सोयगाव-फर्दापूर मार्गावर 2 दुचाकींचा अपघात:एक ठार, एक गंभीर
सोयगाव-फर्दापूर मार्गावर औद्योगिक प्रशिक्षण संस्थेसमोर उभ्या असलेल्या दुचाकीला भरधाव दुचाकीने मागून धडक दिल्याने एक जण जागीच ठार झाला, तर दुसरा गंभीर जखमी झाला आहे. ही घटना सोमवारी दुपारी घडली. विलास साईदास राठोड (२५, रा. वरखेडी तांडा, ता. सोयगाव) असे अपघातात मृत झालेल्या युवकाचे नाव असून नीलेश रोहिदास चव्हाण (३५, रा. नांदातांडा) हा गंभीर जखमी झाला…