Headlines

पुण्यामध्ये भोंदूबाबाने महिलेचा अमानुष छळ करत मूत्र पाजले:भोंदूला अटक, मारहाण करत विजेचे शॉकही दिले

ईश्वराचा अवतार असल्याचे सांगत एका उच्चशिक्षित महिलेवर भोंदूबाबाने लैंगिक अत्याचार केल्याचे उघडकीस आले आहे. महिलेचा अमानुष छळ करत तिला स्वत:चे मूत्र पाजले. अनेकदा मारहाण करत विजेचा शॉक दिल्याचे समोर आले आहे. राधामोहन मिश्रा (५९, रा. माउली सदन, गट नं. १३४४/७, रेणुका पार्क, आरव ॲम्बियसजवळ, उबाळेनगर, पुणे) असे या भोंदूचे नाव आहे. तर त्याचा साथीदार स्वामी…

Read More

श्रीगोंदेत चारित्र्याच्या संशयावरून अल्पवयीन प्रेयसीची निर्घृण हत्या, मृतदेह जाळला:पुरावा नष्ट करण्यासाठी बापानेही केली मदत, तिघांवर गुन्हा

श्रीगोंदेत एका 17 वर्षीय अल्पवयीन मुलीची तिच्याच 24 वर्षीय प्रियकराने चारित्र्याच्या संशयावरून निर्घृण हत्या केली. इतकेच नव्हे, तर या गुन्ह्याचा पुरावा नष्ट करण्यासाठी आरोपीने आपल्या बापाच्या मदतीने तिचा मृतदेह जंगलात नेऊन पेट्रोल टाकून जाळला. या प्रकरणी श्रीगोंदे पोलिसांनी मुख्य आरोपी शुभम सुखदेव ओहळ आणि त्याला मृतदेहाची विल्हेवाट लावण्यास मदत करणारे त्याचे वडील सुखदेव ओहळ या…

Read More

घाटी रक्तपेढीचा राष्ट्रीय पातळीवर गौरव:अहमदाबाद येथील परिषदेत उत्कृष्ट कार्यासाठी सन्मानित

छत्रपती संभाजीनगर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (घाटी) अंतर्गत असलेल्या प्रादेशिक रक्तपेढीने राष्ट्रीय स्तरावर महत्त्वपूर्ण कामगिरी केली आहे. अहमदाबाद येथे १६ जून २०२६ रोजी आयोजित राष्ट्रीय स्वयंसेवी संस्था परिषदेत देशभरातील शासकीय रक्तपेढ्यांमध्ये या रक्तपेढीला गौरवण्यात आले. वर्ष २०२५ मधील उत्कृष्ट कार्यक्षमता, दर्जेदार सेवा आणि स्वेच्छा रक्तदान चळवळीचा प्रभावी प्रसार या योगदानासाठी हा सन्मान प्रदान…

Read More

स्मार्ट मीटरवरून शहर काँग्रेस आक्रमक:नागरिकांच्या इच्छेविरुद्ध बसवल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा

छत्रपती संभाजीनगर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीने महावितरण प्रशासनाला निवेदन दिले आहे. शहरातील नागरिकांना भेडसावणाऱ्या स्मार्ट मीटर आणि वीज मीटर संदर्भातील विविध समस्यांबाबत हे निवेदन देण्यात आले. काँग्रेसने निवेदनात नमूद केले आहे की, नागरिकांच्या इच्छेविरुद्ध स्मार्ट मीटर बसवण्याची प्रक्रिया, नवीन मीटर मिळण्यास होणारा विलंब, खराब व बंद मीटर वेळेत न बदलणे, चुकीचे मीटर रीडिंग, वाढीव वीज…

Read More

जनावरांच्या सोनोग्राफी मशीनवर महिलांचे गर्भलिंग निदान:गर्भपात रॅकेटप्रकरणी महिला डॉक्टरला अटक; आतापर्यंत चौघांना बेड्या

पुणे, सातारा आणि अहिल्यानगर या जिल्ह्यांमध्ये उघडकीस आलेल्या आणि संपूर्ण राज्यात खळबळ उडवून देणाऱ्या बेकायदेशीर गर्भलिंग निदान व गर्भपात रॅकेटप्रकरणी पुणे ग्रामीण पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. या गंभीर गुन्ह्यात पोलिसांनी केडगाव चौफुला येथील प्रसिद्ध असलेल्या ‘पार्थ हॉस्पिटल’च्या संचालिका डॉ. संगीता पांडुरंग गायकवाड यांना अटक केली आहे. गर्भात मुलगी असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर, संबंधित गर्भवती महिलांना…

