Headlines

कर्जमाफीसाठी शेतकरी संघटना आक्रमक:अमरावतीत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मंत्र्यांचा पुतळा जाळण्याचा प्रयत्न

अमरावती येथे १७ जून रोजी शेतकरी संघटनेने राज्य सरकारच्या शेतकरीविरोधी धोरणांविरोधात तीव्र आंदोलन केले. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर झालेल्या या निदर्शनांमध्ये आंदोलकांनी मंत्र्यांचा पुतळा जाळण्याचा प्रयत्न केला. ‘सरकार हाय हाय’, ‘शेतकऱ्यांना न्याय मिळालाच पाहिजे’ अशा घोषणा देत आंदोलकांनी नंतर पुतळ्याचे दहन करून सरकारचा निषेध नोंदवला. हे आंदोलन शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी सुरू केलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी…

Read More

शेतकरी विकास मंचाचे मुख्यमंत्र्यांना सरसकट कर्जमाफीसाठी निवेदन:योजनेतील अटींमुळे सर्व शेतकऱ्यांना लाभ नाही, आरोप

राज्य शासनाने जाहीर केलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ मधील निकषांमुळे सर्व शेतकऱ्यांना अपेक्षित लाभ मिळणार नसल्याचा आरोप करत, शेतकरी विकास मंचने चांदूर बाजारच्या तहसीलदार यांच्यामार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन सादर केले आहे. यामध्ये सरसकट कर्जमाफीची मागणी करण्यात आली आहे. निवडणूक काळात सरकारने शेतकऱ्यांचा सात बारा कोरा करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र,…

Read More

शेलूबाजार येथे तोतया अन्न प्रशासन अधिकाऱ्याचा पर्दाफाश:कारवाईच्या नावाखाली व्यापाऱ्यांकडून पैशांची मागणी, नागरिकांकडून चोप

राज्याच्या अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त म्हणून तुकाराम मुंडे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर भेसळयुक्त अन्नपदार्थ विक्रेत्यांविरोधात राज्यभर कारवाईचा धडाका सुरू आहे. या पार्श्वभूमीवर काही भामटे स्वतःला अन्न व औषध प्रशासन विभागाचे अधिकारी म्हणून भासवून व्यापारी व व्यावसायिकांची फसवणूक करण्याचा प्रयत्न करत असल्याचे प्रकार समोर येत आहेत. असाच एक प्रकार गुरुवारी वाशिम जिल्ह्यातील मंगरुळपीर तालुक्यातील शेलूबाजार…

Read More

'ऑपरेशन टायगर फुलप्रूफ, तांत्रिक बाबींमुळे पुरावे दिले नाहीत!':ठाकरेंचे डावपेच बघूनच पुढचे पाऊल; शिवसेना शिंदे गटाची सावध भूमिका

महाराष्ट्रात ऑपरेशन टायगरने खळबळ उडवली असून शिवसेना ठाकरे गटात मोठे खिंडार पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. एकीकडे ठाकरे गटाकडून दावा केला जात आहे की सर्व खासदार आमच्यासोबत आहेत, तर दुसरीकडे शिंदे गटाकडून ऑपरेशन टायगर यशस्वी झाल्याचा दावा केला जात आहे. शिवसेनेचे ऑपरेशन टायगर हे यशस्वी झाले असून काही तांत्रिक अडचणींमुळे त्याचे पुरावे समोर आणले नाहीत….

Read More

पार्वतीनगर 'डक फूट बेन्ड' दुरुस्ती अंतिम टप्प्यात:आज सकाळी चाचणी, उद्यापासून पाणीपुरवठा पूर्ववत

अमरावती येथील पार्वतीनगर परिसरातील नागरिकांना लवकरच पाणीपुरवठा पूर्ववत होणार आहे. जलकुंभाच्या ‘डक फूट बेन्ड’ दुरुस्तीचे काम अंतिम टप्प्यात असून, आज (गुरुवारी) काही प्रमाणात तर उद्या (शुक्रवारी) पूर्ण क्षमतेने पाणीपुरवठा केला जाईल, अशी माहिती महाराष्ट्र जीवन प्राधिकरण (मजीप्रा) अधिकाऱ्यांनी दिली. गेल्या दोन दिवसांपासून ‘डक फूट बेन्ड’ला गळती लागल्यामुळे या भागातील पाणीपुरवठा खंडित झाला होता. दुरुस्तीचे काम…

