Headlines

यूकेची व्हिस्की-कार भारतात 27 दिवसांनंतर स्वस्त मिळतील:भारत-यूके दरम्यान मुक्त व्यापार करार 15 जुलैपासून लागू होईल; जाणून घ्या कोणत्या वस्तूंच्या किमती बदलतील

भारतात यूकेच्या गाड्या, व्हिस्की, कपडे आणि पादत्राणे २७ दिवसांनी स्वस्त मिळतील. कारण, भारत-यूके दरम्यानचा मुक्त व्यापार करार १५ जुलैपासून लागू होईल. म्हणजेच या दिवसापासून भारताच्या ९९% वस्तूंना यूकेमध्ये शून्य शुल्कावर निर्यात केले जाईल. तर यूकेच्या ९९% वस्तू सरासरी ३% शुल्कावर आयात केल्या जातील. यामुळे २०३० पर्यंत द्विपक्षीय व्यापार दुप्पट होऊन १२० अब्ज डॉलरपर्यंत पोहोचण्याची शक्यता…

Read More

मुख्यमंत्री फडणवीस यांचे पालखेड विजय स्मारकास सर्वतोपरी सहकार्य:बाजीराव पेशवे यांच्या अश्वारूढ पुतळ्याच्या अनावरणास उपस्थित राहणार

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पालखेड येथे उभारण्यात येत असलेल्या श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांच्या ऐतिहासिक विजय स्मारकाचे काम लवकरच पूर्ण होणार आहे. स्मारकाच्या कामासाठी सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले असून, स्मारक पूर्ण झाल्यानंतर उभारण्यात येणाऱ्या श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांच्या अश्वारूढ पुतळ्याच्या अनावरण सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहण्याची तयारीही त्यांनी दर्शविली…

Read More

फ्रान्समध्ये पंतप्रधान मोदींचा ताफा थांबवण्याचा कट नाकाम:पोलिसांनी खालिस्तानींना अटक केली; G7 शिखर परिषदेदरम्यान घेराव घालणार होते

फ्रान्समध्ये G7 शिखर परिषदेदरम्यान पोलिसांनी प्रतिबंधित संघटना ‘सिख फॉर जस्टिस’ (SFJ) शी संबंधित खलिस्तान समर्थकांना अटक केली आहे. फ्रान्सच्या गुप्तचर संस्थेनुसार, हे सर्व पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यादरम्यान त्यांच्या ताफ्याला अडवण्याचा कट रचत होते. फ्रान्स पोलिसांच्या अधिकाऱ्यांनुसार, पंतप्रधान मोदी आणि कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी यांच्या भेटीनंतर हे खलिस्तानी समर्थक निदर्शने करणार होते. आणि पंतप्रधान मोदींच्या ताफ्याला घेराव…

Read More

पुणे रेल्वे स्थानकाची क्षमता दुप्पट होणार:मुख्यमंत्री, रेल्वेमंत्र्यांच्या हस्ते पुणे-शिर्डी एक्सप्रेसचा शुभारंभ, विकासकामांचे भूमिपूजन

पुणे-साईनगर शिर्डी एक्सप्रेस रेल्वेसेवेचा शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी बोलताना रेल्वेमंत्री वैष्णव यांनी सांगितले की, पुणे रेल्वे स्थानकाची क्षमता दुप्पट होणार असून, येथे ६ नवीन प्लॅटफॉर्म तयार केले जातील आणि सध्याच्या ६ प्लॅटफॉर्मची लांबी वाढवण्यात येईल. पुण्याची मोठी लोकसंख्या लक्षात घेता येथे मेगा टर्मिनस उभारणीच्या…

Read More

एक रील बनवण्यासाठी ओरी 76 लाख रुपये घेतो:म्हणाला- लग्न-वाढदिवसाच्या पार्टीत बोलावल्यास 25 लाख रुपये घेतो

सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर ओरी, ज्याचे खरे नाव ओरहान अवत्रामणी आहे, तो बऱ्याच काळापासून त्याची कमाई आणि व्यवसायाबद्दल चर्चेत आहे. आता त्याने स्वतःच खुलासा केला आहे की, तो पैसे कसे कमावतो. एका पॉडकास्टमध्ये ओरीने सांगितले की, ब्रँड एंडोर्समेंट आणि स्पॉन्सर्ड कंटेंट हे त्याच्या कमाईचे मोठे साधन आहे. त्याने एका रीलसाठी ७६ लाख रुपयांपर्यंत शुल्क घेतल्याचे मान्य…

