Headlines

मंत्र्यांची आई-बहीण काढणाऱ्या जरांगेंवर सर्वपक्षीय नेते गप्प का?:लक्ष्मण हाकेंचा थेट सवाल, ओबीसींची वज्रमूठ बांधण्यासाठी उद्या सोलापूर दौरा

राज्यात आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, कुणबी जात प्रमाणपत्रे रद्द झाल्याच्या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे पाटील हे सध्या पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. दुसरीकडे, ओबीसी आरक्षण वाचवण्यासाठी लढा देणारे लक्ष्मण हाके यांनी जरांगे यांना जशास तसे प्रत्युत्तर देण्यासाठी आपण सोलापूरमध्ये येणार असल्याची घोषणा केली असून, यावेळी त्यांनी जरांगे यांच्यावर जोरदार हल्लाबोलही केला आहे. मनोज जरांगे…

Read More

संपत्तीच्या वादातून सख्ख्या चुलत भावाची गोळ्या झाडून हत्या:अकोला जिल्ह्यात खळबळ; निंबी मालोकार गावातील थरार

अकोला जिल्ह्यातील बाळापूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या निंबी मालोकार गावात एका धक्कादायक घटनेने मोठी खळबळ उडवून दिली आहे. शेतीच्या आणि कौटुंबिक संपत्तीच्या वादातून दोन सख्ख्या चुलत भावांमध्ये झालेल्या भांडणाचे रूपांतर थेट जीवघेण्या हल्ल्यात झाले. या घटनेत अमोल गजानन मालोकार या तरुणाची गोळ्या झाडून निर्घृण हत्या करण्यात आली असून, त्याचा चुलत भाऊ अजय मालोकार यानेच ही…

Read More

अहमदाबादमध्ये पीजी वसतिगृहाच्या छतावर विद्यार्थिनीवर बलात्कार:तरुणी पळाली तेव्हा आरोपी गार्डने तारेने गळा आवळला, 4 दिवसांपूर्वी नोकरी लागली होती

अहमदाबादमधील आनंदनगर येथील एका पीजी वसतिगृहाच्या छतावर विद्यार्थिनीवर बलात्कार करण्यात आला. ही घटना शनिवारी रात्रीची आहे, जेव्हा तरुणी रात्री 10 वाजता छतावर फिरत होती. तेव्हा आरोपी गार्डही छतावर पोहोचला, त्याने आधी तरुणीचा गळा दाबला आणि नंतर बलात्कार केला. पीडित विद्यार्थिनी इंटीरियर डिझायनिंगचे शिक्षण घेत आहे आणि एक वर्षापासून याच सोसायटीच्या पीजी वसतिगृहात राहत होती. तर,…

Read More

आमदार सत्यजित तांबेंवर गुन्हा दाखल:नाशिक-पुणे रेल्वे प्रश्नी आंदोलन भोवले, जमावबंदीचे उल्लंघन केल्याचा आरोप

नाशिक-पुणे हायस्पीड रेल्वे प्रकल्पाचा मार्ग जुन्या आराखड्यानुसारच (नाशिक-सिन्नर-संगमनेर-चाकण) राहावा, या मागणीसाठी आज अहिल्यानगरमध्ये आमदार सत्यजित तांबे यांच्या नेतृत्वात गोंदे शिवारातील मुंबई-नागपूर समृद्धी महामार्ग आणि नाशिक-पुणे राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. जमावबंदी आदेशाचे उल्लंघन करून हे बेकायदेशीर आंदोलन केल्याप्रकरणी वावी पोलीस ठाण्यात आमदार तांबे यांच्यासह तब्बल 300 ते 350 आंदोलकांवर गुन्हा दाखल करण्यात आला…

Read More

एडीसीसी बँकेत नव्या सदस्यांच्या मंजुरीवरून वाद:मंत्र्यांच्या निर्णयाला सत्ताधाऱ्यांचे आव्हान, हायकोर्टात जाण्याची तयारी

अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (एडीसीसी) नव्या सभासदांना सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी हिरवी झेंडी दाखविल्याने सत्ताधारी गटात तीव्र नाराजी पसरली आहे. या निर्णयाला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात आव्हान देण्याची तयारी सुरू झाली आहे. बँकेचे उपाध्यक्ष अभिजीत ढेपे यांच्या मते, हा निर्णय चुकीचा आणि कायदेशीर चौकटीत बसणारा नसल्याने येत्या दोन-तीन दिवसांतच त्याला आव्हान दिले…

