Headlines

वेगळ्या विदर्भासाठी दीक्षाभूमी ते संविधान चौक लाँग मार्च:31 डिसेंबर 2027 पर्यंत स्वतंत्र विदर्भ राज्याच्या निर्मितीचा निर्धार

स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीसाठी विदर्भ राज्य आंदोलन समितीने क्रांती दिनाचे औचित्य साधून नागपुरात ‘विदर्भ निर्माण जनसंकल्प लाँग मार्च’ काढला. दीक्षाभूमी येथून सुरू झालेला हा मार्च संविधान चौकात पोहोचला, जिथे त्याचे जाहीर सभेत रूपांतर झाले. विदर्भातील ११ जिल्हे आणि १२० तालुक्यांतून आलेल्या हजारो विदर्भप्रेमींनी यात सहभाग घेतला. दीक्षाभूमीवरून संविधान चौकाकडे जाणाऱ्या या पदयात्रेदरम्यान ‘वेगळा विदर्भ झालाच…

Read More

श्री गाडगे महाराज मिशनचे उपाध्यक्ष बापूसाहेब देशमुख यांचे निधन:मुख्यमंत्र्यांसह मान्यवरांनी व्यक्त केला शोक

श्री संत गाडगे महाराज मिशनचे उपाध्यक्ष आणि संत गाडगेबाबा धर्मशाला ट्रस्ट मुंबई, नाशिक व अमरावतीचे विश्वस्त बापूसाहेब देशमुख यांचे रविवारी पहाटे २.३० वाजता नागरवाडी (ता. चांदूरबाजार) येथे हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले. त्यांच्या निधनामुळे राजकारण आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी शोक व्यक्त केला आहे. त्यांच्या पार्थिवावर रविवारी सायंकाळी श्री गाडगे महाराज गोरक्षण संस्था, मूर्तिजापूर येथे अंत्यसंस्कार…

Read More

सावंगा विठोबा मंदिरात श्रावण मास मांड, चंदनउटी उत्सव:12 ऑगस्ट रोजी विविध धार्मिक कार्यक्रम; भाविकांसाठी महाप्रसादाचे नियोजन

चांदूर रेल्वे तालुक्यातील श्री क्षेत्र सावंगा (विठोबा) येथील श्री विठोबा संस्थान उर्फ श्रीकृष्ण अवधूत बुवा संस्थान येथे आगामी बुधवार, १२ ऑगस्ट रोजी श्रावण मास मांड (अखंड भजन) आणि अमावस्येनिमित्त चंदनउटी उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. श्रावण मास मांडची सुरुवात सकाळी ५ वाजता लहान मंदिरात ढाल बसवून करण्यात येईल. त्यानंतर मुख्य मंदिरात महाराजांच्या गणाने विश्वस्त मंडळ…

Read More

सहाय्यक पोलिस निरीक्षकांची नियंत्रण कक्षात तडकाफडकी बदली:पोलिस अधिक्षक श्रेणिक लोढा यांनी काढले आदेश

वसमत ग्रामीण पोलिस ठाण्यात अवघ्या दोन महिन्यापुर्वीच रूजू झालेले सहाय्यक पोलिस निरीक्षक रामदास निरदोडे यांची नियंत्रण कक्षात तडकाफडकी बदली करण्यात आली असून त्यांच्या बदलीचे आदेश पोलिस अधिक्षक श्रेणिक लोढा यांनी रविवारी ता. ९ काढले आहेत. कुरुंदा पोलिस ठाण्यातून बदली झालेले रामदास निरदोडे यांना वसमत ग्रामीण पोलिस ठाण्याचा पदभार देण्यात आला होती. दोन महिन्यापुर्वीच त्यांनी पदभार…

Read More

जयंत पाटील-देवेंद्र फडणवीसांचा एकाच विमान प्रवास:हर्षवर्धन सपकाळ यांची खोचक टीका, कॉंग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया काय?

