Headlines

मराठवाड्यातील 15 हजार न्यायालयीन कर्मचाऱ्यांचे काळ्या फिती लाऊन आंदोलन:समान काम, समान वेतनाची मागणी, अन्यता 5 नोव्हेंबर रोजी सामुहिक रजा आंदोलन

मुंबई उच्च न्यायालयाच्या धर्तीवर इतर न्यायालयातील कर्मचाऱ्यांनाही समान काम समान वेतनाच्या धर्तीवर वेतनश्रेणी लागू करावी या मागणीसाठी न्यायालयीन कर्मचारी संघटनेने शुक्रवारी ता. 16 काळ्या फिती लाऊन कामकाज सुरु केले आहे. मराठवाड्या्तील सुमारे 15 हजार कर्मचारी या आंदोलनात सहभागी झाले आहेत. शासनाने मुंबई उच्च न्यायालयातील न्यायालयीन कर्मचाऱ्यांना सुधारित वेतनवाढीचा लाभ दिला आहे. मात्र उच्च न्यायालया व्यतिरिक्त…

Read Full News

Vijay Wadettiwar Warning to Maharashtra Govt Over Beed Scam

“महाराष्ट्रातील 18 जिल्ह्यांमध्ये यंदा सरासरी 37 टक्क्यांपर्यंत पाऊस कमी झाला असून दुष्काळाने शेतकरी पूर्णपणे उद्ध्वस्त झाला आहे. मात्र, या भीषण संकटातही शेतकऱ्यांच्या तोंडचा घास पळवणारे भ्रष्ट लांडगे सत्तेच्या वळचणीला बसून तिजोरी लुटायला टपले आहेत. . नागपूर येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना विजय वडेट्टीवार यांनी बीडमधील कथित 80 कोटींच्या पशुधन घोटाळ्याचा पर्दाफाश केला, दुष्काळी मदतीच्या 5…

Read Full News

रणबीर कपूरने कन्नडमध्ये संवाद साधला, त्यानंतर मागितली माफी:अभिनेता यशला 'बॉस' म्हटले; 'जय श्री राम' म्हणत भाषणाची सुरुवात केली

बंगळुरूमध्ये नितेश तिवारी यांच्या दिग्दर्शनाखाली बनत असलेल्या ‘रामायण’च्या दुसऱ्या ट्रेलरचा लॉन्च इव्हेंट आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमात रणबीर कपूरने ‘जय श्री राम’च्या घोषणेने आपल्या भाषणाची सुरुवात केली आणि कन्नड भाषेत बोलून तेथे उपस्थित लोकांचा सन्मान केला. यावेळी रणबीरने दक्षिणात्य सुपरस्टार यशला ‘यश बॉस’ असे संबोधले. या इव्हेंटमध्ये रणबीर कपूर, यश, साई पल्लवी, रवि दुबे, रकुल…

Read Full News

पेट्रोलवरील निर्यात शुल्क 5 पट वाढून ₹2.50 झाले:डिझेलवरील करात ₹7.50 ने कपात; देशातील इंधनाची कमतरता रोखण्यासाठी निर्णय

कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये सुरू असलेल्या चढ-उताराच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने पेट्रोलच्या निर्यातीवरील करात 5 पट वाढ केली आहे. तर डिझेलच्या निर्यातीवर आकारला जाणारा शुल्क जवळपास निम्मा केला आहे. देशात इंधनाची कमतरता भासू नये, यासाठी वित्त मंत्रालयाने नवीन दर आज म्हणजेच 16 ऑक्टोबरपासून लागू केले आहेत. सामान्य जनतेच्या खिशावर कोणताही परिणाम होणार नाही नवीन कर पुढील दोन…

Read Full News

मतदार यादीत नाव नोंदणीसाठी पुणे जिल्ह्यात विशेष मोहीम:पुणे जिल्ह्यात 21 मतदार नोंदणी अधिकारी, 647 सहायक अधिकारी व 8,424 बीएलओ असतील कार्यरत

पुणे जिल्ह्यातील एकाही पात्र मतदाराचे नाव मतदार यादीत समाविष्ट होण्यापासून वंचित राहू नये, यासाठी पुणे जिल्ह्यात विशेष मतदार नोंदणी मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेअंतर्गत 17, 18 तसेच 24 आणि 25 ऑक्टोबर 2026 रोजी जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्रांवर विशेष शिबिरे आयोजित करण्यात येणार आहेत. नागरिकांनी या शिबिरांमध्ये सहभागी होऊन प्रारूप मतदार यादीतील आपले नाव व…

Read Full News

बनावट कुराश प्रमाणपत्रांमुळे पुण्यातील 19 पोलिसांची नोकरी जाणार:खेळाडू आरक्षणाचा गैरवापर केल्याने पोलिस आयुक्तांचा निर्णय; 4 जणांना अटक

