Headlines

6.7 लाखांचे 119 क्विंटल लाडू साहित्य ‘श्रीं’च्या चरणी समर्पित:संत श्री गजानन महाराज संस्थान : शेगाव येथे भाविकांना गुरुवारी करणार लाडवाचे वितरण‎

संत श्री गजानन महाराजांच्या अमरावती शहरासह जिल्ह्यातील भाविकांनी समर्पण भावनेतून स्व-ईच्छेने एकत्रित केलेली बुंदीचे लाडू प्रसाद सामुग्री गुरुपौर्णिमेच्या पर्वावर बुधवार २९ जुलै रोजी श्री संत गजानन महाराज संस्थान शेगांव येथे सर्व आयोजकांनी समर्पित केली. या सामुग्रीची किंमत ६ लाख ७० हजार ६६७ रु. असून संस्थानाद्वारे आयोजकांना रितसर पावतीही देण्यात आली आहे. लाडू प्रसाद उत्सव समितीद्वारे…

Read More

पुण्यात पोलिसांच्याच गाडीचा थरार:भरधाव पोलिस व्हॅनने 7 वाहनांना उडवले; सीसीटीव्ही व्हिडीओ आला समोर

पुण्याच्या मध्यवर्ती आणि गजबजलेल्या असणाऱ्या सदाशिव पेठ परिसरातून एक अत्यंत धक्कादायक आणि भीषण अपघाताची बातमी समोर आली आहे. या अपघातात चक्क एका भरधाव पोलिस व्हॅननेच रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या तब्बल सात वाहनांना एकापाठोपाठ एक जोरदार धडक दिली. या थरारक घटनेचा सीसीटीव्ही व्हिडीओ आता समोर आला असून, तो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. नेमका अपघात कसा…

Read More

बुद्ध मार्गदाता, म्हणून संपूर्ण जगाला आज बुद्धाची गरज- भंते राजज्योती:भगवान गौतम बुद्ध यांच्या जीवन कार्यावर हाेणार मंथन

भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने वर्षावासाला प्रारंभ झाला आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन अशोक वाटिकेत भंते राजज्योती यांच्या हस्ते संपन्न झाले आहे. आपल्या प्रवचनात भंते राजज्योती यांनी “विश्वगुरू तथागत भगवान गौतम बुद्ध’ या विषयावर प्रवचन केले. आपल्या प्रवचनांमधून तथागत बुद्ध जगाचे मार्गदाते आहेत. संपूर्ण जगाला बुद्धाची गरज आहे, असे ते म्हणाले. कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा जिल्हाध्यक्ष पी. जे….

Read More

NEET PG 2026 Exam Reforms; NTA Security Tightened & New Exam Centers

नवी दिल्ली1 तासापूर्वी कॉपी लिंक केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने NEET PG 2026 परीक्षेसाठी अनेक मोठ्या सुधारणांची घोषणा केली आहे. यामध्ये परीक्षार्थींचा प्रवास आणि परीक्षेत कोणत्याही प्रकारची फसवणूक रोखण्यासाठी कठोर पावले उचलण्यात आली आहेत. यावेळी परीक्षा 30 ऑगस्ट रोजी होणार आहे. यासाठी 2.73 लाख उमेदवारांनी नोंदणी केली आहे, जी मागील वर्षाच्या तुलनेत 12.5% जास्त आहे. परीक्षा देशभरातील…

Read More

बनावट चावीने शेजाऱ्याच्या घरात चोरी; एकाला अटक:41.10 ग्रॅम सोने जप्त, 5 लाखांचा मुद्देमाल जप्त; शेजाऱ्यानीच केली चोरी‎

खदान पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एमराल्ड टॉवर परिसरात बनावट चावीचा वापर करून शेजाऱ्याच्या घरात चोरी करणाऱ्या आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेने अवघ्या काही तासांत अटक केली. आरोपीकडून चोरीतील ४१.०१० ग्रॅम सोन्याची लगड, दीड लाखांची रोख रक्कम, असा एकूण ५ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. एमराल्ड टॉवर, तुकाराम चौक येथील रहिवासी सुधीर वसंतराव धंद्रेते हे कुटुंबासह…

Read More

जिल्ह्यातील खड्डे बुजवल्यानंतरच हेल्मेट सक्ती लागू करण्यात यावी:संभाजी ब्रिगेडची जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन‎

