Headlines

सोमनाथ मंदिराजवळ मांसाहारी पदार्थ विकण्यावर बंदी नाही:गुजरात उच्च न्यायालयाने सरकारी बंदी हटवली, म्हटले- जिल्हाधिकाऱ्यांनी अधिकारांचा गैरवापर केला

गुजरात उच्च न्यायालयाने सोमनाथ मंदिराच्या आसपास विकल्या जाणाऱ्या मांसाहारी खाद्यपदार्थांवर सरकारने घातलेली बंदी रद्द केली आहे. न्यायालयाने या आदेशाला स्थगिती देण्याची राज्य सरकारची मागणीही फेटाळून लावली. न्यायमूर्ती निशा एम. ठाकोर यांच्या खंडपीठाने सरकारचा युक्तिवाद फेटाळून बंदी रद्द केली. राज्य सरकारने सोमनाथ मंदिराच्या आसपास मांसाहारी खाद्यपदार्थ विकण्यावर बंदी घातली होती. न्यायालयाने म्हटले की, जिल्हाधिकाऱ्यांनी गुजरात पोलिस…

Read Full News

स्वारगेट स्थानकाजवळ गांजा विक्रीसाठी आलेले दोघे अटकेत:पोलिसांनी 6 किलो गांजा, मोबाइल आणि रोकड जप्त केली

पुण्यातील स्वारगेट स्थानक परिसरात गांजा विक्रीसाठी आलेल्या दोघांना गुन्हे शाखेने अटक केली. त्यांच्याकडून सहा किलो गांजा, मोबाइल आणि रोकड असा ४ लाख २६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. जप्त गांजाची किंमत ३ लाख रुपये आहे. अटक केलेल्यांची नावे आशिष रमेश शिंदे (वय २१, रा. पीएमटी कॉलनी, अप्पर इंदिरानगर, बिबवेवाडी) आणि आशितोष उर्फ स्वप्नील सोमनाथ…

Read Full News

साहित्य संमेलने चळवळ व्हावीत:डॉ. सदानंद मोरे यांचे मत; आळंदीत 17 व्या नांदी संमेलनाचा समारोप

आळंदी येथे १७ व्या नांदी साहित्य संमेलनाचा समारोप झाला. साहित्य संमेलने औपचारिक न राहता अखंड चळवळ व्हावीत, असे साहित्य संस्कृती मंडळाचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ साहित्यिक डॉ. सदानंद मोरे म्हणाले. विश्वशांती केंद्र आळंदी, माईर्स एमआयटी पुणे, महाराष्ट्र साहित्य परिषद आणि महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा विभागाने संयुक्तपणे हे संमेलन आयोजित केले होते. समारोप कार्यक्रमात डॉ. मोरे प्रमुख…

Read Full News

सिंबायोसिसच्या एपीक्यूएन शैक्षणिक परिषदेचे उद्घाटन:प्रत्येक विद्यार्थ्याला गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळालेच पाहिजे, मंत्री चंद्रकांत पाटलांचे प्रतिपादन

शिक्षणामुळे व्यक्तीचे जीवन बदलते, तर दर्जेदार शिक्षण देशाचे भविष्य घडवते. त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्याला त्याची सामाजिक किंवा आर्थिक पार्श्वभूमी कोणतीही असली, तरी गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळालेच पाहिजे. प्रत्येक पदवीची विश्वासार्हता टिकविण्यासोबतच विद्यार्थ्यांना भविष्यातील आव्हानांचा सामना करण्यासाठी सक्षम बनविणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले. सिंबायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठ, लवळे येथे शुक्रवारी…

Read Full News

पाकिस्तानातील मंदिरात लावले ‘रामायण’चे पोस्टर:लोकांनी ‘जय श्री राम’च्या घोषणाही दिल्या, चित्रपटाला ऑस्कर मिळावा यासाठी प्रार्थना केली

रणबीर कपूर यांच्या ‘रामायण’ चित्रपटाबाबत पाकिस्तानमध्येही उत्साह पाहायला मिळत आहे. पाकिस्तानातील कराची येथील एका मंदिरात ‘रामायण’ चित्रपटाचे पोस्टर लावण्यात आले आहे. यूट्यूबवर समोर आलेल्या एका व्हिडिओमध्ये येथील हिंदू समुदायातील काही लोक ‘जय श्री राम’च्या घोषणा देताना दिसत आहेत. व्हिडिओमध्ये कराचीतील एका मंदिरात चित्रपटाचे पोस्टर दिसत आहे. पोस्टरमध्ये रणबीर कपूर, सई पल्लवी आणि यश दिसत आहेत….

