Headlines

गवळीशिवऱ्यात चौथ्या श्रावणी शनिवारी महारुद्र मारुतीच्या चरणी भाविक लीन:23 क्विंटल दाळ-बट्टी, साबुदाणा खिचडीच्या महाप्रसादाचा भाविकांनी घेतला लाभ‎



नवसाला पावणाऱ्या गवळीशिवरा (ता. गंगापूर) येथील प्रसिद्ध महारुद्र मारुती मंदिरामध्ये श्रावण महिन्यातील शेवटच्या शनिवारी भाविकांचा अथांग जनसागर उसळला होता. जिल्ह्यातील कानाकोपऱ्यातून तसेच ग्रामीण भागातून आलेल्या तब्बल दीड लाखांहून अधिक भाविकांनी महारुद

.

श्रावणी शनिवारच्या निमित्ताने महाप्रसादाचे भव्य आयोजन करण्यात आले होते. यामध्ये २३ क्विंटल दाळ-बट्टी आणि साबुदाणा खिचडीच्या महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. हिरामण जाधव, रावसाहेब गाजरे, गुंजाळ पाटील, नारायण वाघमारे, ज्ञानेश्वर बोराडे, गणेश सितलबे व राजू गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली हा भंडारा पार पडला.

श्रावण महिन्याच्या सुरुवातीपासूनच मंदिर प्रशासनाने दर्शन रांगा, बॅरिकेट्स, पिण्याचे पाणी आणि निवासाची उत्तम सोय केली होती. बीएमजी अकॅडमी (वसुसायगाव) च्या स्वयंसेवकांनी पार्किंग व दर्शन रांगेवर नियंत्रण ठेवले, तर शिल्लेगाव पोलिसांनी चोख बंदोबस्त सांभाळला. सुरक्षेचा उपाय म्हणून संपूर्ण मंदिर परिसर सीसीटीव्हीच्या निगराणीखाली ठेवण्यात आला होता.

१ तोळा सोन्याचा गंध अर्पण उत्सवाचे मुख्य आकर्षण म्हणजे गंगापूर येथील सराफा व्यापारी महेश अरूणराव उदावंत यांनी महारुद्र मारुतीच्या चरणी १ तोळा सोन्याचा गंध भक्तिभावाने अर्पण केला. याशिवाय सावंगी, माळीवाडगाव, वैरागड व फुलशिवरा येथून आलेल्या पायी दिंड्यांचे मंदिरात उत्साहात स्वागत केले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *