Headlines

Terrorists attack soldiers in Kashmir; Three injured in firing, CRPF post attacked near highway in Kulgam


  • Marathi News
  • National
  • Terrorists Attack Soldiers In Kashmir; Three Injured In Firing, CRPF Post Attacked Near Highway In Kulgam

कुलगाम24 मिनिटांपूर्वी

  • कॉपी लिंक

जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी जवानांवर पुन्हा हल्ला केला आहे. ही घटना बुधवारी दुपारी २.१५ च्या सुमारास श्रीनगरपासून ७५ किमी अंतरावरील कुलगाम जिल्ह्यातील मीर बाजारजवळील अखरान येथे घडली. सुरक्षा यंत्रणांच्या संयुक्त तपासात दहशतवादी ५० मीटर अंतरावरील जंगलातून पायी आल्याचे निष्पन्न झाले. त्यांनी सीआरपीएफच्या ४६ व्या बटालियनच्या अखरान चेक पोस्टवर २५ ते ३० फेऱ्या झाडल्या.

या गोळीबारात हेड कॉन्स्टेबल सोमवीर सिंग (मध्य प्रदेश), कॉन्स्टेबल राकेश दास (आसाम) आणि संतोष चंद्रू (पश्चिम बंगाल) हे तीन जवान जखमी झाले असून एकाची प्रकृती गंभीर आहे. हल्ल्यानंतर दहशतवादी जंगलात पळून गेले. हल्ल्याच्या वेळी उपराज्यपाल मनोज सिन्हा घटनास्थळापासून अवघ्या २-३ किमी अंतरावर होते. सुरुवातीला दहशतवादी दुचाकीवरून आल्याचे म्हटले जात होते, मात्र सैन्याला ग्राउंड व्हॅरिफिकेशनमध्ये याचे पुरावे मिळाले नाहीत.

एका जवानाच्या पाठीच्या मणक्यावर गोळी लागली. त्यांची प्रकृती गंभीर असून त्यांना लष्कराच्या रुग्णालयात हलवण्यात आले आहे.

दोन वर्षांत ५४५ दहशतवादी घटना

जम्मू-काश्मीरमध्ये २०२४ पासून आतापर्यंत सुमारे ५४५ दहशतवादी घटना, चकमकी किंवा घुसखोरीचे प्रयत्न नोंदवले गेले आहेत. या दरम्यान विविध दहशतवादी हल्ले आणि मोहिमांमध्ये सुरक्षा दलांचे ४५ जवान शहीद झाले, तर सैन्याच्या कारवाईत १३५ हून अधिक दहशतवादी मारले गेले आहेत.

मुदस्सिर कुल्लू, श्रीनगर| शांत असलेल्या दक्षिण काश्मीरमधील कुलगाम परिसर पुन्हा एकदा सुरक्षा यंत्रणांच्या रडारवर आला आहे. सीआरपीएफवर झालेला ताजा हल्ला दर्शवतो की, उपराज्यपालांची उपस्थिती आणि हायवेची कडक सुरक्षा असूनही दहशतवादी आता थेट संघर्षाऐवजी ‘हिट अँड रन’ ही रणनीती वापरत आहेत. सुरक्षा सूत्रांनुसार, या हल्ल्यामागे स्थानिक नेटवर्कची मुख्य भूमिका आहे. कुलगामच्या लतीफ भटचा यामध्ये सहभाग असल्याचे समोर येत असून, तो पाकिस्तान समर्थित ‘द रेजिस्टेंस फ्रंट’ कडून ऑपरेट करत आहे. परदेशी दहशतवाद्यांकडून स्थानिक तरुणांचा वापर रेकी, लॉजिस्टिक्स आणि अचानक हल्ले करण्यासाठी केला जात आहे. गेल्या पाच महिन्यांत कुलगाम आणि अनंतनागमध्ये झालेला हा तिसरा हल्ला असून, दहशतवादी संघटना आता ठराविक ‘सॉफ्ट टार्गेट्स’ निवडत असल्याचे स्पष्ट होते. संरक्षण तज्ज्ञ निवृत्त कॅप्टन अनिल गौर यांच्या मते, ९०% नेटवर्क उद्ध्वस्त झाल्यानंतरही काही ‘ओव्हर ग्राउंड वर्कर’ अजूनही सक्रिय आहेत. ज्या दहशतवाद्यांनी आता हल्ला केला आहे, तेसुद्धा येत्या एक-दोन आठवड्यांत मारले जातील.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *