Headlines

एसआयआरला पुन्हा मुदतवाढ; प्रारूप यादी आता 24 ऑगस्टला:बीएलओ 17 पर्यंत घेणार मतदारांच्या घरभेटी, प्रशासनाच्या सूचना‎




एक ऑक्टोबर २०२६ या अर्हता दिनांकाच्या अनुषंगाने भारत निवडणूक आयोगाने सुरू केलेल्या मतदार यादीच्या विशेष संक्षिप्त पुनरीक्षण (एसआयआर) कार्यक्रमाला पुन्हा एकदा मुदतवाढ देण्यात आली आहे. नव्या वेळापत्रकानुसार आता १७ ऑगस्टपर्यंत प्रत्येक मतदाराच्या गणना अर्जांची नोंदणी व डीजीटायझेशन केले जाणार असून २४ ऑगस्टला प्रारुप यादी जाहीर केली जाणार आहे. निवडणूक आयोगाने जारी केलेल्या सुधारित कार्यक्रमानुसार बूथ लेव्हल अधिकारी (बीएलओ) यांच्यामार्फत घरोघरी भेटीचा कार्यक्रम १७ ऑगस्टपर्यंत सुरु ठेवला जाईल. या कार्यक्रमाचा प्रारंभ गेल्या ३० जून रोजीच करण्यात आला आहे. बीएलओमार्फत केल्या जाणाऱ्या या कार्यक्रमातून आपोआपच मतदान केंद्रांचे तर्कसंगतीकरण आणि पुनर्रचनादेखील १७ ऑगस्ट रोजी पूर्ण करण्यात येईल. अर्थात या कालावधीत प्राप्त झालेल्या गणना अर्जांचे डीजीटायझेशन पूर्ण करुन जिल्ह्यातील आठही विधानसभा मतदार संघांचा समावेश असलेली प्रारुप यादी २४ ऑगस्ट रोजी प्रसिद्ध केली जाईल. त्यानंतर २४ ऑगस्ट ते २३ सप्टेंबर या महिनाभराच्या कालावधीत दावे व हरकती स्वीकारण्यात येतील. २४ ऑगस्टपासून सुरु होणार असून ती २२ ऑक्टोबरपर्यंत चालेल. अशाप्रकारे सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर अंतिम मतदार यादी २७ ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध करण्यात येणार असल्याचे भारत निवडणूक आयोगाचे प्रतिनिधी या नात्याने जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी कळवले आहे. १.३६ लाख कायमचे बाहेर काढले जाणार जिल्ह्यातील एकूण मतदारांपैकी १ लाख ३६ हजार ५०८ मतदार हे कायमस्वरुपी जिल्ह्याच्या बाहेर गेले आहेत. याशिवाय १ लाख ३ हजार ४०२ मतदार मृत झाले असून ४२ हजार २१७ मतदारांची नावे दोन ठिकाणी आढळून आली आहेत. घरभेटीदरम्यान वारंवार संपर्क करुनही ११ हजार २१७ मतदार आढळून आले नसून ९३३ मतदारांच्या बाबतीत विविध अनियमितता आढळून आल्या आहेत. अर्थात ही सर्व नावे यावेळच्या मतदार यादीत नसतील.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *