Headlines

जिल्हा तहानलेलाच, यंदा पावसाळी पर्यटन कोलमडले!:प्रमुख पर्यटन स्थळांवर शुकशुकाट; स्थानिक विक्रेते, गाईड, व्यावसायिक आर्थिक संकटात‎

यंदाच्या पावसाळ्याने जिल्ह्याला अक्षरशः दगा दिला असून, अकोले तालुका वगळता संपूर्ण जिल्ह्यात पावसाने पाठ फिरवली आहे. या लहरी पर्जन्यमानाचा थेट परिणाम ग्रामीण अर्थव्यवस्था, शेती आणि आता थेट पर्यटनावर झाला आहे. जिल्ह्याची शान असणारी पावसाळी पर्यटनाची प्रमुख ठिकाणे यंदा ओस पडली होती. किरकोळ अपवाद वगळता कुठेही पर्यटकांची गर्दी पाहायला मिळाली नाही. हा केवळ निसर्गाचा लहरीपणा नसून,…

Read More

गांधी जयंती‎:गांधी वेशात अवतरले 157 ‘बापू’; संगमनेरात घुमला अहिंसेचा संदेश

महात्मा गांधी यांनी विविध संस्थानांमध्ये विभागलेल्या भारताला स्वातंत्र्याच्या लढ्यात एकत्र आणले. सत्य, अहिंसा, नैतिकता आणि निर्भयतेचा विचार त्यांनी जगाला दिला. त्यांच्या विचारांमुळे जगात भारताची वेगळी ओळख निर्माण झाली, असे प्रतिपादन जयहिंद लोकचळवळीचे संस्थापक माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी केले. महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त जयहिंद लोकचळवळीच्या वतीने प्रभात फेरी व…

Read More

फुलांच्या पायघड्यांनी तुळजाभवानीच्या पलंगाचे बेल्ह्यात स्वागत:नदीपात्रातून पलंग नेण्याची परंपरा आजही कायम

पारंपरिक ढोल-ताशांचा कडकडाट, सनईचे मंगलसूर, तोफांची सलामी, फटाक्यांची आतषबाजी, रांगोळ्या आणि फुलांच्या पाकळ्यांच्या पायघड्या… अशा भक्तिमय वातावरणात घोडेगावहून श्रीक्षेत्र तुळजापूरकडे निघालेल्या आई तुळजाभवानी देवीच्या पवित्र पलंगाचे बेल्हे ग्रामस्थांनी जंगी स्वागत केले. यावेळी संपूर्ण बेल्हे नगरी भक्तिरसात न्हाऊन निघाली. नवरात्रोत्सवात तुळजापूरच्या मंदिरात देवीची मूर्ती ज्या पलंगावर विराजमान होते, त्या पलंगाचा घोडेगाव ते तुळजापूर असा तब्बल ५५…

Read More

आग्र्यात महामार्गावर पेट्रोल-डिझेलने भरलेले टँकर उलटले:तेल भरण्यासाठी उडाली झुंबड, बादल्या-कॅन घेऊन लोक पोहोचले; ट्रेलरने धडक दिली

आग्रा येथे शनिवारी सकाळी पेट्रोलने भरलेला टँकर ट्रेलरला धडकल्यानंतर उलटला. या दुर्घटनेत टँकरची टाकी फुटली आणि पेट्रोल-डिझेल रस्त्यावर वाहू लागले. याची माहिती मिळताच आजूबाजूचे लोक घटनास्थळी पोहोचले आणि कॅन-डब्यांमध्ये तेल भरू लागले. पोलिसांच्या माहितीनुसार, टँकर फिरोजाबादमधील रसूलाबाद येथे जात होता. पुलियाजवळ ट्रेलरने त्याला धडक दिली. तेलाची गळती झाल्याने घटनास्थळी गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. या घटनेचा…

Read More

अनुष्ठान:2500 महिला, एक भक्तीभाव; आनंदतीर्थात ‘जिनेश्वरी’चा महासोहळा

राष्ट्रसंत आचार्य आनंदऋषीजी महाराज यांच्या पावन भूमीत आनंद तीर्थ समवशरण येथे सुरू असलेल्या समर्पण चातुर्मासात शुक्रवारी जिनेश्वरी अनुष्ठान पार पडले. या अनुष्ठानात अहिल्यानगरसह महाराष्ट्र आणि देशाच्या विविध भागांतून आलेल्या हजारो महिलांनी सहभाग घेतला. ‘अहिल्यानगरकी गलियों में कमाल हो गया, सबको गुरु आनंद का दीदार हो गया’ या भक्तिगीताने परिसर दुमदुमून गेला. महाराष्ट्र प्रवर्तक पूज्य कुंदनऋषीजी…

