शाळेच्या पहिल्याच दिवशी खोलीचा स्लॅब कोसळला:मुख्याध्यापकांना कारणे दाखवा नोटीस; लोखंडी गज पूर्णपणे गंजले; भिंतींनाही तडे
. तालुक्यातील पारद येथील जिल्हा परिषद शाळेत सोमवारी धक्कादायक प्रकार समोर आला. उन्हाळी सुट्यांनंतर शाळा सुरू होण्याचा पहिलाच दिवस असल्याने, ग्रामपंचायतीने नुकतीच रंगरंगोटी केलेल्या व विविध शैक्षणिक चित्र आणि आकर्षक ‘तारांगण’ रेखाटलेल्या वर्गखोलीत विद्यार्थ्यांना बसवण्याचा शिक्षकांचा बेत होता. मात्र, विद्यार्थी प्रार्थनेसाठी बाहेर गेले असताना अचानक या वर्गखोलीचा स्लॅब कोसळला. सुदैवाने यावेळी खोलीत कोणीही नसल्याने मोठा…