Read More

फुली सेल्फ ड्राइव टेस्ला मॉडेल YL ची डिलिव्हरी सुरू:6 सीटर इलेक्ट्रिक एसयूव्ही एका चार्जवर 681 किमी धावेल; सुरुवातीची किंमत ₹61.99 लाख

एलन मस्कची EV कंपनी टेस्ला इंडियाने भारतात आपली सर्वात लांब इलेक्ट्रिक SUV मॉडेल YL ची डिलिव्हरी सुरू केली आहे. ही भारतात टेस्लाची पहिली कार ‘मॉडेल वाय’ ची अधिक प्रशस्त आणि थ्री-रो आवृत्ती आहे. याचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे याची 681 किमीची रेंज आणि 6-सीटर सीटिंग लेआउट आहे. टेस्ला मॉडेल वाय एल ची एक्स-शोरूम प्रारंभिक किंमत…

Read More

जिल्हा परिषदेत नशा करणाऱ्यांवर सीईओंची कारवाई:मिन्नू पी.एम. यांचा इशारा: पेन्शनही मिळणार नाही

जिल्हा परिषद किंवा पंचायत समितीसह कोणत्याही कार्यालयात नशा करून येणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल आणि त्यांना पेन्शनही मिळू दिली जाणार नाही, असा इशारा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिन्नू पी.एम. यांनी स्थायी समितीच्या बैठकीत दिला. स्थायी समितीच्या बैठकीत शिवसेनेचे सदस्य संजय निकम यांनी जिल्हा परिषदेतील काही कर्मचारी नशा करून येतात, असा आरोप केला. काही…

Read More

खत बुकिंग ॲपमुळे शेतकरी त्रस्त; तात्पुरती स्थगितीची मागणी:खासदार डॉ. कल्याण काळे, संदीपान भुमरे यांची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात प्रायोगिक तत्त्वावर सुरू असलेल्या खत बुकिंग मोबाईल प्रणालीमुळे शेतकरी आणि खत विक्रेते त्रस्त झाले आहेत. खरीप हंगामाच्या तोंडावर या ॲपमुळे शेतकऱ्यांना खतांसाठी कृषी सेवा केंद्रांवर हेलपाटे मारावे लागत आहेत. ही गंभीर बाब लक्षात घेऊन, ही प्रणाली चालू खरीप हंगाम संपेपर्यंत तात्पुरती स्थगित करावी, अशी मागणी छत्रपती संभाजीनगरचे खासदार डॉ. कल्याण काळे आणि…

Read More

अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाविरोधात 59 जातींचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा:आरक्षण संपवण्याचे षडयंत्र असल्याचा आरोप; शासनाविरोधात तीव्र रोष व्यक्त

अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाच्या विरोधात ५९ जातींच्या नागरिकांनी आज, बुधवारी अमरावतीत तीव्र रोष व्यक्त केला. आरक्षण संपवण्याचे षडयंत्र हाणून पाडण्याचा निर्धार करत जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला. या संयुक्त महामोर्चाचे नेतृत्व खासदार बळवंतराव वानखडे, विद्यापीठ ऑफीसर्स फोरमचे डॉ. नितीन कोळी, रविकांत गवई, सुधाकर तलवारे, रमेश कटके, प्रा. जगदीश गोवर्धन, प्रा. बंडू गवई आणि नयन मोंढे…

Read More

संयुक्त किसान मोर्चाचे विभागीय आयुक्तालयावर निदर्शने:रविकांत तुपकर यांच्याशी शासनाने तातडीने चर्चा करावी, मागणी

संयुक्त किसान मोर्चाने बुधवारी, १७ जून रोजी विभागीय आयुक्त कार्यालयावर निदर्शने केली. शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्याशी शासनाने तातडीने बोलणी करावी, अशी प्रमुख मागणी यावेळी करण्यात आली. तुपकर यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठी बुलढाणा येथे बेमुदत उपोषण सुरू केले आहे. उपोषणामुळे रविकांत तुपकर यांची प्रकृती खालावत असून, शासनाने त्यांच्या आंदोलनाची गंभीर दखल घ्यावी, असे आवाहन आंदोलकांनी केले….

Read More