Headlines

‘गोदा ते नर्मदा’ जलयात्रेचा आजपासून शंखनाद:30 नद्यांच्या कलशातून घुमणार जलसंवर्धनाचा जागर, अहिल्यादेवी होळकर त्रिशताब्दी जयंतीनिमित्त उपक्रम

राज्यातील जलव्यवस्थापन अधिक प्रभावी करण्यासाठी आणि जलसंवर्धनाचा संदेश घराघरात पोहोचवण्यासाठी राज्य सरकारने कंबर कसली आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०० व्या जयंती वर्षाचे औचित्य साधून ‘गोदा ते नर्मदा जलयात्रा २०२६’ चे भव्य आयोजन करण्यात आल . विचार, वारसा आणि विकास या त्रिसूत्रीच्या आधारे जलव्यवस्थापनाचे काम अधिक प्रभावीपणे करण्याचा संकल्प असून, अहिल्यादेवींनी दाखवलेला जलसंवर्धनाचा मार्ग आजच्या…

Read More

नाशिक TCS धर्मांतर प्रकरणात धक्कादायक खुलासा:हो, मीच दिले नमाजचे ट्रेनिंग; मुख्य आरोपी निदा खानची तपास यंत्रणांसमोर कबुली

नाशिक येथील नामांकित टीसीएस कंपनीतील महिला कर्मचाऱ्यांचा लैंगिक छळ आणि सक्तीने धर्मांतर करण्याचा प्रयत्न केल्याचे प्रकरण सध्या राज्यभरात गाजत आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी निदा खान हिला पोलिसांनी अटक केल्यानंतर, पोलिस कोठडीतील चौकशीदरम्यान तिने अत्यंत धक्कादायक कबुली दिली आहे. “होय, मीच पीडितेला घरी नेऊन नमाज पठणाचे रीतसर ट्रेनिंग दिले,” अशी कबुली तिने दिली आहे. या…

Read More

पाणीटंचाईचे लोण आता मेळघाटच्या पायथ्याशी; अचलपुरातही पाणीटंचाई:चंद्रभागा धरणावरून येणाऱ्या पाण्याचा दाब कमी‎

प्रतिनिधी | अचलपूर चंद्रभागा धरणावरून पाण्याचा दाब कमी झाल्याने मेळघाटच्या पायथ्याशी असलेल्या परतवाडा-अचलपुर या जुळ्या शहरातही गंभीर पाणीटंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून शहराच्या टंचाईग्रस्त भागात नगरपालिकेतर्फे टँकरने पाणी पुरवठा केला जात आहे. चंद्रभागा धरणावरून येणाऱ्या पाण्याचा दाब सध्या प्रचंड कमी झाला आहे. परिणामी अचलपूर शहरात पाणीटंचाईची समस्या निर्माण झाली आहे. जलवाहिनीत कमी…

Read More

जिल्ह्यामध्ये खरिपाची पिके पिवळी पडू लागली:पेरण्या 38 टक्क्यांनी घटल्या, पाऊस लांबल्यास दुबार पेरणीचे संकट, जिल्ह्याचे पेरणी क्षेत्र 3.23 लाख हेक्टर‎

जिल्ह्यात ४ ते ८ जुलै दरम्यान झालेल्या पावसामुळे खरीप पेरण्यांनी चांगलाच वेग घेतला होता. मात्र, गेल्या सात दिवसांपासून पावसाने पुन्हा ब्रेक घेतल्याने आणि कडक ऊन पडू लागल्याने खरीप हंगामातील पिके आता काही प्रमाणात पिवळी पडू लागली आहेत. गेल्या वर्षीच्य . जून महिन्यातील बहुतांशी दिवस कोरडे गेल्याने सुरुवातीला केवळ २० टक्केच पेरण्या झाल्या होत्या. त्यानंतर जुलैच्या…

Read More

शिंदेंना निमंत्रण नाही, मंत्रिमंडळ बैठकीत उमटले पडसाद:सहाय्यक कृषी अधिकाऱ्यावर आखाडा बाळापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

कळमनुरी तालुक्यातील पिंपरी, कृष्णापुर तर्फे शेवाळा या गावांमध्ये शेतखरडणी अनुदान वाटपात गैरव्यवहार करून शासनाची ६.१५ लाख फसवणूक केल्याप्रकरणी कळमनुरी येथील सहाय्यक कृषी अधिकाऱ्यावर बाळापूर पोलीस ठाण्यात बुधवारी तारीख 8 गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कळमनुरी तालुक्यातील पिंपरी कृष्णापुर तर्फे शेवाळा व अन्य एका गावामध्ये सन 2024 मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे खरडणीचे अनुदान मंजूर…

