Headlines

जानेवारी ते जुलैदरम्यान 51 हजार भारतीय पर्यटकांनी मॉरिशसला भेट दिली:पुण्यात पर्यटन भागीदारांचा संवाद; संख्येत 14.5 टक्क्यांनी वाढ

मॉरिशसला भेट देणाऱ्या भारतीय पर्यटकांच्या संख्येत या वर्षीच्या पहिल्या सात महिन्यांत १४.५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. जानेवारी ते जुलै या काळात सुमारे ५१ हजार भारतीय पर्यटकांनी मॉरिशसला भेट दिली. भारत आणि मॉरिशस यांच्यातील पर्यटन आणि सांस्कृतिक संबंध अधिक मजबूत करण्यासाठी मॉरिशस टुरिझम प्रमोशन अथॉरिटी (एमटीपीए) ने पुण्यात पर्यटन क्षेत्रातील भागीदारांसाठी संवाद कार्यक्रम आयोजित केला. एमटीपीएचे…

Read Full News

ज्येष्ठ चित्रकार नाना जोशींना श्रद्धांजली:महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या सभेत सुहृदांनी आठवणी जागवल्या; रविमुकुल म्हणाले, रंगसंगती तजेलदार होती.

ज्येष्ठ चित्रकार, प्रकाशक आणि महाराष्ट्र साहित्य परिषदेचे माजी कोषाध्यक्ष नाना जोशी यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी परिषदेतर्फे एका सभेचे आयोजन केले होते. या सभेत त्यांच्या सुहृदांनी त्यांच्या आठवणी जागवल्या. ही श्रद्धांजली सभा परिषदेच्या माधवराव पटवर्धन सभागृहात झाली. यावेळी ज्येष्ठ चित्रकार रविमुकुल यांनी नाना जोशींच्या चित्रकलेतील शैलीचे कौतुक केले. ते म्हणाले, “नाना जोशी यांची चित्रकलेतील शैली वेगळी होती….

Read Full News

केवळ पदवी नव्हे, तर विद्यार्थ्यांना उद्योगांच्या गरजांनुसार सक्षम करा:मंत्री चंद्रकांत पाटलांचे आदेश, तीन नव्या उपक्रमांवर विशेष भर

महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक अभ्यासक्रमांचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी राज्य सरकारने एक अत्यंत महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. राज्यातील तरुण विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगार मिळवण्याची क्षमता आणि उद्योगसज्जता वाढवण्यासाठी आता उद्योगाभिमुख प्रशिक्षण, केंद्रीकृत प्लेसमेंट सुविधा आणि कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आधारित विशेष कौशल्यविकास उपक्रम राबवण्यावर शासनाकडून मोठा भर दिला जाणार आहे. राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील…

Read Full News

पुणे शहराच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह; परिसंवादाचे आयोजन:वाहतूक, पायाभूत सुविधा, पर्यावरण आणि उंच इमारतींच्या प्रश्नांवर शुक्रवारी चर्चा

पुणे शहराचा वेगाने विस्तार होत आहे. वाढत्या बांधकाम परवानग्या, उंच इमारती, अपुरे रस्ते, वाहतूक कोंडी, उद्याने आणि क्रीडांगणांची कमतरता यामुळे शहराच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पाणीपुरवठा आणि मलनिस्सारण व्यवस्थेवरही ताण वाढला आहे. या पार्श्वभूमीवर, पुण्याचा विकास सुनियोजित पद्धतीने होत आहे का, याचा आढावा घेण्यासाठी राजीव गांधी स्मारक समितीने शुक्रवारी (11 सप्टेंबर) एका परिसंवादाचे आयोजन…

Read Full News

मोहोळ यांचे चांदणी चौक मेट्रो डीपीआर तयार करण्याचे निर्देश:दिशा बैठकीत केंद्र पुरस्कृत योजनांचा आढावा; प्रलंबित कामांना गती देण्यास सांगितले.

केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी केंद्र सरकारच्या विविध योजना आणि प्रकल्पांच्या अंमलबजावणीचा आढावा घेतला. प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करावीत, असे स्पष्ट निर्देश त्यांनी दिले. यासोबतच चांदणी चौक, घोटवडे फाटा, पिरंगुट, हिंजवडी मेट्रोचा सविस्तर प्रकल्प अहवाल (DPR) तयार करण्याचेही आदेश दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात मुरलीधर मोहोळ यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा विकास समन्वय व संनियंत्रण समितीची (दिशा) बैठक झाली….

