Headlines

निरोगी मुलांना प्रोटीन पावडरची गरज नाही:संतुलित घरगुती आहार पुरेसा असतो – आहारतज्ज्ञ डॉ. इंशारा मुस्तफा

मुलांची उंची वाढावी, शरीराची चांगली वाढ व्हावी आणि ताकद मिळावी, यासाठी त्यांच्या आहारात प्रथिनांचे प्रमाण वाढवण्याकडे पालकांचा कल वाढत आहे. दूध, अंडी, पनीर यांसोबतच प्रोटीन पावडर, प्रोटीन बार आणि प्रथिनयुक्त पदार्थांना पसंती दिली जात आहे. मात्र, बहुतांश निरोगी मुलांना संतुलित घरगुती आहारातूनच पुरेशी प्रथिने मिळू शकतात. त्यामुळे गरजेपेक्षा अधिक प्रथिने देण्याचा आग्रह धरण्याची आवश्यकता नाही,…

Read Full News

दीक्षाभूमीवर 3 दिवसांत 144 टन कचरा उचलला:एका दिवसात 41 हजार अनुयायांचा बसप्रवास; 872 कर्मचारी स्वच्छतेसाठी तैनात

दीक्षाभूमीवर धम्मचक्र प्रवर्तन दिनासाठी लाखो अनुयायी आले होते. नागपूर महापालिकेसमोर स्वच्छता आणि वाहतुकीचे मोठे आव्हान होते. १८ ते २० ऑक्टोबर या तीन दिवसांत दीक्षाभूमी परिसरातून १४४ टन कचरा उचलला, तर ‘आपली बस’मधून ५८ हजार ८४ प्रवाशांनी प्रवास केला. स्वच्छतेसाठी मनपाच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाने ८७२ सफाई कर्मचारी तीन पाळ्यांमध्ये तैनात केले. कचरा संकलनासाठी २३४ कर्मचारी, १०८…

Read Full News

Dark AI App Launch | Zomato Blinkit Deepinder Goyal Privacy Feature

नवी दिल्ली5 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक झोमॅटो आणि ब्लिंकइट चालवणारी कंपनी एटरनल ‘dark.ai’ नावाचे नवीन AI ॲप आणण्याच्या तयारीत आहे. कंपनीचे मालक दीपिंदर गोयल यांनी सांगितले की, या ॲपमध्ये तुम्ही कोणतीही भीती न बाळगता तुमच्या गुप्त गोष्टी किंवा विचार शेअर करू शकाल. यामध्ये तुमच्या चॅट कुठेही सेव्ह केल्या जाणार नाहीत आणि तुमची गोपनीयता पूर्णपणे सुरक्षित राहील….

Read Full News

खराशीत महाप्रसादातून 169 हून अधिक ग्रामस्थांना विषबाधा:यात तीन गर्भवती महिलांचा समावेश; एफडीएकडे पूर्वसूचना अर्ज नव्हता

भंडारा जिल्ह्यातील खराशी गावात महाप्रसादातून १६९ हून अधिक लोकांना अन्नबाधा झाली. यात तीन गर्भवती महिलांचा समावेश आहे. उलट्या आणि जुलाबाचा त्रास झाल्याने अनेकांना खराशी, पालांदूर, भंडारा येथील रुग्णालयांत दाखल केले. प्रशासनाने आरोग्य शिबिर सुरु केले आहे. एफडीएचे सहायक आयुक्त नीलेश ताथोड यांनी सांगितले की, महाप्रसादासाठी सात दिवस आधी पूर्वसूचना अर्ज नव्हता. त्यामुळे तपासणी करता आली…

Read Full News

सातारा जिल्हा बँकेत दिग्गजांची माघार:7 जागा बिनविरोध, उर्वरित 14 जागांवर राजकीय संघर्ष

सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत उमेदवारी अर्ज माघारीच्या अंतिम टप्प्यात राजकीय घडामोडींना वेग आला. दहा वर्षांच्या संचालकपदाच्या मर्यादेशी संबंधित न्यायालयीन निर्णयाचा परिणाम निवडणुकीवर झाला असून, अनेक प्रस्थापित नेत्यांना उमेदवारीपासून दूर राहावे लागले आहे. परिणामी, जिल्हा बँकेतील सत्तासमीकरणे नव्याने आकार घेत आहेत. अर्ज माघारीनंतर सात जागांवरील निवड बिनविरोध होण्याचा मार्ग मोकळा झाला असून, उर्वरित 14…

Read Full News

पुणे पदवीधर-शिक्षक निवडणूक: 23 ऑक्टोबरला मतदान:जिल्ह्यात पदवीधरांसाठी 160 , तर शिक्षकांसाठी 72 मतदान केंद्रे; 27 ऑक्टोबरला मतमोजणी