कुराश खेळाच्या बनावट प्रमाणपत्रांच्या आधारे खेळाडू आरक्षणातून पुणे शहर पोलिस दलात भरती झालेल्या 19 जणांना कायमचे सेवेतून काढून टाकण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी ही माहिती दिली. यापैकी नव्याने लागलेल्या दहा जणांना सेवेत रुजू करून घेण्यात आले नव्हते, तर नऊ जणांना विविध प्रशिक्षण केंद्रांत पाठविण्यात आले होते. त्यांनाही परत बोलावून घेण्याचे…

Read Full News

संरक्षण मंत्रालयाच्या कंपनीतील लाचखोरी प्रकरणी तिघे अटकेत:कार्यकारी संचालकासह भावाला अटक, अंगडियांच्या सहभागाची सीबीआयला शंका

कोट्यवधी रुपयांच्या लाचखोरी प्रकरणात संरक्षण मंत्रालयाच्या अखत्यारीतील ‘म्युनिशन्स इंडिया लिमिटेड’ या सार्वजनिक संरक्षण उत्पादन कंपनीचा पुण्यातील कार्यकारी संचालक अनिलकुमार बी. आर., त्याचा भाऊ हर्षवर्धन बी. आर. आणि कथित लाच देणारा व्यावसायिक आशिष कन्सल यांना विशेष ‘सीबीआय’ न्यायालयाने 19 ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. या गुन्ह्यात अन्य सरकारी कर्मचारी आणि सहआरोपी अंगडियाच्या भूमिकांचीही चौकशी केली जाणार आहे,…

Read Full News

माफीवीर राहुल गांधींनंतर आता संजय राऊतही माफीवीर:पालघर साधू हत्या आणि पत्राचाळ प्रकरणी राऊतांनी सुप्रीम कोर्टात न्याय मागावा- नवनाथ बन

माफीवीर राहुल गांधी यांच्यापाठोपाठ आता संजय राऊत हेदेखील माफीवीर झाले आहेत. त्यांनी सर्वोच्च न्यायालयाची नाक घासून माफी मागितली आहे. परंतु, केवळ सर्वोच्च न्यायालयाची माफी मागून भागणार नाही, तर त्यांना देशातील 140 कोटी जनतेचीही माफी मागावी लागेल. कारण रोज सकाळी उठून खोटे बोलणे आणि जनतेची दिशाभूल करणे हाच त्यांचा धंदा झाला आहे. माफी मागण्याची राहुल गांधींची…

Read Full News

फोटोग्राफी प्रेमींसाठी सुवर्णसंधी!:कर्णपुरा यात्रेत फोटोवॉक स्पर्धा, क्रांती चौकात प्रदर्शन; औरंगाबाद फोटोग्राफर्स असोसिएशनचा उपक्रम

कर्णपुरा यात्रेतील रंग, परंपरा, श्रद्धा आणि जनजीवन टिपण्याची संधी छायाचित्रकारांना उपलब्ध करून देण्यासाठी ‘औरंगाबाद फोटोग्राफर्स असोसिएशन’ व ‘कलर्स ऑफ संभाजीनगर’ यांच्या संयुक्त विद्यमाने फोटोवॉकचे आयोजन करण्यात आले आहे. छायाचित्रकारांना एकत्र आणणे, त्यांच्या सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे आणि यात्रेचे सुंदर दस्तऐवजीकरण करणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. औरंगाबाद फोटोग्राफर्स असोसिएशनतर्फे फोटोवॉकचा तपशील: विषय: पोर्ट्रेट, हॅपिनेस आणि…

Read Full News

हॉटेलमधून पडून प्रेयसीचा मृत्यू, प्रियकराचे आत्मसमर्पण:आईने सांगितले होते- मुलीने लग्नास नकार दिल्याने धक्का देऊन हत्या केली

लखनऊमधील समरीन हत्याकांडातील फरार प्रियकराने आत्मसमर्पण केले आहे. आरोपी अवनीश जायसवाल उर्फ देव गुरुवारी संध्याकाळी आपल्या वकिलासोबत एसीजेएम न्यायालयात पोहोचला. तेथे कायदेशीर प्रक्रियेनुसार त्याला ताब्यात घेण्यात आले. एडीसीपी साऊथ रल्लापल्ली वसंत कुमार यांनी सांगितले की, आरोपीला पोलिस कोठडीत घेण्यासाठी लवकरच न्यायालयात अर्ज दाखल केला जाईल. कोठडी मिळाल्यानंतर पोलिस त्याची चौकशी सुरू करतील आणि लवकरात लवकर…

Read Full News