Headlines

गंगापुरात सार्वजनिक दुर्गामाता उत्सव समितीतर्फे ‘होम मिनिस्टर’ कार्यक्रम:स्पर्धेतील विजेत्या महिलांना दुचाकीसह विविध बक्षिसांचे केले वितरण‎

शहरात सार्वजनिक दुर्गामाता उत्सव समितीतर्फे आयोजित शारदीय नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने महिलांसाठी चला खेळू खेळ पैठणीचा अर्थात होम मिनिस्टर या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. जिल्हा परिषद मैदानावर पार पडलेल्या या सोहळ्यात निवेदिका क्रांती नाना मळेगावकर . या स्पर्धेत लता दत्ता गात यांनी प्रथम क्रमांक मिळवून होम मिनिस्टरचा बहुमान आणि इलेक्ट्रिक स्कूटर हे आकर्षक पहिले बक्षीस पटकावले. कार्यक्रमादरम्यान…

Read Full News

राजस्थानमध्ये गारपीट, उत्तर प्रदेशात तापमान 2 अंशांनी घसरले:तामिळनाडू-केरळमध्ये वादळी वारे, मध्य प्रदेशातील 21 जिल्ह्यांत पावसाचा इशारा

राजस्थानच्या दक्षिणेकडील जिल्ह्यांमध्ये बुधवारी वादळी वाऱ्यांसह पाऊस पडला आणि गारपीट झाली. पुढील तीन दिवस हवामान निरभ्र राहण्याची शक्यता आहे. दरम्यान, उत्तर प्रदेशातील अनेक शहरांमध्ये तापमान 2-3 अंशांनी घसरले आहे. पुढील 24 तासांत बंगालच्या उपसागरात आणि तामिळनाडूच्या किनारी भागात कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता आहे. त्यामुळे तामिळनाडू आणि केरळमध्ये मुसळधार पाऊस पडत आहे. हवामान विभागाने…

Read Full News

10कोटी मंजूर असूनही लाडसावंगी येथे जलजीवनचे काम 4वर्षांपासून रेंगाळले:45 दिवसांत पाणी न मिळाल्यास उपोषणाचा इशारा‎

केंद्र सरकारच्या अत्यंत महत्त्वाकांक्षी ‘जलजीवन मिशन’ अंतर्गत सुमारे १० कोटी रुपयांची पाणीपुरवठा योजना मंजूर होऊनही लाडसावंगीकरांची पाण्यासाठीची पायपीट थांबलेली नाही. योजनेचे काम गेल्या चार वर्षांपासून रेंगाळल्यामुळे सुमारे २५ हजार लोकसंख्या असलेल्या . शनिवारपासून गावात तीन टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्यात आला असला, तरी विहिरीवर पाणी रिकामे करताना आणि टँकरवरून पाणी भरताना नागरिकांना मोठी कसरत करावी लागत…

Read Full News

आंध्र प्रदेशसह तेलंगणाची आवक घटल्याने मोसंबीच्या दरात प्रतिटन 10हजारांची वाढ:पाचोड येथील बाजार समितीच्या मार्केटमध्ये दररोज 150 ते 200 टन मोसंबीची आवक‎

तेलंगण आणि आंध्र प्रदेशातील मोसंबीचा हंगाम संपुष्टात आल्याने देशभरातील प्रमुख बाजारपेठांत मराठवाड्याच्या मोसंबीला मागणी वाढू लागली आहे. परराज्यातील मोसंबीची आवक घटल्याचा फायदा मराठवाड्यातील शेतकऱ्यांना होत असून, गुणवत्तेनुसार प्रतिटन २० ते २८ हजार रु . पैठण तालुक्यातील निम्म्या भागातील मोसंबीची तोडणी पूर्ण झाली असली, तरी जायकवाडी धरण परिसरातील ५०० हून अधिक हेक्टरवरील मोसंबीची तोडणी शिल्लक आहे….

Read Full News

11% शुल्कमाफीने 2 हजार कोटींचा कापूस व्यापार संकटात:केंद्र सरकारच्या आयात शुल्कमाफीमुळे कापसाला क्विंटलमागे दीड हजारांचा बसणार फटका‎

दुष्काळामुळे कापसाचे उत्पादन घटत असतानाच केंद्र सरकारच्या ११ टक्के आयात शुल्कमाफीचा परिणाम छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील दोन हजार कोटी रुपयांहून अधिकच्या कापूस व्यापारावर होण्याची भीती व्यक्त होत आहे. जिल्ह्यात यंदा तब्बल २ लाख ८२ हजार ६०३ हेक्टरवर कपाशीची लागवड झाली आहे. सामान्य वर्षात या पांढऱ्या सोन्यातून सुमारे दोन ते अडीच हजार कोटी रुपयांची उलाढाल होत असल्याचा…

