नगरसेवक नीलेश देव यांचे आंदोलन स्थगित:मागण्यांवर निर्णय घेण्याचे मनपाचे आश्वासन
नागरिकांच्या मूलभूत नागरी सुविधांच्या प्रश्नांसाठी वंचित बहुजन आघाडीचे गटनेते तथा नगरसेवक नीलेश देव यांनी सोमवारी सकाळी १० वाजल्यापासून महानगरपालिका मुख्यालयाजवळ सुरू केलेले बेमुदत अन्नत्याग आंदोलन रात्री स्थगित केले. आयुक्त डॉ. सुनील लहाने यांनी आंदोलनातील सर्व मागण्यांवर सकारात्मक कार्यवाही करण्याची हमी दिल्यानंतर आंदोलनाची सांगता करण्यात आली. दिवसभर विविध राजकीय, सामाजिक व नागरिक क्षेत्रातील मान्यवरांनी आंदोलनस्थळी भेट…