Read Full News

जबलपूरचा ‘रोव्हर’ डायलिसिसच्या उंबरठ्यावरून पुण्यात वाचला:किडनीतील खडे आरआयआरएसने काढले; मोठी शस्त्रक्रिया टळली, क्रिएटिनिन 13.79 वरून 2.0 वर आले.

किडनी खराब होण्याच्या उंबरठ्यावर पोहोचलेला जबलपूरचा सात वर्षीय जर्मन शेफर्ड ‘रोव्हर’ पुण्यातील अत्याधुनिक पशुवैद्यकीय उपचारांमुळे पुन्हा आपल्या कुटुंबात परतला. किडनीची कार्यक्षमता वेगाने कमी होत असल्याने त्याला डायलिसिससाठी पुण्यात आणण्यात आले होते. मात्र, केवळ डायलिसिसवर भर न देता आजाराचे मूळ कारण शोधले. तपासणीत किडनी आणि मूत्राशयातील खडे हे किडनी खराब होण्यामागील प्रमुख कारण समोर आले. त्यानंतर…

Read Full News

पार्थ पवारांना आरोपी का केले नाही?:1800 कोटींच्या मुंढवा जमीन गैरव्यवहारात हायकोर्टाचा पोलिसांना थेट सवाल

पुण्यातील बहुचर्चित आणि तब्बल १८०० कोटी रुपयांच्या मुंढवा जमीन खरेदी प्रकरणात आता एक अत्यंत मोठी घडामोड समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा खासदार पार्थ पवार यांना या प्रकरणात अद्याप आरोपी का करण्यात आले नाही? असा थेट सवाल मुंबई उच्च न्यायालयाने पोलिसांना विचारला आहे. तसेच, याप्रकरणी राज्याचे पोलीस महासंचालक आणि तपास अधिकाऱ्यांनी उत्तर द्यावे, असे…

Read Full News

मतदार यादीत नाव नोंदणी आणि दुरुस्तीसाठी 30 सप्टेंबरपर्यंत मुदत:पुणे जिल्ह्यात 21 हजार 555 अर्ज प्राप्त; ऑनलाइन-ऑफलाइन अर्ज करता येणार

विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत मतदार यादीबाबत सुरू असलेल्या दावे व हरकतींच्या कालावधीत 31ऑगस्ट ते 7 सप्टेंबर 2026 या कालावधीत पुणे जिल्ह्यात विविध प्रकारचे एकूण 21 हजार 555 अर्ज प्राप्त झाले आहेत. यामध्ये फॉर्म 6 चे 12 हजार 472, फॉर्म 7 चे 681 आणि फॉर्म 8 चे 8 हजार 367 अर्ज आहेत. मतदार यादीत नवीन मतदार…

Read Full News

NIA ने म्हटले- लाल किल्ला स्फोटाचा सूत्रधार उमर नबी:स्फोटाची गाडी स्वतः चालवत होता; यात 11 जणांचा मृत्यू झाला होता

दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ झालेल्या कार बॉम्बस्फोटाचा सूत्रधार दहशतवादी उमर उन नबी होता. एनआयएने बुधवारी आरोपपत्रात ही माहिती दिली. स्फोटाची कार नबी स्वतः चालवत होता. स्फोटात त्याचा मृत्यू झाला होता. एजन्सीनुसार, नबी उर्फ पिंडा आणि राहुल भट 2022 च्या सुरुवातीपासून निष्क्रिय झालेल्या अंसार गजवत-उल-हिंद (AGuH) मॉड्यूलला पुन्हा सक्रिय करण्याचा प्रयत्न करत होते. या मॉड्यूलला अल-कायदा इन…

Read Full News

15 ऑक्टोबरपासून ऊस गाळप सुरू केल्यास टोकाचा संघर्ष:राजू शेट्टींचा सरकारला इशारा, प्रतिटन 500 रुपये अनुदानाची मागणी

राज्य सरकारच्या मंत्रिमंडळ समितीने नुकताच यंदाचा ऊस गाळप हंगाम १५ ऑक्टोबरपासून सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, या निर्णयाला आता स्वाभिमानी शेतकरी संघटनेने कडाडून विरोध दर्शवला आहे. १५ ऑक्टोबरपासून ऊस गाळप सुरू केल्यास उसाच्या वजनात आणि रिकव्हरीत मोठी घट होऊन शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान होईल. त्यामुळे केंद्र आणि राज्य सरकारने शेतकऱ्यांना किमान प्रतिटन ५०० रुपये अनुदान…

Read Full News