Read More

Rahul Gandhi Slams Education System in Kota

Marathi News National Rahul Gandhi Slams Education System In Kota | Highlights Student Pressure & NEET Leak कोटा9 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी कोटा येथील दसरा मैदानावर विद्यार्थ्यांशी संवाद साधत आहेत. ‘छात्रों की गूंज’ या कार्यक्रमात राहुल गांधी म्हणाले- हा कार्यक्रम राजकारणाचा नाही, तर तरुण आणि विद्यार्थ्यांचा आवाज उठवण्यासाठी एक व्यासपीठ आहे….

Read More

कळमेश्वर-ब्राह्मणी नगरपरिषद कार्यालयाला भीषण आग:शॉर्टसर्किटमुळे दप्तर जळून खाक, लाखो रुपयांचे नुकसान; सखोल चौकशीची मागणी

नागपूर येथील कळमेश्वर-ब्राह्मणी नगरपरिषद कार्यालयाला शॉर्टसर्किटमुळे भीषण आग लागली. यात नगराध्यक्षांचे केबिन, संगणक, फर्निचर आणि महत्त्वाचे दस्तावेज जळून खाक झाले असून, लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. ऐन पावसाळ्याच्या सुरुवातीला लागलेल्या या आगीमुळे शहरात उलट-सुलट चर्चा सुरू झाली असून, नागरिकांकडून सखोल चौकशीची मागणी होत आहे. पहाटे कार्यालयातून धूर निघत असल्याचे रात्रपाळीतील कर्मचारी गुंडेराव कुमरे यांच्या निदर्शनास…

Read More

गरम रसात पडून 60 टक्के भाजलेला चिमुकला:हृदयाचे ठोके थांबूनही पुण्यातील डॉक्टरांनी दिले नवे आयुष्य

पुण्यात एका तीन वर्षांच्या बालकाला डॉक्टरांनी नवजीवन दिले आहे. घरात खेळताना गरम चिंचेच्या रसात पडून तो ६० टक्के भाजला होता. प्राथमिक उपचारादरम्यान त्याचे हृदयाचे ठोकेही थांबले होते. पुण्यातील अंकुरा हॉस्पिटलमधील डॉक्टरांनी ४० दिवसांहून अधिक काळ उपचार करून त्याला मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढले. आता त्याला रुग्णालयातून सुखरूप डिस्चार्ज देण्यात आला आहे. थेरगाव येथील रहिवासी असलेल्या हरीश…

Read More

एल निनोमुळे चारा टंचाईची शक्यता, पशुपालकांनी लक्ष द्यावे:पशुधन व दुग्धोत्पादन सुरक्षित ठेवण्यासाठी नियोजन आवश्यक

जागतिक हवामान बदलामुळे निर्माण होणाऱ्या ‘एल निनो’च्या संभाव्य संकटामुळे आगामी काळात चारा टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. या परिस्थितीचा पशुधन व दुग्धोत्पादनावर विपरीत परिणाम होऊ नये, यासाठी राज्यातील सर्व पशुपालकांनी आतापासूनच सतर्क राहून चारा पिकांचे नियोजन करावे, असे आवाहन पशुसंवर्धन आयुक्त डॉ. किरण पाटील यांनी केले आहे. पशुपालकांना या संकटाचा सामना समर्थपणे करता यावा, यासाठी…

Read More

देवांशने 44 सेकंदात 24 देशांची चलने ओळखली:लाखांदूरच्या देवांशची 'इंडिया वर्ल्ड रेकॉर्ड'मध्ये नोंद

भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर येथील देवांश शिवशंकर कलंत्री याने डोळे बंद करून ४४ सेकंदात जगातील २४ देशांची चलने अचूक ओळखण्याचा विक्रम केला आहे. या कामगिरीमुळे त्याची ‘इंडिया वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये नोंद झाली आहे. देवांशने ‘मिड ब्रेन ॲक्टिव्हेशन’ तंत्राचा वापर करून हे कौशल्य आत्मसात केले. डोळ्यांवर पट्टी बांधलेली असतानाही, समोर ठेवलेली विविध देशांची नाणी आणि नोटा तो अचूकपणे…

Read More