Headlines

देशात 90, महाराष्ट्रात 98% पाऊस; पण यंदा खंडही मोठे:नैऋत्य मान्सून येत्या 2 ते ३ दिवसांत केरळममध्ये; संभाजीनगरला वादळी पावसाचा तडाखा

देशाची अर्थव्यवस्था आणि शेतीसाठी अत्यंत महत्त्वाचा असलेला नैऋत्य मान्सून येत्या २ ते ३ दिवसांत केरळमच्या मार्गे देशात प्रवेश करू शकतो. यंदा प्रशांत महासागरातील ‘एल निनो’च्या प्रभावामुळे देशभरात सरासरीपेक्षा कमी (९०%) पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला तरी, महाराष्ट्रासाठी मात्र एक मोठी आणि दिलासादायक बातमी आहे. राज्यात आणि विशेषतः मराठवाड्यात यंदा सरासरीच्या तब्बल ९८ टक्के पाऊस पडण्याची…

Read More

काॅर्पोरेट जिहाद; मतीनसहघरमालक हनीफची चाैकशी:निदा खानने आश्रय घेतलेल्या घराचा मालक हनीफ म्हणाला, मतीनने घर कुणाला दिले माहिती नाही

काॅर्पोरेट जिहाद प्रकरणातील प्रमुख संशयित निदा खानला छत्रपती संभाजीनगर येथे अाश्रय दिल्याप्रकरणी साेमवारी पुन्हा एमआयएमचा नगरसेवक मतीन पटेल व घरमालक हनीफ शेख यांची विशेष पथकाकडून तपासणी झाली. ‘मतीन भाई ने घर की चाबी मांगी थी, मुझे मालूम नहीं किसको घर दिया’ असा जबाब हनीफने दिला. मात्र त्याच्याच घरात निदा खानने वास्तव्य केल्याचे निष्पन्न झाल्याने त्याला…

Read More

Tiffany Trump Ambanis Guest at Vantara, Jamnagar; Donald Trump Daughter Visits Gujarat

Marathi News National Tiffany Trump Ambanis Guest At Vantara, Jamnagar; Donald Trump Daughter Visits Gujarat जामनगर4 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची धाकटी मुलगी टिफनी ट्रम्प पती मायकल बोलोस यांच्यासोबत सोमवारी दुपारी गुजरातमधील जामनगर येथे पोहोचल्या. येथे त्या अंबानी कुटुंबाच्या पाहुण्या असतील. टिफनी रिलायन्सच्या वनताराला भेट देऊन रात्र येथेच घालवतील. यापूर्वी, रविवारी संध्याकाळी…

Read More

तुकाराम मुंढे पॅटर्नचा धडाका:'मिसलीडिंग' जाहिराती देणारे ब्रँड आणि कलाकार रडारवर, ग्राहकांची फसवणूक टाळण्यासाठी मोठे पाऊल

आपल्या शिस्तबद्ध आणि धडाकेबाज कार्यशैलीसाठी ओळखले जाणारे सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांनी अन्न व औषध प्रशासनाच्या (FDA) आयुक्तपदाचा पदभार स्वीकारताच पहिल्या दिवसापासून ॲक्शन मोडमध्ये आले आहेत. पदभार स्वीकारल्याच्या अवघ्या दोनच दिवसांत मुंढे यांनी अवैध गुटखा आणि भेसळखोरांविरुद्ध मोहिमेचा धडाका लावला असून, आता त्यांचा मोर्चा ग्राहकांची दिशाभूल करणाऱ्या भ्रामक जाहिरातींकडे वळला आहे. ब्रँडच्या नावाखाली मोठमोठी आश्वासने…

Read More

अकरावी प्रवेशाच्या पहिल्या फेरीसाठी दोन दिवस शिल्लक:3 जून ही प्रवेश निश्चितीची अंतिम मुदत, अमरावतीत एकूण 43 हजार 110 जागा उपलब्ध

केंद्रीय ऑनलाईन पद्धतीने सुरू असलेल्या अकरावी प्रवेशाच्या पहिल्या सर्वसाधारण यादीतील विद्यार्थ्यांसाठी प्रवेश निश्चितीसाठी आता केवळ दोनच दिवस शिल्लक आहेत. ही यादी दोन दिवसांपूर्वी जाहीर करण्यात आली होती, ज्यात विद्यार्थ्यांना अलॉट झालेल्या महाविद्यालयांचा उल्लेख आहे. जिल्ह्यातील एकूण ३३९ महाविद्यालयांमध्ये अकरावीसाठी ४३ हजार ११० जागा उपलब्ध आहेत. यामध्ये विज्ञान शाखेच्या सर्वाधिक १८ हजार ५७० जागा, कला शाखेच्या…

Read More

अमरावती विधान परिषद:महायुतीत फूट, दोन उमेदवार रिंगणात; भाजपचे प्रवीण पोटे, शिंदे सेनेचे विप्लव बाजोरिया आमने-सामने

अमरावती स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीत फूट पडल्याचे चित्र समोर आले आहे. भाजपने प्रवीण पोटे यांना उमेदवारी दिली असताना, शिंदे गटाचे उपनेते गोपीकिशन बाजोरिया यांचे पुत्र विप्लव बाजोरिया यांनीही अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यामुळे महायुतीमधील मतभेद उघड झाले आहेत. प्रवीण पोटे यांच्या उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या वेळी महायुतीमधील घटक पक्ष…

Read More

पिनराई विजयन यांच्या घरावर ईडीची धाड:माकप कार्यकर्त्यांकडून राजकमल चौकात निदर्शने, केंद्र सरकारवर सूडबुद्धीचा आरोप

अमरावती येथे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या (माकप) कार्यकर्त्यांनी केरळचे माजी मुख्यमंत्री आणि पक्षाचे पॉलिट ब्युरो सदस्य कॉ. पिनराई विजयन यांच्या घरावर अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) टाकलेल्या धाडीविरोधात निदर्शने केली. राजकमल चौकात धरणे आंदोलन करत कार्यकर्त्यांनी केंद्र सरकारवर राजकीय सूडबुद्धीने केंद्रीय संस्थांचा गैरवापर केल्याचा आरोप केला. माकप कार्यकर्त्यांच्या मते, ही कारवाई राजकीय कटकारस्थानाचा भाग असून, भांडवली धोरणांना पाठिंबा…

Read More

टाकरखेडा संभूमध्ये तीव्र पाणीटंचाई:नवीन जलकुंभ बंद, नागरिक संतप्त; समस्या न सुटल्यास ग्रामस्थांकडून उपोषणाचा इशारा

टाकरखेडा संभू येथे गेल्या अनेक दिवसांपासून तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या १०५ गावे प्रादेशिक ग्रामीण पाणीपुरवठा योजनेत समावेश असूनही, नियोजनाअभावी नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. यामुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप असून, समस्या न सुटल्यास आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. सुमारे सात हजार लोकसंख्या असलेल्या या गावात सध्या दीड लाख…

Read More

Govt Order for MIDC Inclusion

मराठा आरक्षणाच्या लढ्यात बलिदान देणाऱ्या आंदोलकांच्या कुटुंबीयांसाठी राज्य सरकारने एक मोठा दिलासादायक निर्णय घेतला आहे. या आंदोलनादरम्यान मृत्यू झालेल्या आंदोलकांच्या पात्र वारसांना आता महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळात (MIDC) अनुकंपा तत्त्वावर नोक . मराठा आरक्षणासाठी अंतरवाली सराटी येथे उपोषणास बसलेले मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलनातील मृतांच्या वारसांना शासकीय सेवेत सामावून घेण्याची प्रमुख मागणी केली होती. यापूर्वी…

Read More

अमरावतीतील महायुतीचा विजय सर्वात मोठा असेल:राणा दाम्पत्य महायुतीसोबतच राहतील – पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

महायुतीचे उमेदवार प्रवीण पोटे यांनी नामांकन दाखल केल्यानंतर पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना ते म्हणाले की, अमरावती मतदारसंघातील महायुतीचा विजय आतापर्यंतच्या विजयांमध्ये सर्वात मोठा असेल. बावनकुळे यांनी दावा केला की, भाजप, शिंदे सेना आणि अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील महायुतीचे उमेदवार म्हणून पोटे मैदानात आहेत. कोरोना काळात त्यांनी मोफत आरोग्य सेवा पुरवली,…

Read More