Read More

मुंबईच्या लोकलसह अणुऊर्जा केंद्र उडवण्याचा कट उधळला:मुंब्रा, कुर्ला व पुण्यातील 8 दहशतवाद्यांना बेड्या

मुंबई, पुणे आणि पंजाबमध्ये रक्तपात घडवण्याचा पाकिस्तानचा भीषण कट पोलिसांनी हाणून पाडला. दाऊद इब्राहिमचा कुख्यात हस्तक मुन्ना झिंगडा आणि पाकिस्तानी गुप्तचर संस्था ‘आयएसआय’च्या इशाऱ्यावर स्फोट घडवण्यासाठी सज्ज असलेल्या तब्बल आठ दहशतवाद्यांना दिल्ली पोलिसांच्या ‘स्पेशल सेल’ने अटक केली आहे. या कारवाईत मुंबईतील मुंब्रा व कुर्ला आणि पुण्यातील एका दहशतवाद्याचा समावेश असून, त्यांनी मुंबईची ‘लाइफलाइन’ असलेल्या दादर…

Read More

पुण्यात काळजाचा ठोका चुकवणारा VIDEO:रस्त्यावर उभ्या असलेल्या तरुणीवर अचानक कोसळले झाड, थोडक्यात वाचला जीव

पुण्यातील अभिनव चौकाजवळ एक अत्यंत थरारक आणि काळजाचा ठोका चुकवणारी घटना घडली आहे. रस्त्यावरून उभ्या असलेल्या एका तरुणीवर अचानक एक भलंमोठं झाड कोसळलं. मात्र, काळाने घाला घातला तरी वेळ आली नव्हती, याची प्रचिती या घटनेतून आली असून ही तरुणी या भयंकर दुर्घटनेतून सुदैवाने आणि सुखरूप बचावली आहे. तिला कोणतीही गंभीर दुखापत झालेली नाही. या संपूर्ण…

Read More

विधान परिषदेत 150 कोटींचा घोडेबाजार; संजय राऊतांच्या आरोपाने राजकारणात खळबळ:माघार नाट्यामागे पैशांचा खेळ?

महाराष्ट्र विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील निवडणुकांमध्ये उमेदवारी अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी मोठ्या राजकीय घडामोडी घडल्या. राज्यातील 17 जागांसाठी सुरू असलेल्या निवडणूक प्रक्रियेत 5 जागा बिनविरोध झाल्या असून उर्वरित 12 जागांवर आता थेट लढती रंगणार आहेत. मात्र या सर्व घडामोडींनंतर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केलेल्या गंभीर आरोपांमुळे राज्याच्या राजकारणात मोठी चर्चा…

Read More

आम्हाला लाईनमन म्हणून हिणवू नका…:खासदार ओमराजे निंबाळकरांची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल, तरुण शेतकऱ्याचा थेट सवाल

नुकतेच ठाकरे गटाची (UBT) साथ सोडून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केलेले धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर आणि एका तरुण शेतकऱ्यामधील संभाषणाची ऑडिओ क्लिप सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. एका ट्रान्सफॉर्मर (डीपी – DP) बसवण्याच्या प्रश्नावरून या तरुणाने खासदारांना थेट जाब विचारला असता, ओमराजेंनी “आम्हाला लाइनमन म्हणून हिणवू नका,” असे वक्तव्य केल्याचे या क्लिपमध्ये…

Read More

रोजंदारी करून पाहिलेले खाकी‎वर्दीचे स्वप्न पहिल्याच प्रयत्नात पूर्ण‎:कन्नड तालुक्यातील हतनूर येथील गुंजाळ बंधूंची एकाचवेळी निवड‎

प्रतिनिधी | हतनूर जिद्द, चिकाटी आणि कठोर परिश्रमाच्या जोरावर ग्रामीण भागातील मुले कोणतीही परिस्थिती बदलू शकतात, याचे जिवंत आणि प्रेरणादायी उदाहरण कन्नड तालुक्यातील हतनूर येथे पाहायला मिळाले. अत्यंत गरिबीत, आई-वडिलांसोबत मोलमजुरी करून शिक्षण घेणाऱ्या विष्णू भानुदास गुंजाळ आणि राहुल भानुदास गुंजाळ या दोन सख्ख्या भावांनी पहिल्याच प्रयत्नात भारतीय सैन्य दलाच्या अग्नीवीर भरतीत यश मिळवून स्वप्न…

Read More