Headlines

पुण्यात 28 लाखांहून अधिक 'अनकलेक्टेबल' मतदार:विशेष पुनरीक्षण कार्यक्रमात मृत, अनुपस्थित, स्थलांतरित मतदारांची माहिती समोर




पुणे जिल्ह्यात मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत २८ लाख ६८ हजार २२३ ‘अनकलेक्टेबल’ मतदार आढळले आहेत. अंतिम एएसडीडी यादीनुसार ही आकडेवारी समोर आली असून, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी याबाबत माहिती दिली आहे. या ‘अनकलेक्टेबल’ मतदारांमध्ये १ लाख ४३ हजार ९७५ मतदारांची दुबार नोंदणी झाली आहे. याशिवाय, ३ लाख १२ हजार ४८ मतदार मयत, १७ लाख ८३ हजार ५८ मतदार अनुपस्थित, ५ लाख ९१ हजार ३८ मतदार स्थलांतरित, तर ३८ हजार १०४ मतदारांनी गणना पत्रक जमा केलेले नाही. जुन्नर विधानसभा मतदारसंघात एकूण ४६ हजार ९४६ ‘अनकलेक्टेबल’ मतदार आहेत. यात १३ हजार ३९४ मयत, ७ हजार ८०० अनुपस्थित, १९ हजार ९४४ स्थलांतरित आणि १२४ इतर मतदारांचा समावेश आहे. आंबेगाव मतदारसंघात ४१ हजार ५०५ ‘अनकलेक्टेबल’ मतदार असून, त्यापैकी ११ हजार ९३५ मयत, ३ हजार ९८५ अनुपस्थित, २० हजार ९६२ स्थलांतरित आणि १११ इतर मतदार आहेत. खेड-आळंदी विधानसभा मतदारसंघात ५६ हजार ०९४ ‘अनकलेक्टेबल’ मतदार नोंदवले गेले आहेत. यात ११ हजार ८३६ मयत, २० हजार ९४५ अनुपस्थित, १४ हजार ६०९ स्थलांतरित आणि ११० इतर मतदार आहेत. शिरूर मतदारसंघात १ लाख ९ हजार ९०२ ‘अनकलेक्टेबल’ मतदार असून, १५ हजार ६२६ मयत, ६६ हजार १३५ अनुपस्थित, १८ हजार ८११ स्थलांतरित आणि ६२८ इतर मतदार आहेत. दौंड विधानसभा मतदारसंघात ५३ हजार ९८४ ‘अनकलेक्टेबल’ मतदार आढळले आहेत. यात १२ हजार ५३ मयत, ९ हजार ३४३ अनुपस्थित, २६ हजार ४२९ स्थलांतरित आणि ७९ इतर मतदार आहेत. इंदापूर मतदारसंघात ५२ हजार २३४ ‘अनकलेक्टेबल’ मतदार असून, त्यापैकी १९ हजार ३०८ मयत, ४ हजार ६०४ अनुपस्थित, २२ हजार ८४४ स्थलांतरित आणि ८९ इतर मतदार आहेत. बारामती विधानसभा मतदारसंघात ४४ हजार ८७१ ‘अनकलेक्टेबल’ मतदार आहेत. यात १२ हजार २७४ मयत, ६ हजार ४४ अनुपस्थित, २० हजार ८९४ स्थलांतरित आणि ९१ इतर मतदारांचा समावेश आहे. पुरंदर मतदारसंघात १ लाख ८७ हजार ४७१ ‘अनकलेक्टेबल’ मतदार असून, १७ हजार ६५६ मयत, १ लाख ४१ हजार ६०५ अनुपस्थित, १८ हजार १५५ स्थलांतरित आणि २ हजार ९०४ इतर मतदार आहेत. भोर विधानसभा मतदारसंघात ९० हजार ८९७ ‘अनकलेक्टेबल’ मतदार आढळले आहेत. यात ११ हजार ३५३ मयत, ४५ हजार ७४८ अनुपस्थित, २५ हजार ५२७ स्थलांतरित आणि ४२० इतर मतदारांचा समावेश आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *