Headlines

राहुलनगर शाळेच्या भिंतीला भेगा पडल्या:गतवर्षीच्या पुरामुळे नुकसान, विद्यार्थी भीतीखाली‎

गतवर्षी सीना नदीला आलेल्या महापुरामुळे माढा तालुक्यातील राहुलनगर (सुलतानपूर) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला पाण्याने वेढा दिला होता. जवळपास १५ दिवस शाळा पाण्याखाली होती. शाळेत पाणी साचून राहिल्याने भिंतींना भेगा पडल्या आहेत. शाळा धोकादायक स्थितीत आहे. शाळेत ३५ चिमुकले भीतीच्या सावटाखाली ज्ञानार्जन करत आहेत. भविष्यातील धोका टाळण्यासाठी वर्ग खोल्यांची डागडुजी करावी. नूतनीकरण करावे आणि वॉल…

Read More

48 लाख टन साखर गेली कुठे? आता आयात नको:गतवर्षीचा उसाचा हप्ता द्या, सोलापूर जिल्हा ऊस दर संघर्ष समितीचा पंढरपुरात एल्गार; तहसीलदारांना निवेदन‎

मागील दोन गाळप हंगामात उत्पादित झालेली साखर आणि केंद्र सरकारने निश्चित केलेल्या कोट्यानुसार विक्री झाल्यानंतर शिल्लक राहणाऱ्या साठ्यामध्ये ४८ लाख टनांची तफावत आहे. ती साखर गेली कुठे? असा सवाल करत सचिन पाटील यांनी केंद्र सरकारने साखरेची आयात करू नये, . या बैठकीमध्ये साखरेचा दर प्रतिकिलो ७५ रुपयावर गेलेला असताना साखरेच्या अवैध साठेबाजीची केंद्रीय स्तरावर सखोल…

Read More

लोहाऱ्यात नवे ‘नमो’ उद्यान सजले; जुन्या बालोद्यानांची मात्र दुरवस्था:लोहाऱ्यात कोटीच्या निधीतून उद्यान अंतिम टप्प्यात; काही दिवसांत लोकार्पण‎

. लोहारा शहरालगत पाटोदा रोडशेजारी नगरपंचायतीकडून नगरविकास विभागाच्या वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून जवळपास एक कोटी रुपये खर्चून ‘नमो उद्यान’ उभारण्यात येत आहे. उद्यानाचे काम अंतिम टप्प्यात असून, पुढील काही दिवसांत त्याचे लोकार्पण होऊन नागरिकांसाठी खुले करण्यात येणार आहे. लहान मुलांसाठी स्वतंत्र खेळण्याची व्यवस्था, नागरिकांसाठी व्यायाम व चालण्याची सुविधा, योगा शेड, आकर्षक पथदिवे, संरक्षक भिंत, सीसीटीव्ही कॅमेरे, पिण्याचे…

Read More

पुरातन शिवमंदिर परिसरात कचरा अन् दुर्गंधी:भाविकांत तीव्र संताप, वन्यजीवांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर, पर्यावरण धोक्यात‎

मेळघाटच्या निसर्गरम्य आणि वन्यजीवांनी समृद्ध अशा हरिसाल परिसरातील पुरातन शिवमंदिर परिसरात सध्या कचऱ्याचे साम्राज्य पसरले असून यामुळे पर्यावरणासह वन्यजीवांच्या सुरक्षेचाही गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. आठवडी बाजारानंतर निर्माण होणारा कचरा, तसेच कोंबड्या व बकऱ्यांचे अवशेष थेट सिपना नदीकाठावर आणि मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यावर टाकले जात असल्याने नागरिक व भाविकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. मेळघाटातील हे…

Read More

नद्या, नाले, विहिरी कोरड्याच; उभी पिके सुकण्याच्या मार्गावर:सोयाबीन पिवळे पडून फुलांची गळती; उत्पादन घटण्याची भीती, वन्यप्राण्यांचा उपद्रव

परिसरात गेल्या महिनाभरापासून पावसाने पूर्णपणे पाठ फिरवल्याने खरीप पिके अखेरच्या घटका मोजत आहेत. अर्धा पावसाळा संपूनही परिसरातील नद्या, नाले, ओढे व विहिरी अजूनही कोरड्याठाक पडल्या आहेत. समाधानकारक पाऊस न झाल्याने आता बळीराजाचे डोळे दमदार पावसाकडे लागल . सुरुवातीच्या समाधानकारक पावसावर सोयाबीन, कापूस, मूग, उडीद, मका, तूर आदी पिके बहरली होती. मात्र, ऐन फुलोऱ्यात आणि वाढीच्या…

Read More

सैद्धांतिक ज्ञान न घेता प्रात्यक्षिक, औद्योगिक अनुभवाची जोड द्यावी:श्री शिवाजी अभियांत्रिकीतील मेकॅनिकल विभागाची कार्यशाळा‎

श्री शिवाजी शिक्षण संस्था, अमरावतीद्वारा संचालित अभियांत्रिकी व तांत्रिक महाविद्यालय, अकोला येथील मेकॅनिकल अभियांत्रिकी विभागाच्या विद्यार्थी परिषदेच्या वतीने तीन दिवसीय औद्योगिक कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. केवळ सैद्धांतिक ज्ञान न घेता त्याला प्रा . विद्यार्थ्यांना औद्योगिक क्षेत्रातील प्रत्यक्ष कामकाजाची माहिती मिळावी. नामांकित उद्योगांशी त्यांचा संपर्क वाढावा. अभियांत्रिकी शिक्षणातील सैद्धांतिक ज्ञानाचा प्रत्यक्ष औद्योगिक क्षेत्रात कसा उपयोग केला…

Read More

जंक फूडवर नियंत्रणासाठी शिक्षकांनाच धडे, पोषण आहार:आरोग्याबाबत जागृती; 1 हजार 847 मुख्याध्यापकांचा कार्यशाळेत सहभाग‎

शाळांतील जंक फूडवर नियंत्रणासाठी मुख्याध्यापकांची कार्यशाळा घेण्यात आली. विद्यार्थ्यांचे आरोग्य, पोषण आणि शाळांमधील अन्नाची सुरक्षितता याबाबत जनजागृती करण्यासाठी अन्न व औषध प्रशासन, जिल्हा परिषद शिक्षण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने कार्यशाळा पार पडली. जिल्ह्यातील विविध शाळांमधील १ हजार ८४७ मुख्याध्यापकांनी कार्यशाळेत सहभाग घेतला. अन्न व औषध प्रशासन (एफडीए) अकोला कार्यालयाच्या मार्गदर्शनाखाली आयोजित कार्यशाळेत जास्त चरबी, साखर…

Read More

राम रहीम 2 महिन्यांनंतर पुन्हा तुरुंगाबाहेर:21 दिवस सिरसा डेऱ्यात राहणार; 9 वर्षांत 17 व्यांदा पॅरोल-फरलो मिळाली

डेरा सच्चा सौदा प्रमुख गुरमीत राम रहीम पुन्हा एकदा तुरुंगातून बाहेर आला आहे. त्याची 21 दिवसांची फरलो मंजूर झाली आहे. मंगळवारी सकाळी 6 वाजून 5 मिनिटांनी तो रोहतकच्या सुनारिया तुरुंगातून बाहेर पडला. फरलो काळात तो सिरसा डेऱ्यात राहील. राम रहीमला ऑगस्ट 2017 मध्ये साध्वींच्या लैंगिक शोषणाच्या प्रकरणात शिक्षा झाली होती. 9 वर्षांत तो 17 व्यांदा…

Read More

वारंवार स्फोट होऊनही त्याच कंपनीचे व्हेंटिलेटर कसे काय बसवण्यात आले:प्रहार-शिवसेनेचे पदाधिकारी संतप्त, अधीक्षकांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी‎

व्हेंटिलेटरचा स्फोट होऊन एकाच वेळी तीन नवजात चिमुकल्यांचा मृत्यू झाल्याच्या घटनेने संपूर्ण समाजमन सुन्न झाले आहे. या गंभीर घटनेला जिल्हा स्त्री रुग्णालय प्रशासन जबाबदार असल्याचा आरोप करत प्रहार आणि शिवसेनेच्या संतप्त पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी प्रभा . सोमवारी पहाटे ही दुर्दैवी घटना घडल्यानंतर विभागीय आयुक्त नयना गुंडे, जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांच्यासह अन्य वरिष्ठ अधिकाऱ्यांनी रुग्णालयात पाहणी…

Read More

दुर्लक्ष:असदगड किल्ल्याच्या संवर्धनासाठी‎विहिंप अन् बजरंग दल आक्रमक‎, अवैध प्रकारांना आळा घाला, हिंदुत्ववाद्यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी‎

शहरातील ऐतिहासिक असदगड किल्ल्याच्या संवर्धनासाठी सोमवारी विश्व हिंदू परिषद-बजरंग दलाने आक्रमक भूमिका घेत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले. त्यानंतर जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकाऱ्यांनी किल्ल्याची पाहणी केली. किल्ला परिसरातील अतिक्रमणे, अस्वच्छता, अवैध प्रकारांना आळा घालण्याची मागणी हिंदुत्ववाद्यांकडून करण्यात आली. अकोल्यात ऐतिहासिक असदगड किल्ला आहे. मात्र किल्ला परिसराची दुरवस्था झाली आहे. काही ठिकाणी दगड, माती पडत आहे. परिसरही अस्वच्छ…

Read More