राज्याच्या राजकारणात गेल्या काही महिन्यांत मोठ्या राजकीय घडामोडी घडल्या आहेत. ठाकरेंच्या सहा खासदारांनी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर आता शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेसही सत्तेसोबत जाणार असल्याची चर्चा रंगली आहे. याच पार्श्वभूमीवर, उद्या 10 ऑगस्ट रोजी शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे सर्व खासदार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहेत. ही भेट विविध प्रश्नांसंदर्भात असल्याचे सुप्रिया सुळे यांनी…

Read More

रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी बोलणे अनिवार्य:18 ऑगस्टपासून कारवाईचा बडगा; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा कडक इशारा

राज्यात अमराठी रिक्षा आणि टॅक्सी चालकांना प्रवाशांशी किमान संवादापुरते मराठी बोलणे अनिवार्य करण्यात आले आहे. यासाठी राज्य सरकारने विशेष अभियान राबवून त्यांना मराठीचे धडे दिले होते. ही भाषा शिकण्यासाठी चालकांना 15 ऑगस्टपर्यंतची मुदत देण्यात आली होती. ही मुदत आता संपत आल्याने चालकांवर कारवाई होणार का, असा प्रश्न उपस्थित केला जात होता. यावर परिवहन मंत्री प्रताप…

Read More

कास तलावाला ‘भुशी डॅम’चे स्वरूप:पर्यटकांच्या हुल्लडबाजीने पोलीस आणि स्थानिक हैराण; VIDEO

​जागतिक वारसा स्थळ असलेल्या प्रसिद्ध कास पुष्पपठाराचा हंगाम अवघ्या काही दिवसांवर आला असतानाच, कास तलाव आणि परिसरात पर्यटकांचा ओघ प्रचंड वाढला आहे. कास तलाव पूर्ण क्षमतेने भरून सांडव्यावरून पाणी ओसंडून वाहू लागल्याने या ठिकाणाला लोणावळ्याच्या ‘भुशी डॅम’चे स्वरूप प्राप्त झाले आहे. निसर्गाचा हा मनमोहक नजराणा अनुभवण्यासाठी शनिवार आणि सुट्टीच्या दिवशी राज्यभरातून पर्यटकांची तुफान गर्दी उसळत…

Read More

'काही अधिकारी मराठा सरकारमध्ये जाणीवपूर्वक दरी निर्माण करत आहेत':नरेंद्र पाटलांचा खळबळजनक दावा

मराठा समाज आणि सरकार यांच्यात जाणीवपूर्वक अंतर निर्माण करण्याचे काम काही अधिकारी करत असल्याचा खळबळजनक दावा नरेंद्र पाटील यांनी धाराशिव येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना केला. या गंभीर प्रकाराबाबत त्यांनी थेट मुख्यमंत्र्यांकडे कारवाईची मागणी केली असून, त्यांच्या या विधानामुळे आता मराठा समाज आणि सरकारमध्ये असंतोष पसरवण्याचे काम नक्की कोणते अधिकारी करत आहेत, असा मोठा प्रश्न उपस्थित झाला…

Read More

'सरकार ऐकत नसेल, तर सत्ता काय कामाची?':पुणे-नाशिक रेल्वेवरून सत्ताधाऱ्यांना घरचा आहेर, अतुल बेनके काय म्हणाले?

जुन्नर तालुक्यातील रेल्वेच्या प्रलंबित प्रश्नावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार अतुल बेनके यांनी आपल्याच सत्तेतील पक्षाला कडक शब्दांत घरचा आहेर दिला आहे. सत्तेत असूनही सरकार जनतेचे ऐकत नसेल तर ही सत्ता काय कामाची? असा संतप्त सवाल करत, सत्ता कोणाची आहे यापेक्षा जनतेची मागणी अधिक महत्त्वाची असल्याची ठाम भूमिका त्यांनी मांडली आहे. तसेच याप्रसंगी जुन्नरच्या रेल्वेचा प्रश्न…

Read More

शस्त्रक्रियेदरम्यान सोनू निगमने गाणे गायले:हॉस्पिटल बेडवरून शेअर केला व्हिडिओ, श्रेया घोषालने लवकर बरे होण्याची कामना केली

गायक सोनू निगमने नुकताच सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यात तो हॉस्पिटलमध्ये शस्त्रक्रियेदरम्यान वैद्यकीय कर्मचाऱ्यांसाठी गाणे गाताना दिसत आहे. सोनू निगमने व्हिडिओ शेअर करत लिहिले- “माझ्या शस्त्रक्रियेदरम्यान प्रिय डॉक्टर नीलेश सतभाई आणि त्यांच्या संपूर्ण टीमसाठी अचानक एक छोटासा परफॉर्मन्स दिला. वेदनेतही गायलो… कारण संगीताचा आनंद सर्वात वेगळा आहे!” व्हिडिओमध्ये सोनू हॉस्पिटल बेडवर दिसत…

Read More