हिंगोलीतील फुलदाभा परिसर मध्यरात्रीला झालेल्या भूकंपाने हादरला:3.6 रिश्टर स्केलची नोंद, परिसरातील गावकऱ्यांनी रात्र काढली जागून
औंढा नागनाथ तालुक्यातील फुलदाभा परिसर बुधवारी ता. 1 मध्यरात्री 1.20 वाजता भूकंपाने हादरला आहे. भूकंपमापकावर 3.6 रिश्टर स्केलची नोंद झाली आहे. या भूकंपामुळे परिसरातील गावकऱ्यांनी रात्र जागून काढली आहे. या भागात वारंवार होणाऱ्या भूकंपाची कारणे शोधण्यास प्रशासन अपयशी ठरत असल्याच्या प्रतिक्रिया नागरीकांतून व्यक्त होत आहेत. वसमत तालुक्यातील पांगरा शिंदे तसेच कळमनुरी तालुक्यातील रामेश्वरतांडा परिसरातील केंद्रबिंदू…