Headlines

22 राज्यातील 3 हजार विद्यार्थ्यांच्या चित्तथरारक कवायती:श्री हव्याप्र मंडळाच्या 101 व्या राष्ट्रीय विजयादशमी महोत्सवाला अखंड भारताचे स्वरूप‎

. जिल्ह्याचे कुलदैवत श्री अंबादेवी व श्री एकवीरादेवी नवरात्रोत्सवाचा स्मरणीय समारोप होतो. तो श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाच्या राष्ट्रीय विजयादशमी (दसरा) महोत्सवाने होतो. मंगळवारी २० रोजी स्थानिक अमरावती-बडनेरा मार्गावरील दसरा मैदानावर या १०१ व्या ऐतिहासिक राष्ट्रीय विजयादशमी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. मंडळामध्ये शिकत असलेल्या सर्व विभागांतील २२ राज्यांतील तब्बल ३ हजारांपेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी भारतीय…

Read Full News

रणबीर कपूरने आपल्या वक्तव्याबद्दल माफी मागितली:म्हटले होते—सत्य आणि चांगुलपणाचा अंत होईल; ट्रोलिंगनंतर म्हणाला- जीभ घसरली होती

रणबीर कपूर यांनी सत्य आणि चांगुलपणाच्या अंताबाबत केलेल्या वक्तव्याबद्दल माफी मागितली आहे. अनवधानाने त्यांच्या तोंडून चुकीचे शब्द निघाले, असे त्यांनी सांगितले. हे वक्तव्य त्यांनी २० ऑक्टोबर रोजी पश्चिम बंगालमधील दसरा कार्यक्रमात केले होते. त्यांच्या वक्तव्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर त्यांना ट्रोलिंगचा सामना करावा लागला. २१ ऑक्टोबर रोजी चेन्नईमध्ये त्यांच्या ‘रामायण’ चित्रपटाच्या ग्रँड म्युझिकल इव्हेंट…

Read Full News

समाजकार्यासह किडनी प्रत्यारोपणासाठी घेतला पुढाकार:महावितरणच्या महिला कर्मचाऱ्यांचे कौतुकास्पद कार्य शहरात ठरला चर्चेचा विषय

महावितरणसारख्या अत्यावश्यक सेवेत कार्यरत असताना महिला कर्मचाऱ्यांना नोकरीसोबतच कुटूंबाची जबाबदारी सांभाळण्याचे दुहेरी आव्हान असते. ते आव्हान लिलया पेलताना जिल्ह्यातील काही महिला कर्मचाऱ्यांनी किडनी प्रत्यारोपण चळवळीसोबतच सामाजिक कार्यालाही गती दिली आ . ​नवरात्रोत्सवाचे औचित्य साधून महावितरणतर्फे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. येथील विद्याभारती महाविद्यालयाच्या सभागृहात या विशेष सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. यावेळी बोलताना मुख्य अभियंता…

Read Full News

साईनामाच्या गजराने घोराड दुमदुमले:पुण्यतिथीनिमित्त भक्तीचा भव्य जागर, ढोल-ताशांच्या गजरात निघाली पालखी मिरवणूक‎

साईबाबांच्या पुण्यतिथीनिमित्त घोराड येथे विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. सकाळपासूनच साईबाबांच्या दर्शनासाठी मंदिरात भाविकांची गर्दी झाली होती. साईनामाचा जयघोष, टाळ-मृदंगाचा आवाज आणि ढोल-ताशांच्या गजरात पालखी मिरवणूक काढण्यात आली. . सोहळ्याची सुरुवात सकाळी मंगल स्नानाने करण्यात आली, त्यानंतर साईचरित्र पारायणाचे वाचन करण्यात आले. यावेळी परिसरातील तसेच पंचक्रोशीतील भाविकांनी साईबाबांच्या दर्शनासाठी गर्दी केली होती. सोहळ्यात…

Read Full News

मतदान हे व्यक्तिस्वातंत्र्याचे साधन, पण सरकारने त्यावरच घाला घातला:ॲड. प्रकाश आंबेडकर यांचा घणाघात, दुष्काळावर खडसावले‎

प्रतिनिधी | अकोला मतदान हे व्यक्तिस्वातंत्र्याच े साधन आहे, मात्र सरकारने एसआयआर प्रक्रियेचा नावाखाली मतदार याद्यांमधून मतदारांची नावे कापत त्यावरच घाला घातला, असा घणाघात वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी केला. ते शहरातील क्रिकेट क्लब मैदानावर बुधवारी रात्री आयोजित धम्ममेळाव्यात अनुयायांना संबोधित करत होते. धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त दी बुद्धिष्ट सोससायटी ऑफ इंडिया…

Read Full News

मिरवणुकीतून समता, न्याय, बंधुत्वाचा संदेश:अनुयायांकडून “जयभीम’चा गजर, भारतीय बौद्ध महासभेचा पुढाकार; तरुणाईचा मोठा जल्लोष‎

