कळमनुरीत दोन गटात हाणामारीनंतर गोळीबार:एक ठार 4 जखमी, पोलिस बंदोबस्त वाढविला, 7 जण ताब्यात
कळमनुरी शहरातील बसस्थानक परिसरात दोन गटात झालेल्या हाणामारीनंतर गोळीबार झाल्याने एक जण ठार तर चौघे जण जखमी झाल्याची घटना बुधवारी ता. 15 रात्री साडे आकरा ते पावनेबारा वाजण्याच्या सुमारास घडली आहे. यामध्ये दोन जखमींना तातडीने उपचारासाठी हिंगोलीच्या शासकिय रुग्णालयात हलविण्यात आले आहे. कळमनुरी शहरात मोठा पोलिस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. पोलिसांनी तातडीने सात जणांना ताब्यात…