Read More

बुलढाणा जिल्ह्याचे नाव 'राजमाता जिजाऊनगर' होणार?:आमदार श्वेता महाले यांची मागणी, मुख्यमंत्र्यांचे प्रशासनाला कार्यवाहीचे निर्देश

बुलढाणा जिल्ह्याचे नामकरण करण्याची मागणी आता जोर धरू लागली असून, जिल्ह्याचे नाव बदलून ‘राजमाता जिजाऊनगर’ करावे, अशी अधिकृत मागणी भाजप आमदार श्वेता महाले यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र दिले असून, मुख्यमंत्र्यांनीही या पत्राची तात्काळ दखल घेत प्रशासनाला पुढील कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत. या सकारात्मक प्रतिसादामुळे राजमाता जिजाऊंच्या नावाने…

Read More

साखळी नदीच्या पुरामुळे कहर; पुलाची मागणी:नांदगाव खंडेश्वरमध्ये धामक-अमरावती बससेवेसाठीही नागरिकांचे आमदारांना साकडे

नांदगाव खंडेश्वर तालुक्यात साखळी नदीवर पूल बांधण्याची आणि धामक ते अमरावती मार्गावर नियमित बससेवा सुरू करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. अलीकडेच झालेल्या अतिवृष्टीमुळे नदीला पूर येऊन दळणवळण विस्कळीत झाले होते. या पार्श्वभूमीवर स्थानिक नागरिकांनी लोकप्रतिनिधींकडे धाव घेतली आहे. या मागणीनुसार, खासदार अमर काळे यांनी दिल्लीत केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांना निवेदन सादर केले आहे….

Read More

स्वातंत्र्यदिनी मद्यविक्रेता संघटनेचे महारक्तदान शिबीर:जिल्ह्यात दोन ठिकाणी आयोजन, 2 हजार बॉटल्सचे लक्ष्य

अमरावती जिल्हा मद्यविक्रेता संघटना आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाने स्वातंत्र्यदिनी महारक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे. थॅलेसेमिया, सिकलसेल ॲनिमिया, हिमोफिलिया आणि रक्ताचा कर्करोग यांसारख्या गंभीर आजारांनी ग्रस्त रुग्णांना रक्ताची वारंवार गरज भासते. ही गरज पूर्ण करण्यासाठी २ हजार बॉटल रक्त संकलित करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. हे शिबिर जिल्ह्यात अमरावती शहर आणि धारणी अशा दोन ठिकाणी…

Read More

रस्त्यांवरील झाडांच्या छाटलेल्या फांद्या बेवारस:महापालिकेच्या दिरंगाईमुळे नागरिक त्रस्त

अमरावती शहरातील मुख्य आणि अंतर्गत रस्त्यांवर झाडांची छाटणी केल्यानंतर कचरा उचलण्याकडे महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांकडून दुर्लक्ष होत आहे. यामुळे नागरिक त्रस्त झाले असून, रस्त्याच्या कडेला पडलेल्या डहाळ्या, पाने आणि फांद्यांमुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे, तसेच अपघाताचा धोकाही वाढला आहे. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर किंवा नियमित देखभालीचा भाग म्हणून मनपाच्या वृक्ष प्राधिकरणातर्फे रस्त्यांवरील झाडांच्या धोकादायक फांद्या छाटण्याचे काम हाती…

Read More

बालकांच्या आरोग्याशी खेळ!:अंगणवाडीतील आहार प्रयोगशाळेत नापास; कॉंग्रेस नेते विजय वडेट्टीवार आक्रमक

चंद्रपूर जिल्ह्यातील अंगणवाडी केंद्रांमध्ये बालकांना पुरविण्यात येणाऱ्या गरम व ताज्या आहाराच्या गुणवत्तेबाबत गंभीर बाब समोर आली असून, यामुळे हजारो बालकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. गोंडपिंपरी आणि पोंभुर्णा तालुक्यातील एकात्मिक बाल विकास सेवा योजनेंतर्गत अंगणवाडी केंद्रांना पुरविण्यात येणाऱ्या आहाराची प्रयोगशाळेमार्फत तपासणी करण्यात आली असता, काही खाद्यपदार्थ निर्धारित मापदंडानुसार नसल्याचे, तर काही पदार्थ सेवनासाठी असुरक्षित असल्याचे…

Read More