जिल्ह्यात सध्या हेल्मेट बंधनकारक करण्यात आले आहे. मात्र, जिल्ह्यातील खड्डे बुजवल्यानंतरच हेल्मेट सक्ती लागू करा, अशी मागणी करत संभाजी ब्रिगेडने जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली. संभाजी ब्रिगेडने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनही सादर केले. . शहरातील अनेक मुख्य रस्ते सिमेंट काँक्रीटचे झाले आहेत. जिल्ह्याला जोडणारे रस्तेही गुळगुळीत झाले आहेत. या रस्त्यांवर अपघातांचे प्रमाणही वाढले आहे. बहुतेक अपघात वाहतूक नियमांचे…

Read More

तरुण आहे रात्र अजुनी…चंद्र आहे साक्षीला:शनिवारी रात्री रंगली संस्कार भारतीच्या आशा ‘सुमनांजली''ची सुरेल सफर‎

स्वरांची धुँवाधार बरसात… वाद्यांची समृद्ध साथ…सुश्राव्य निवेदन…त्यावर आशा भोसले आणि सुमन कल्याणपूर यांच्या लोकप्रिय गाण्यांनी भारावलेल्या अमरावतीकर रसिकांच्या टाळ्या.. वाहवा आणि वन्स मोअर असा नेत्रदीपक स्वरसोहळा संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवनाने शनिवारी रात्री अनुभवला. निमित्त होते, बहुविध गायिका आशा भोसले आणि ‘प्रतिलता’ असा उल्लेख केला जाणाऱ्या सुमन कल्याणपूर यांच्या अवीट गोडीच्या गाण्यांनी सजलेल्या “आशा- सुमनांजली’ या…

Read More

समस्तीपूर-सहरसा पॅसेंजर ट्रेनला आग:प्रवाशांनी मारल्या उड्या, इंजिनसह 1 बोगी भस्मसात; सिमरी बख्तियारपूर स्टेशनवर अपघात

बिहारमधील सहरसा येथे एका प्रवासी ट्रेनला आग लागली. सिमरी-बख्तियारपूर स्टेशनवर उभ्या असलेल्या समस्तीपूर-सहरसा मेमू ट्रेनच्या (63344) इंजिनला सोमवारी पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास आग लागल्याने एकच गोंधळ उडाला. प्रवाशांनी ट्रेनच्या डब्यातून उड्या मारून पळ काढला. आगीच्या ज्वाळा इतक्या तीव्र होत्या की, बघता बघता आगीने पुढील डब्यालाही आपल्या कवेत घेतले. इंजिनसह एक डबा जळून खाक झाला. घटनेच्या…

Read More

पुरामुळे मालखेड-वडगावातील पुल गेला वाहून; ग्रामस्थ त्रस्त:नागरिकांची गैरसोय, तत्काळ दुरुस्ती करण्याची केली मागणी‎

गेल्या दोन दिवसांत झालेल्या मुसळधार पावसामुळे अंजनगाव बारी परिसरातील वडगाव (जिरे) येथील रायधोळ नदीला मोठा पूर आला होता. या पुरामुळे वडगाव (जिरे)-मालखेड मार्गावरील पूल तसेच स्मशानभूमीकडे जाणारा शेतकऱ्यांचा रस्ता पुराच्या पाण्यात वाहून गेला. त्यामुळे शेतकरी, विद्यार्थी, पादचारी व ग्रामस्थांची मोठी गैरसोय होत असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. या पुलाची दुरुस्ती तातडीने करावी, अशी मागणी पुढे…

Read More

राज्यात पावसाची तुफान फटकेबाजी:विदर्भातील 45 तालुक्यांत अतिवृष्टी, पुरात 5 जण वाहून गेले; मुंबईसह कोकणला येलो अलर्ट

गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण महाराष्ट्रात मुसळधार पाऊस सुरू आहे. पावसाने राज्यातील अनेक ठिकाणी रौद्र रूप धारण केले आहे. भारतीय हवामान विभागाने राज्यात पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली असून, अनेक जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. दुसरीकडे, विदर्भात पावसाने हाहाकार उडवला असून पुरात वाहून गेल्याने पाच जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. विदर्भात अतिवृष्टीचा फटका; 5…

Read More