरू डॉ. शरद गडाख यांच्या हस्ते करण्यात आला. तेव्हापासून या अभियानांतर्गत विविध ठिकाणी वृक्षलागवड करण्यात येत आहे. या…

Read More

सहकार भारतीचे बळ देण्याचे कार्य:मान्यवरांच्या उपस्थितीत कार्यकारिणीचे गठण‎

भ्रष्टाचार व घराणेशाहीमुळेच सहकार चळवळ नासली व जनसामान्यांच्या उन्नतीचा मार्ग अवरुद्ध झाला आहे. त्यामुळे सहकाराला प्रामाणिक संस्काराचे बळ देण्याचे काम सहकार भारती करत आहे, असे प्रतिपादन सहकार भारती अकोला जिल्हाध्यक्ष रामेश्वर फुंडकर यांनी केले. अकोला अर्बन बँकेत आयोजित सहकार भारतीच्या सभेत अध्यक्षीय विचार मांडताना ते बोलत होते. यावेळी सहकार भारती जिल्हा महामंत्री जैनेंद्र लुंकड, विधी…

Read More

अमरनाथ – वैष्णो देवी यात्रा थांबवली, JKच्या राजौरीत पूर:उत्तराखंडमध्ये भूस्खलन; यूपी-बिहारसह 14 राज्यांना मुसळधार पावसाचा इशारा

जम्मू-काश्मीरमधील राजौरी जिल्ह्यात शनिवारी मध्यरात्री 3 वाजता मुसळधार पावसानंतर अचानक पूर आला. यामुळे धारहाल नदीला पूर आला. न्यू बस स्टँड बेला परिसरात पाणी साचले. सुमारे 200 ते 250 वाहने वाहून गेली. देशात मान्सून दुसऱ्यांदा सक्रिय झाल्यामुळे दिल्ली, पंजाब, हरियाणा, जम्मू-काश्मीर, उत्तराखंड, हिमाचल, उत्तर प्रदेश, बिहार, सिक्कीम, आसाम, मेघालय, अरुणाचल प्रदेशमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे. रविवारीही…

Read More

जगन्नाथ रथयात्रेसाठी 5 टन, 31 फूट उंच रथाची निर्मिती:राजेश्वर नगरीत भक्ती-आधुनिक तंत्रज्ञानाचा संगम‎

श्री जगन्नाथ रथयात्रा महोत्सव रविवारी १९ जुलै रोजी मोठ्या उत्साहात होणार आहे. आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघ (इस्कॉन), अकोलातर्फे आयोजित या रथयात्रेत भगवान श्रीजगन्नाथ आणि सुभद्रा यांच्या रथाचे नगरभ्रमण होणार असून राजेश्वर नगरी भक्तिमय वातावरणात न्हाऊन निघणार आहे. ५ टन लोखंडी आणि ३१ फूट उंच असलेल्या महाकाय रथाची निर्मिती करण्यात आली आहे. यंदाच्या रथयात्रेस विदर्भ झोनल…

Read More

विचारातून वारसा जपण्याचे आवाहन:अण्णाभाऊ साठे पुण्यतिथीनिमित्त प्रमोद पोकळे, कलावंतांकडून अभिवादन‎

येथील कलावंत व साहित्यिक आधार संघाच्यावतीने बडनेरा जुनी वस्ती येथे साहित्य सम्राट, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा स्मृतिदिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमास दलितमित्र उत्तमराव भैसने प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. यानिमित्त लोकशाहीरांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या कार्यक्रमाला विविध क्षेत्रांतील साहित्यप्रेमी व सामाजिक कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. यावेळी आधार संघाचे समन्वयक लोककलावंत प्रमोद पोकळे…

Read More

ऑपरेशन कवचअंतर्गत चार कोटींचा गांजा खाक:अमरावती ग्रामीण पोलिसांची धडाकेबाज कारवाई‎

जिल्ह्यातील अमली पदार्थांच्या अवैध उत्पादनासह वाहतूक, साठवणूक, विक्री आणि सेवनाला पूर्णपणे आळा घालण्यासाठी अमरावती ग्रामीण पोलिसांतर्फे ऑपरेशन कवच हे अभियान राबवले जात आहे. या अभियानांतर्गत पोलिसांनी अमली पदार्थांच्या विरोधात कारवाई केली आहे. वेगवेगळ्या गुन्ह्यांमध्ये मागील पाच वर्षात जप्त करण्यात आलेल्या तब्बल ४ कोटी ४५ लाख ८० हजार रुपये किमतीच्या गांजाची शास्त्रोक्त पध्दतीने विल्हेवाट लावून त्याची…

Read More