Read Full News

नीलेश राणेंच्या टीकेला कोणीही गांभीर्याने घेऊ नये!:आधी भाजपवर टीका करायची अन् नंतर वडिलांमार्फत सेटलमेंट करायची हा त्यांचा जुनाच धंदा; वैभव नाईकांची टीका

“भाजपच्या जिवावर निवडून यायचे, त्यांच्याच नेत्यांवर खालच्या पातळीवर जाऊन टीका करायची आणि प्रकरण अंगाशी आले की वडिलांमार्फत भाजपशी तडजोड (कॉम्प्रोमाईज) करायची, हा निलेश राणे यांचा गेल्या अनेक वर्षांपासूनचा ठरलेला राजकीय पॅटर्न आहे. त्यामुळे भाजपचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांच्यावर निलेश राणे यांनी केलेल्या टीकेला कोणीही गांभीर्याने घेण्याची अजिबात गरज नाही,” अशा अत्यंत तिखट शब्दांत शिवसेना…

Read Full News

'अंतर्वस्त्रे काढून डोक्यावर घातली, नाजूक भागांवर मारहाण':राम पूर्णेकरांचे ठाणे पोलिसांवर अमानुष अत्याचाराचे गंभीर आरोप

शिवसेना ठाकरे गटाचे विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्याप्रकरणावरून राजकीय वातावरण प्रचंड तापलेले असतानाच, राम पूर्णेकर यांनी शुक्रवारी ठाणे पोलिसांवर गंभीर आरोप केले आहेत. गुरुवारी आदित्य ठाकरे यांनी ठाण्यात पूर्णेकर कुटुंबाची भेट घेतल्यानंतर ठाणे पोलिस आयुक्तांचीही भेट घेतली होती. राम पूर्णेकर यांच्या दाव्यानुसार, या भेटीदरम्यान आदित्य ठाकरे यांच्यासोबत असलेल्या दोन तरुणांना कापूरबावडी पोलिसांनी शोधून पोलिस ठाण्यात…

Read Full News

पदवीधर मतदारसंघांच्या तिन्ही जागा महाविकास आघाडीने जिंकल्या:भाजपच्या सत्तेला उतरती कळा लागण्याचे संकेत; काँग्रेसच्या भूमिकेला सुशिक्षित मतदारांचा पाठिंबा वाढल्याचा गोपाळ तिवारी यांचा दावा

महाराष्ट्र विधान परिषदेच्या पदवीधर मतदारसंघांच्या निवडणुकीत महाविकास आघाडीने तीनही जागांवर मिळवलेल्या विजयातून भाजपच्या मनमानी सत्तेला उतरती कळा लागण्याचे संकेत मिळत आहेत. संविधानिक लोकशाहीचे रक्षण, मतपत्रिकेवर मतदान आणि सामाजिक सलोखा या मुद्द्यांवरील काँग्रेसच्या भूमिकेला सुशिक्षित मतदारांकडून वाढता पाठिंबा मिळत असल्याचे या निकालातून दिसून येते, असे मत प्रदेश काँग्रेसचे वरिष्ठ प्रवक्ते गोपाळ तिवारी यांनी व्यक्त केले. भाजपच्या…

Read Full News

नेहरू स्टेडियमजवळ कारमध्ये शुभम बनसोडे यांचा मृतदेह आढळला:दुर्गंधीच्या फोननंतर पोलिसांनी कार तपासली; मृत्यूचे कारण शोधण्यासाठी तपास सुरू

स्वारगेट येथील नेहरू स्टेडियमजवळ उभ्या असलेल्या एका कारमध्ये शुभम बनसोडे यांचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. बनसोडे हे काळेपडळ परिसरातील रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे. घटनेची माहिती मिळताच स्वारगेट पोलिसांसह गुन्हे शाखेची पथके घटनास्थळी दाखल झाली असून, मृत्यूच्या कारणांचा शोध घेण्याचे काम सुरू आहे. नेहरू स्टेडियमजवळ एका कारमध्ये व्यक्तीचा मृतदेह असल्याची माहिती…

Read Full News

धंगेकरांना सिरियसली कोण घेणार?:2022ला पाठीत खंजीर खुपसला, किशोरी पेडणेकर यांचा पलटवार; पूर्णेकर हत्याकांडावरूनही डागली तोफ

“रवींद्र धंगेकरांसारख्या लोकांना कोणी किती गांभीर्याने घ्यायचे? पक्ष बदलत फिरत राहायचे आणि प्रसिद्धीसाठी वाटेल तशी विधाने करायची. 2022 मध्ये ज्यांनी उद्धवजींच्या पाठीत उघडपणे खंजीर खुपसला, त्यांना धंगेकर ‘एक रक्त’ कसे काय म्हणू शकतात? आमच्या पक्षात किंवा नेतृत्वात अशा मनोमिलनाची कोणतीही चर्चा नाही आणि ती कधी होईल असे वाटतही नाही,” अशा शब्दांत मुंबईच्या माजी महापौर तथा…

Read Full News