Headlines

संभाजीनगरचे उपमहापौर जंजाळांना जिवे मारण्याची गुंडाकडून धमकी:पुंडलिकनगर ठाण्याबाहेर कार्यकर्त्यांचा ठिय्या




संभाजीनगरचे उपमहापौर राजेंद्र जंजाळ यांना मारण्यासाठी पाच लाखांची सुपारी घेतल्याची आणि दहा लाख रुपयांची खंडणी न दिल्यास जिवे मारण्याची धमकी देणारा व्हिडिओ कॉल शुक्रवारी (२३ ऑक्टोबर) आला. या धक्कादायक प्रकारानंतर जंजाळ यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी रात्री ९ वाजेपासून मध्यरात्री उशिरापर्यंत पुंडलिक नगर पोलिस ठाण्यासमोर ठिय्या मांडून आरोपीच्या तत्काळ अटकेची मागणी केली. याप्रकरणी पुंडलिक नगर ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती. जंजाळ यांच्या फोनवर हा धमकीचा व्हिडिओ कॉल आला होता. फोनमध्ये स्क्रीन रेकॉर्डिंग शक्य नसल्याने त्यांनी प्रसंगावधान राखून दुसऱ्या मोबाइलवर हे संपूर्ण संभाषण रेकॉर्ड केले. यानंतर त्यांनी थेट पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांच्याकडे तक्रार करत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. तसेच, पोलिस सराईत गुन्हेगारांवर कारवाई करण्यात असक्षम ठरत असल्याचा आरोपही जंजाळ यांनी केला. यावेळी ठाण्याबाहेर आदित्य दहीवाल, सुनील कोटकर आदी कार्यकर्त्यांनी गर्दी करत जोरदार घोषणाबाजी केली. धमकी देणारा सराईत, एमपीडीएमधील गुन्हेगार ही धमकी गारखेड्यातील कुख्यात गुंड पवन जयस्वाल याने दिल्याची माहिती आहे. त्याच्यावर एमपीडीए आणि हद्दपारीसारख्या गंभीर कारवायाही झाल्या आहेत. कार्यकर्त्यांची गर्दी जमलेली असतानाही पवनने जंजाळ यांना दुसरा फोन करून धमकी दिली.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *