गुरुकुंज मोझरीत आंदोलन:मोबाईल टॉवरमध्ये 205 फुटांपर्यंत वर चढला अन्यायग्रस्त शेतकरी, अचलपूर एसडीओ कार्यालयातील जमीन फेरफार
अचलपूर एसडीओ कार्यालयाअंतर्गत येणाऱ्या शेतीच्या एका प्रकरणात अनेक वर्षांपासून होत असलेल्या अन्यायाने त्रस्त झालेले वऱ्हा येथील शेतकरी प्रदीप शामराव डाखोरे यांनी शुक्रवार, २ रोजी राष्ट्रसंताच्या कर्मभूमीतील बसस्थानकासमोरील एका मोबाईलच्या उंच टॉवरवर २५० फुटांपर्यंत चढून लक्षवेधी आंदोलन केले. त्यामुळे प्रशासकीय वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली. सोबतच टॉवरखाली त्यांची आई शोभा डाखोरे, पत्नी सुषमा, भाऊ संदीप, तसेच ज्ञानेश…