Read Full News

संरक्षण मंत्रालय लष्करासाठी ₹770 कोटींचे रडार खरेदी करणार:लढाऊ विमाने आणि छोटे ड्रोन ओळखून त्यांचा मागोवा घेणार; हवाई धोक्यांचा सामना करण्यास मदत

संरक्षण मंत्रालयाने भारतीय लष्कराची हवाई सुरक्षा मजबूत करण्यासाठी बुधवारी भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड (BEL) सोबत सुमारे ७७० कोटी रुपयांचा करार केला आहे. या अंतर्गत इम्प्रूव्ह्ड लो लेव्हल लाइट वेट रडार (LLLR-I) खरेदी केले जाणार आहेत. हे रडार फायटर जेटसोबतच अतिशय लहान ड्रोनचाही शोध घेऊन त्यांच्या हालचालींचा मागोवा घेऊ शकतील. हे रडार हवाई लक्ष्यांची ओळख पटवून कोणत्या…

Read Full News

पितळखोरा लेणी येथे 27 वा धम्म महोत्सव उत्साहात‎:बौद्ध धम्माचा खरा संदेश म्हणजे प्रज्ञा, करुणा आणि मैत्री- डॉ. प्रतिभा अहिरे

ज्यांच्या स्पर्शाचा विटाळ मानला जात होता आणि ज्यांना शूद्रातिशूद्र गणले गेले, अशा सर्व वंचितांना भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी बुद्ध धम्माच्या ओटीत टाकले. अत्यंत विशाल अशा मानवतावादी धम्माशी जोडून त्यांनी या वंचितांना खऱ्या अर्थाने वैश्विक केले. बुद्ध धम्माचा खरा संदेश म्हणजे प्रज्ञा, करुणा अन् मैत्री हा असल्याचे प्रतिपादन विद्रोही कवयित्री डॉ. प्रतिभा अहिरे यांनी केले….

Read Full News

Kader Khan Birth Anniversary | Struggle, Iconic Dialogues & Acting Career

8 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक “हम जहां खड़े हो जाते हैं, लाइन वहीं से शुरू होती है…” हा संवाद अमिताभ बच्चन यांच्यावर चित्रित करण्यात आला होता, पण हिंदी चित्रपटसृष्टीतील अशा अनेक संस्मरणीय संवादांमागे कादर खान यांची लेखणी होती. पडद्यावर आपल्या अभिनयाने आणि संवादांनी कधी हसवणारे, कधी रडवणारे, तर कधी खलनायकाची भूमिका साकारून घाबरवणारे कादर खान यांचे…

Read Full News

मोढा फाट्याजवळ 2दुचाकींची धडक; पतीचा जागीच मृत्यू:पत्नी गंभीर जखमी, सिल्लोड ग्रामीण पोलिसांकडून सीसीटीव्हीद्वारे तपास सुरू‎

सिल्लोड-भराडी रस्त्यावरील मोढा फाट्याजवळ बुधवारी दुपारी पावणेएक वाजेच्या सुमारास दोन दुचाकींची धडक होऊन झालेल्या अपघातात अंभई येथील सुभाष संपत दांडगे (४७) हे जागीच ठार झाले, तर त्यांची पत्नी कांताबाई सुभाष दांडगे (४२) या गंभीर जखमी झाल्या आहेत. त्यांच्यावर छत्रपती संभाजीनगर येथील शासकीय घाटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, सुभाष दांडगे हे पत्नी कांताबाई यांच्यासह…

Read Full News

44 वर्षांनंतर जुन्या आठवणींना मिळाला उजाळा:उंडणगाव येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये 1982 च्या माजी विद्यार्थ्यांची उपस्थिती

वय वाढले, जबाबदाऱ्या बदलल्या आणि आयुष्याच्या वाटा वेगवेगळ्या झाल्या; कुणी नोकरीतून निवृत्त झाले, कुणी संसारात रमले, तर कुणी आजोबाही झाले, मात्र शालेय दिवसांतील मैत्रीचा गोडवा आजही तसाच कायम असल्याचे पाहायला मिळाले. उंडणगाव येथील जिल्हा परिषद हायस्कूलमध्ये १९८२ च्या माजी विद्यार्थ्यांचे तब्बल ४४ वर्षांनंतर रविवारी स्नेहमिलन पार पडले. या सोहळ्यामुळे शाळेच्या परिसरात पुन्हा एकदा बालपणाचा आनंद…

Read Full News