संभाव्य पाणीटंचाईचा सामना करण्यासाठी प्रशासन सज्ज:जलजीवन मिशनअंतर्गत 75 ते 99 टक्के पूर्ण झालेल्या योजना प्राधान्याने सुरू करण्याचे मंत्री गुलाबराव पाटील यांचे निर्देश
नागपूर, अमरावती आणि कोकण विभागांतील आगामी काळातील संभाव्य पाणीटंचाईचा सामना करण्यासाठी प्रशासनाने आतापासूनच नियोजन करावे. संभाव्य पाणीटंचाईच्या सर्व टप्प्यांचा विचार करून वस्तुनिष्ठ आणि गावनिहाय कृती आराखडे येत्या 25 ऑक्टोबरपर्यंत सादर करावेत. तसेच, जलजीवन मिशनअंतर्गत 75 ते 99 टक्के कामे पूर्ण झालेल्या पाणीपुरवठा योजना प्राधान्याने पूर्ण करून कार्यान्वित कराव्यात, असे निर्देश पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव…