पुण्यात मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त ५,२४८ रक्तपिशव्या संकलित:भाजपच्या ४८ केंद्रांवर भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन
पुणे शहरात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ५६व्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पक्षाने आयोजित केलेल्या रक्तदान शिबिराला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. शहरातील २६ मंडलांमधील ४८ केंद्रांवर एकूण ५,२४८ रक्तपिशव्यांचे संकलन करण्यात आले. हा उपक्रम पुणे शहरातील सर्वात मोठ्या रक्तदान मोहिमांपैकी एक ठरला. भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली राज्यभरात या रक्तदान मोहिमेचे आयोजन करण्यात आले…