Headlines

यंदाच्या दिवाळीमध्ये 18 कॅरेट दागिन्यांची राहणार क्रेझ, सोन्याचे भाव गगनाला भिडल्याने "18 कॅरेट'' ठरतेय नवा पर्याय

दिवाळीच्या मुहूर्तावर सोने खरेदी करणे शुभ मानले जाते; मात्र चालू वर्षात सोन्याचे दर जास्त असल्याने पारंपरिक २४ किंवा २२ कॅरेटचे दागिने खरेदी करणे सर्वसामान्यांच्या खिशाला परवडेनासे झाले आहे. या महागाईवर ग्राहकांनी आणि सराफ व्यावसायिकांनी एक नवा मार्ग शोधून काढला आहे. यंदाच्या दिवाळीत २४ कॅरेटच्या पारंपरिक वजनी दागिन्यांऐवजी १८ कॅरेटच्या दागिन्यांना ग्राहकांची पहिली पसंती मिळत आहे….

Read Full News

मुळा उजव्या कालव्यातून होतोय पाण्याचा अपव्यय:पाण्याचे आवर्तन तातडीने बंद करण्याची मागणी‎

मुळा उजव्या कालव्यातून दोन महिन्यांपासून शेतीसाठी आवर्तन सुरू झाले आहे. परंतु रोटेशन बंद करण्याची मागणी केली जात असताना पाटबंधारे विभाग मात्र दुर्लक्ष करत असल्याने पाणी बचतीचे धडे देणाऱ्या मुळा पाटबंधारे विभागाकडून पाटपाण्याचे योग्य नियोजन केले जात नसल्याने अक्षरशः दुष्काळात पाण्याची उधळपट्टी आता तरी थांबवा अशी मागणी करत पुढे काय होईल असा प्रश्न उपस्थित केला जात…

Read Full News

तहसील कार्यालयासमोर दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांचा महामुक्काम सत्याग्रह:मागण्या पूर्ण न झाल्यास मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानावर मोर्चा‎

तालुक्यासह राज्यभरातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या न्याय्य मागण्यांसाठी अकोले तहसील कार्यालयासमोर बुधवारपासून सीपीएमचे राज्यव्यापी महामुक्काम सत्याग्रह सुरू झाला. हे आंदोलन गुरुवारी दुसऱ्या दिवशीही सुरूच राहणार आहे. दुष्काळग्रस्तांच्या प्रश्नावर सरकारचे लक्ष वेधण्यासाठी किसान सभा, सिटू, जनवादी महिला संघटना आणि डीवायएफआयने हा एल्गार पुकारला आहे. या आंदोलनात दुष्काळ हाच मुख्य मुद्दा असून यंदा पावसाने ओढ दिल्याने अकोलेसह नगर जिल्ह्यात…

Read Full News

‘टेस्ला’च्या नावाखाली संभाजीनगरात व्यापाऱ्याला 1.25 कोटी रुपयांचा गंडा:गुरुग्रामच्या ‘टेस्ला पॉवर इंडिया’च्या संचालकांवर क्रांती चौक पोलिसांत गुन्हा

अमेरिकेतील इलॉन मस्क यांच्या मालकीच्या टेस्लाशी साधर्म्य असलेल्या कंपनीत बॅटरी, इन्व्हर्टर आणि सोलार पॅनल व्यवसायात भागीदारी देण्याच्या बहाण्याने छत्रपती संभाजीनगर शहरातील एका व्यापाऱ्याची १ कोटी २२ लाख रुपयांची फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. . शक्तिनगर येथील ए. पी. एंटरप्रायजेसचे मालक अतुल नारायण पायगव्हाण (५१) यांनी ही फिर्याद दिली. ऑगस्ट २०२१ मध्ये त्यांना टेस्ला पॉवर…

Read Full News

सफाई कामगारांना विविध शासकीय योजनांची माहिती:चांदवड नगरपरिषदेत नशामुक्तीची सामूहिक शपथ‎

नगरपरिषदेतील सफाई कामगारांना कल्याणकारी योजनांची माहिती देण्यासह व्यसनमुक्तीचा संदेश देण्यासाठी विशेष मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) आणि समाज कल्याण विभाग, नाशिक यांच्या वतीने आयोजित या शिबिरात समतादूत अर्चना किरोते यांनी बार्टी व समाज कल्याण विभागाच्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती दिली. यावेळी सफाई कामगारांच्या पाल्यांसाठी असलेल्या विविध शैक्षणिक…

Read Full News

दसऱ्याच्या परंपरेतून सामाजिक एकतेचा संदेश:64 वर्षांनंतर पगार कुटुंबियांना मान; सर्व जाती-धर्मांतील प्रतिष्ठितांचा फेटा बांधून सन्मान‎

