राज्यात ‘अॅनालॉग’ पनीरवर वर्षभर बंदी; वापरल्यास गुन्हा:एफडीए तपासणीत 35.4% नमुने अपायकारक
राज्यभरातील नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या आणि दुग्धजन्य पदार्थांच्या नावाखाली वनस्पतीजन्य चरबीची बेकायदेशीर भेसळ करणाऱ्या माफियांविरोधात अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) अत्यंत कठोर पाऊल उचलले आहे. १ एप्रिल २०२५ ते ३१ मार्च २०२६ या कालावधीत राज्यभरातून गोळा केलेल्या ३०८ नमुन्यांपैकी तब्बल १०९ नमुने (३५.४ टक्के) निर्धारित मानकांशी विसंगत आढळले; ज्यामध्ये ३० नमुने थेट मानवी आरोग्यास अपायकारक निष्पन्न…