. धम्मचक्र प्रवर्तन दिन महोत्सवांतर्गत शुक्रवारी काढण्यात आलेल्या मिरवणुकीत बहुजन समाजातील परंपरा, संस्कृतीचे दर्शन घडले. समता, न्याय, बंधुत्वाचा संदेश देत निघालेल्या या मिरवणुकीने आकर्षक देखावे, देखावे, घोडे, स्वयंशिस्त समूह, क्रीडा मंडळांच्या चित्तथरारक प्रात्यक्षिकांनी अकोलेकरांचे लक्ष वेधून घेतले होते. भिक्खुसंघाची उपस्थिती. महापुरुषांच्या प्रतिमांचे फलक. चित्तथरारक कवायती. लेझीम पथक. मार्गावरील आकर्षक विद्युत रोषणाई. वाद्यांची साथ अशा उत्साही…

Read Full News

साहिल वाकोडेची आत्महत्या नव्हे, तर ती संस्थात्मक हत्या:युवा नेते सुजात आंबेडकर यांची व्यवस्थेवर टीका‎

समतेचे विचार रुजवणाऱ्या सर्व महामानवांना त्रिवार अभिवादन करून वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांनी भाषणाची सुरुवात केली. मंचावर उपस्थित नेते, भंतेजी, उपासक-उपासिका आणि चळवळीतील कार्यकर्त्यांना त्यांनी क्रांतिकारक ‘जय भीम’चा नारा देत संबोधित केले. जातीव्यवस्थेच्या हिंसाचारामुळे आणि संस्थात्मक हत्यांमुळे जीव गमावलेल्या शहीद रोहित वेमुला, डॉ. पायल तडवी, विराज जगताप, नितीन आगे, सागर शेजवळ, अक्षय…

Read Full News

फ्रान्समधील दंगली आणि भारतातील निदर्शनांमध्ये कनेक्शनचा दावा:रिपोर्ट- 9 देशांतील 101 संघटनांचे नेटवर्क, इंडियन अलायन्स पॅरिस संदेश शेअर करते

फॉक्स न्यूजच्या एका डिजिटल तपासणी अहवालात फ्रान्समधील दंगली आणि भारतात मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी करत झालेल्या निदर्शनांमध्ये संबंध असल्याचा दावा करण्यात आला आहे. अहवालानुसार, ९ देशांमध्ये पसरलेले १०१ संघटनांचे जाळे युरोपमधील निदर्शने आयोजित करणे, त्यांच्यात समन्वय साधणे आणि संदेश प्रसारित करण्यात सक्रिय आहे. अहवालात या जाळ्याला ‘रेड-ग्रीन प्रोटेस्ट इकोसिस्टम’ असे म्हटले…

Read Full News

कचराकोंडीत अमरावतीकरांचा सण ठरतोय ‘दुर्गंधीमय’; स्वच्छता बंदच:नवरात्रोत्सवात कचऱ्यामुळे शहरात दुर्गंधी, फुले, पाने, रस्त्यावर साचली‎

. शहराच्या स्वच्छतेचे केंद्रीय कंत्राट घेणारी कोणार्क इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी व महानगरपालिकेचे समीकरण अजूनही जुळले नाही. कोणार्क कंपनी सतत कोणत्या ना कोणत्या कारणामुळे वादग्रस्त ठरत आहे. त्याचा साहजिकच परिणाम शहराच्या स्वच्छतेवर होत आहे. नियमित वेतन देण्यात अपयशी ठरत असल्यामुळे कोणार्कचे कर्मचारी ऐन सण-उत्सव पाहून कामबंद आंदोलन करीत आहेत. त्यामुळे शहरात सर्वत्र अस्वच्छता दिसून येत आहे. गणेशोत्सवात…

Read Full News

टायगर श्रॉफ फायरिंग- हरियाणातून आतापर्यंत 7 अटक:2 मुख्य शूटर, 4 शस्त्र पुरवठादार; कुणालची गर्लफ्रेंड राधाने मुंबईला पोहोचवली शस्त्रे, अंकितने केली रेकी

बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफवर झालेल्या गोळीबाराच्या प्रकरणात तपास जसजसा पुढे सरकत आहे, तसतसा हरियाणा कनेक्शन अधिक गडद होत आहे. या प्रकरणात आतापर्यंत राज्यातील 7 तरुणांची नावे समोर आली आहेत. यापैकी शूटर रेहान अन्सारी आणि फूल सिंह यांच्यासह 6 आरोपी एकट्या सोनीपत जिल्ह्यातील आहेत, तर परदेशात बसून संपूर्ण कटाची सूत्रे हलवणारा हँडलर अनिल पंडित हा पानिपतचा…

Read Full News