महान धरणात अपेक्षितपेक्षा 70% तूट; जलसाठा आता 25 टक्क्यांवर:जलाशय परिचालन आराखड्याच्या तुलनेत चिंताजनक चित्र
अकोला शहरासह जिल्ह्यातील ६४ खेडी, बोरगाव मंजू, मूर्तिजापूर शहर आणि एमआयडीसी परिसराची तहान भागवणाऱ्या काटेपूर्णा (महान) धरणात यंदा पावसाळ्याचे सव्वा दोन महिने उलटूनही समाधानकारक पाऊस न झाल्याने जलसाठ्याची स्थिती चिंताजनक बनली आहे. पाटबंधारे विभागाच्या जलाशय परिचालन आराखड्यानुसार ऑगस्टअखेर धरणात ९४ टक्क्यांहून अधिक साठा असणे आवश्यक असताना प्रत्यक्षात आजमितीला केवळ २५ टक्केच जलसाठा उपलब्ध आहे. गेल्या…