सर्व जाती-धर्मांतील प्रतिष्ठित नागरिकांचा फेटा बांधून सन्मान आणि काळानुरूप बदल स्वीकारत परंपरेचे जतन, अशा वैशिष्ट्यांमुळे कळवण शहरातील दसऱ्याची परंपरा सामाजिक एकतेचा संदेश देणारी ठरत आहे. यंदा ६४ वर्षांनंतर पगार कुटुंबियांना दसऱ्याचा मान मिळाला. यावे . तक्ष्मी नंबर चारचे कै. पुंजाराम नथू पगार, कै. पुंडलिक मोतीराम पगार आणि कै. दिगंबर पुंजाराम पगार यांच्या कुटुंबातील भास्कर पगार,…

Read Full News

लोहोणेर विद्यालयात 150 विद्यार्थ्यांनी साकारले पर्यावरणपूरक आकाशकंदील:कागद, कापड, दोरे वस्तूंचा वापर करून साकारले आकाशकंदील‎

दिवाळीच्या पार्श्वभूमीवर पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यासाठी लोहोणेर येथील मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या लोहोणेर जनता विद्यालयात ‘आमची शाळा, आमचे उपक्रम’ या उपक्रमांतर्गत पर्यावरणपूरक आकाशकंदील निर्मिती कार्यशाळा उत्साहात झाली. या कार्यशाळेत १५० हून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेत आपल्या कल्पकतेतून आकर्षक आकाशकंदील साकारले. मुख्याध्यापक जिभाऊ शिर्के व पर्यवेक्षक विलास निकम यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. कलाशिक्षक…

Read Full News

प्रियंका गांधी यांच्या मुलाची छायाचित्रे प्रदर्शनातून काढली:यामध्ये रेहान वाड्राने काढलेली 70 हून अधिक छायाचित्रे; म्हणाला- तिरंग्याचे छायाचित्र हटवणार नाही

दिल्लीतील बिकानेर हाऊसने प्रियंका गांधी आणि रॉबर्ट वाड्रा यांचा मुलगा रेहान याच्या अलीकडील दिल्लीतील आंदोलनांशी संबंधित अनेक छायाचित्रे प्रदर्शनातून काढून टाकली आहेत. त्याचे प्रदर्शन सुरू होण्याच्या काही तास आधी हा निर्णय घेण्यात आला. या प्रकरणी बिकानेर हाऊसकडून अद्याप कोणतेही निवेदन आलेले नाही. रेहानच्या एकल छायाचित्र प्रदर्शनाचे नाव ‘नो आयडिया इज फायनल’ आहे. त्याचे प्रिव्हयु बुधवारी…

Read Full News

दुष्काळाच्या झळा असह्य; अकरा वर्षे जपलेल्या द्राक्षबागेवर चालवली कुऱ्हाड:चौगावच्या शेतकऱ्यांचे टोकाचे पाऊल; नापिकी, निसर्गाच्या लहरीपणाने हतबल‎

दुष्काळ, नापिकी आणि निसर्गाच्या लहरीपणामुळे आधीच आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांसमोर यंदा पाणीटंचाईचे नवे संकट उभे राहिले आहे. पाण्याअभावी द्राक्षबाग जगविणे अशक्य झाल्याने चौगाव येथील शेतकरी लक्ष्मण जिभाऊ मांडवडे यांनी कऱ्हे शिवारातील दोन एकरांतील अकरा वर्षे जपलेली द्राक्षबाग कुऱ्हाडीने तोडण्याचा निर्णय घेतला. वर्षानुवर्षे मेहनतीने उभी केलेली बाग स्वतःच्या हाताने तोडण्याची वेळ आल्याने दुष्काळाची दाहकता आणि शेतीसमोरील…

Read Full News

संभाजीनगरात बहिणीशी बोलल्याच्या रागातून अल्पवयीन मुलाचे अपहरण करून रूममध्ये डांबले:पोलिसांनी सीसीटीव्हीआधारे अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले

बहिणीशी बोलल्याच्या रागातून दहावीमध्ये शिकणाऱ्या मुलाचे काही अल्पवयीन मुलांच्या टोळक्याने अपहरण केले. ही घटना सोमवारी (१९ ऑक्टोबर) सायंकाळी जुन्या मोंढ्यात घडली. यात तरुणाला रूममध्ये नेत मारहाण केली. या प्रकरणी जिन्सी ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर पोलिसांनी सीसीटीव्हीच्या आधारे अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे. अल्पवयीन मुलांमध्ये गुन्हेगारी वाढली : मुकुंदवाडी ठाण्याच्या हद्दीत अल्पवयीन मुले…

Read Full News