वैजापुरात दुष्काळाचे सावट गडद; ठाकरे गट तहसीलवर:शेतकऱ्यांना हेक्टरी 1 लाखाची मदत देण्याची मागणी
पावसाने दीर्घकाळ ओढ दिल्याने तालुक्यात दुष्काळाचे सावट गडद झाले आहे. शेतकऱ्यांच्या डोळ्यादेखत उभी पिके करपत असताना पाणी आणि चाऱ्याचे संकटही दारात येऊन ठेपले आहे. मात्र प्रशासनाला अद्याप परिस्थितीचे गांभीर्य दिसत नसल्याचा आरोप करत ‘झोपलेल्या प्रशासनाला जागे करण्यासाठी तहसील गाठली’, असा पवित्रा ठाकरे गटाने घेतला. जिल्हा परिषद सदस्य संजय पाटील निकम यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना ठाकरे गटाच्या…