बालक 48 तासांत सुखरूप हस्तगत, अपहरण करणारी महिला ताब्यात:अमरावतीत गरबा पंडालमधून पळवून नेले होते गोंदिया जिल्ह्यातील आमगावला
अमरावती शहरातील राजापेठ परिसरातून अपहरण झालेल्या एका बालकाला पोलिसांनी अवघ्या ४८ तासांत सुखरूप हस्तगत केले. अपहरण करणाऱ्या महिलेलाही ताब्यात घेण्यात आले. पोलीस आयुक्त राकेश ओला यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई झाली. महिलेने ओसवाल भवनजवळील गरबा पंडालमधून बालकाला पळवून नेले होते. घटनेचे गांभीर्य पाहून राजापेठ पोलिसांनी १० पथके तयार केली. सीसीटीव्ही फुटेजमध्ये एक लाल साडीतील महिला रात्री…