Read More

दुष्काळी झळा:जिल्हाधिकारी थेट मंगळवेढा शिवारात, शेतकऱ्यांकडून चारा अनुदानाची मागणी

जिल्ह्यातील दुष्काळाची भीषण तीव्रता आणि टंचाईची पाहणी करण्यासाठी जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांनी शुक्रवारी मंगळवेढा तालुक्यातील शेतांच्या बांधावर थेट भेट दिली. पुढील १० दिवसांच्या आत सर्व पिकांचे पंचनामे पूर्ण करण्याचे नियोजन प्रशासनाने केले असून, नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना पूर्ण न्याय दिला जाईल, असे स्पष्ट निर्देश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले. दरम्यान, या पाहणी दौऱ्यात दुष्काळी परिस्थिती पाहता चारा छावण्या…

Read More

पिकं करपली, पाण्यासाठी बी लयं भटकंती हाय बघा:मंगळवेढ्यात शेतकऱ्यांची व्यथा जाणून घेण्यासाठी आमदार समाधान आवताडे थेट बांधावर‎

“दादा.. हाताशी आलेली सोन्यासारखी पिकं पावसाअभावी डोळ्यांसमोर करपली बघा! माणसांसाठी आणि जनावरांसाठी लागणाऱ्या पाण्यासाठीही लई भटकंती करावी लागतेय,” अशा शब्दांत आक्रोश करणाऱ्या शेतकरी बांधवांची व्यथा जाणून घेण्यासाठी पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार समाधान आवताडे थेट दुष्काळी भागात शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचले आहेत. यंदाच्या भीषण दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर आमदार आवताडे यांनी मंगळवेढा तालुक्यातील दुष्काळग्रस्त महमदाबाद हु., लोणार व…

Read More

पत्ता विचारल्याच्या कारणावरून दोघांना काठीने बेदम मारहाण:ढाळेवाडीतील दोघांवर सांगोला पोलिसांत गुन्हा दाखल‎

महूद ते जुना हलदहिवडी रोडवर केवळ दिलीप केसकर यांच्या घराचा पत्ता विचारल्याच्या क्षुल्लक कारणावरून दोघांवर काठीने व लाथाबुक्क्यांनी हल्ला चढवून गंभीर जखमी केल्याची घटना गुरुवारी (दि. १) दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास घडली. याप्रकरणी नाना बिरा ढाळे व दत्ता लक्ष्मण माने (दोघे रा. ढाळेवाडी, ता. सांगोला) यांच्याविरुद्ध सांगोला पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत…

Read More

करमाळ्यातील केळी एक्सपोर्ट मॉडेलची कर्नाटकलाही भुरळ:कंदर येथील एक्सपोर्ट व्यवस्थापनाची पाहणी

करमाळा तालुक्यातील निर्यातक्षम केळी उत्पादन, आधुनिक पॅकिंग आणि थेट आंतरराष्ट्रीय बाजारातील निर्यातीची यशस्वी साखळी अभ्यासण्यासाठी कर्नाटक राज्याचे उच्चस्तरीय शिष्टमंडळ सोलापूर जिल्ह्यात दाखल झाले. कर्नाटकाचे फलोत्पादन सचिव आर. गिरीश यांच्या अध्यक्षतेखालील या पथकाने कंदर (ता. करमाळा) येथील प्रगतशील शेतकरी किरण डोके यांच्या केळी निर्यात केंद्राला भेट दिली. यावेळी शिष्टमंडळाने शेतातील उच्च दर्जाच्या केळी उत्पादनापासून ते थेट…

Read More

नापिकी अन् कर्जबाजारीपणाला कंटाळून 2 शेतकऱ्यांची आत्महत्या:हिंगोलीच्या वसमत तालुक्यातील घटना, कुरुंदा पोलिसांत नोंद

वसमत तालुक्यात शेतकरी आत्महत्येच्या दोन घटना घडल्या असून नापिकी अन कर्जाला कंटाळून तरुण शेतकऱ्यांनी जीवन संपविले. याप्रकरणी कुरुंदा पोलिस ठाण्यात शुक्रवारी ता. २ अकस्मात मृत्यूची नोंद झाली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कुरुंदा येथील तरुण शेतकरी गितेश सोम्मर (२६) यांना कुरुंदा शिवारात पाच एकर शेत आहे. या शेतात त्यांनी सोयाबीन व इतर पिके घेतली आहेत. तर…

Read More