महाराष्ट्र विधान परिषदेच्या पुणे विभाग पदवीधर व पुणे विभाग शिक्षक मतदारसंघांच्या द्विवार्षिक निवडणुकीसाठी शुक्रवार, २३ ऑक्टोबर रोजी मतदान होणार आहे. सकाळी ८ ते सायंकाळी ४ या वेळेत मतदान प्रक्रिया पार पडणार असून, पुणे जिल्ह्यात पदवीधर मतदारसंघासाठी १६०, तर शिक्षक मतदारसंघासाठी ७२ अशी एकूण २३२ मतदान केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत. या दोन्ही मतदारसंघांत पदवीधर मतदारसंघासाठी…

Read Full News

सरकार म्हणाले- वृत्तवाहिन्यांनी देशविरोधी मजकूर दाखवू नये:प्रक्षोभक वादविवाद टाळा, AI चा योग्य वापर करा; मार्गदर्शक सूचनांमध्ये १० निर्देश

माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने सर्व खासगी सॅटेलाइट टीव्ही चॅनेल्ससाठी बुधवारी नवीन सल्लागार सूचना जारी केली. याअंतर्गत न्यूज चॅनेल्सना राष्ट्रविरोधी आशय दाखवू नये, असे निर्देश देण्यात आले आहेत. चॅनेल्सनी भडकाऊ चर्चांपासून दूर राहावे. यासोबतच मंत्रालयाने चॅनेल्सना एआयचा योग्य पद्धतीने वापर करण्यास सांगितले आहे. मंत्रालयाने म्हटले आहे की, अनेक खासगी टीव्ही चॅनेल्सवर प्रोग्राम कोडमधील तरतुदींचे पालन केले…

Read Full News

बिश्नोई गँगपासून आंदोलकांना पैशांच्या आरोपांपर्यंत नाना पटोलेंचा भाजपवर हल्लाबोल:‘देशाचे-राज्याचे गृहमंत्री झोपलेत का?’ जयकुमार गोरेंचा अभ्यास कमी असल्याचा टोला

काँग्रेस नेते नाना पटोले यांनी लॉरेन्स बिश्नोई गँगच्या कारवायांवरून महाराष्ट्र सरकार आणि केंद्र सरकारला धारेवर धरले आहे. गुजरातमधील तुरुंगात असलेल्या लॉरेन्स बिश्नोईच्या नावाने धमक्या आणि इतर कारवाया सुरू असल्याचा मुद्दा उपस्थित करत देशाचे आणि राज्याचे गृहमंत्री नेमके काय करत आहेत, असा सवाल पटोले यांनी केला. बिश्नोई गँगकडून कलाकारांनंतर राजकीय नेत्यांनाही लक्ष्य केले जात असल्याच्या खासदार…

Read Full News

सेंगोल बनवणारे एथिराज यांचे निधन, 99 वर्षांचे होते:1947 मध्ये नेहरूंना मिळाले, मोदींनी 2023 मध्ये संसदेत आणले; कुटुंब 71 वर्षे अनभिज्ञ राहिले

नवीन संसद भवनात स्थापित करण्यात आलेल्या सेंगोलचे निर्माते ज्वेलर्स तिरू वुम्मिडी एथिराज यांचे बुधवारी चेन्नई येथे निधन झाले. ते ९९ वर्षांचे होते. एथिराज यांनी ऐतिहासिक ‘सेंगोल’ तयार करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. हा सेंगोल १९४७ मध्ये देशाच्या स्वातंत्र्याच्या वेळी तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्याकडे सोपवण्यात आला होता. स्वातंत्र्यानंतर सेंगोल प्रयागराज येथील इलाहाबाद संग्रहालयाच्या नेहरू दालनात…

Read Full News

हल्ल्यानंतर 2 दिवसांनी टायगर श्रॉफ शूटिंगवर परतला:'लग जा गले' चित्रपटाच्या सेटवर पोहोचला अभिनेता; कारवर झाला होता गोळीबार

मुंबईतील जुहूमध्ये कारवर झालेल्या गोळीबाराच्या घटनेनंतर अवघ्या दोन दिवसांनी अभिनेता टायगर श्रॉफ कामावर परतला आहे. टाइम्स नाऊच्या वृत्तानुसार, १८ ऑक्टोबर रोजी झालेल्या हल्ल्यानंतर टायगरने २० ऑक्टोबरपासून त्याच्या आगामी ‘लग जा गले’ या चित्रपटाचे शूटिंग पुन्हा सुरू केले आहे. हा एक रोमँटिक-अॅक्शन चित्रपट आहे, ज्यामध्ये टायगर पहिल्यांदाच जान्हवी कपूर आणि लक्ष्यसोबत पडदा शेअर करताना दिसणार आहे….

Read Full News