Read More

विधान परिषद मतदान; 637 मतदार बजावणार हक्क:औरंगाबाद-जालना मतदारसंघात 13 केंद्रांवर तीन उमेदवार रिंगणात

आज (१८ जून) रोजी औरंगाबाद-जालना स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघासाठी विधान परिषदेचे मतदान होणार आहे. सकाळी ८ ते दुपारी ४ या वेळेत दोन जिल्ह्यांतील १३ मतदान केंद्रांवर एकूण ६३७ मतदार आपला मतदानाचा हक्क बजावतील. या निवडणुकीत तीन उमेदवार रिंगणात आहेत. मतदानाच्या पूर्वसंध्येला बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयात निवडणूक अधिकाऱ्यांचे तिसरे प्रशिक्षण पार पडले. त्यानंतर दुपारी मतदान साहित्याचे वाटप…

Read More

सीईओ सत्यम गांधींकडून दर्यापूरमधील विकासकामांची तपासणी:आरोग्य, घरकुल, नरेगा, स्वच्छता योजनांच्या अंमलबजावणीची प्रत्यक्ष पाहणी

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) सत्यम गांधी यांनी मंगळवारी दर्यापूर तालुक्याचा दौरा केला. या दौऱ्यात त्यांनी विविध विकासकामांची प्रत्यक्ष पाहणी केली. प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामपंचायती, पंचायत समिती कार्यालय आणि विविध विभागांच्या योजनांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. या दौऱ्याची सुरुवात येवदा येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या भेटीने झाली. परिसरातील अस्वच्छता पाहून सीईओ गांधी यांनी तीव्र नाराजी…

Read More

तुकाराम मुंढे यांची बदली करू नका:चांदूर बाजार काँग्रेसची तीन वर्षांसाठी मागणी

अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांची पुढील तीन वर्षे बदली करू नये, अशी मागणी चांदूर बाजार तालुका ग्रामीण काँग्रेसने केली आहे. या संदर्भात तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. मुंढे यांनी पदभार स्वीकारल्यापासून राज्यभरात गुटखा माफिया, भेसळखोर आणि बनावट औषधी रॅकेटविरोधात धडक कारवाया केल्या आहेत. दूध, पनीर, खवा आणि इतर खाद्यपदार्थांमध्ये भेसळ करणाऱ्यांवरही त्यांनी…

Read More

अमरावती विधान परिषद निवडणूक: 7 केंद्रांवर मतदान:22 जूनला मतमोजणी; काँग्रेसच्या चुप्पीमुळे महायुतीत उत्साह, बाजोरियांची याचिका मागे

अमरावती स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणुकीसाठी आज, गुरुवार, १८ जून रोजी मतदान होणार आहे. जिल्ह्यात सकाळी ८ वाजता सात केंद्रांवर मतदानाला सुरुवात होईल. या निवडणुकीचा निकाल २२ जून रोजी मतमोजणीनंतर जाहीर केला जाईल. दरम्यान, सर्वांचे लक्ष लागलेल्या बाजोरिया प्रकरणात नवीन वळण आले असून, त्यांनी आपली याचिका मागे घेतली आहे. या निवडणुकीच्या रिंगणात तीन उमेदवार…

Read More

ऑपरेशन टायगर यशस्वी झालेय तर चेहरे दाखवा:आमचे सर्वच्या सर्व 9 खासदार आमच्यासोब, खासदार अरविंद सावंतांचा दावा

शिवसेनेतील ‘ऑपरेशन टायगर’वरून राजकीय वर्तुळात अद्यापही संभ्रम कायम असून, ठाकरे गटाचे खासदारही यावर उघडपणे बोलणे टाळत आहेत. या पार्श्वभूमीवर, खासदार संजय राऊत आणि अरविंद सावंत यांनी पत्रकार परिषद घेत उद्याच्या बैठकीसाठी सर्व खासदारांना अधिकृत व्हीप बजावला आहे. तसेच ‘आता राडा होईल’ असा थेट इशारा राऊत यांनी फुटण्याच्या तयारीत असलेल्या खासदारांना दिला आहे. एकीकडे, अरविंद सावंत…

Read More