Headlines

रेवाडीमध्ये बसने स्कूटरस्वार महिलेला चिरडले:दुसरी महिला थोडक्यात बचावली, दोघी बँकेत जात होत्या

हरियाणातील रेवाडी येथे सोमवारी भरधाव बसने स्कूटरवरून जाणाऱ्या दोन महिलांना धडक दिली. धडक लागताच स्कूटरच्या मागे बसलेली महिला रस्त्यावर पडली. त्याच वेळी बस तिच्या अंगावरून गेली, तर तिची जाऊ थोडक्यात बचावली. अपघातानंतर घटनास्थळी गोंधळ उडाला. लोकांनी कसेबसे महिलेला बसखालून बाहेर काढले; मात्र तोपर्यंत तिचा मृत्यू झाला होता. दरम्यान, अपघातानंतर आरोपी चालक बस रस्त्याच्या मधोमध सोडून…

Read Full News

जीसीसी केंद्रे पर्यायी न राहता मुख्यालय बनतील:जीसीसी सेटअपचे सल्लागार नितीन देशपांडे यांचे ‘द अल्ट एचक्यू’ पुस्तक प्रकाशनप्रसंगी प्रतिपादन

ग्लोबल कपॅबिलिटी सेंटर्सची (जीसीसी) भारत ही जागतिक राजधानी झाली आहे. २०३० पर्यंत हे चित्र बदलेल. इथली केंद्रे ही पर्यायी न राहता मुख्यालय बनतील, असे प्रतिपादन जीसीसी सेटअपचे धोरणात्मक सल्लागार आणि आयटीतज्ज्ञ नितीन देशपांडे यांनी येथे केले. माहिती- तंत्रज्ञान तसेच जीसीसी क्षेत्रातील अनुभवी व तज्ज्ञ निलेश बिनिवाले आणि निलेश कुलकर्णी लिखित ‘द अल्ट एचक्यू – जीसीसी…

Read Full News

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात मोठा खुलासा:हत्येपूर्वीच्या गुप्त बैठकीचे CCTV फुटेज पोलिसांच्या हाती, सुपारीसाठी मोठी रक्कम दिल्याचा संशय

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणाचा तपास जसजसा पुढे जात आहे, तसतसे या गुन्ह्यामागील नियोजनाचे धागेदोरे समोर येत आहेत. पूर्णेकर यांची हत्या करण्यापूर्वी आरोपींनी गुप्त बैठक घेतल्याची माहिती तपासातून पुढे आली असून, या बैठकीचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती लागले आहे. त्यामुळे हत्येचा कट नेमका कुठे आणि कसा रचण्यात आला, त्यामध्ये कोणाचा सहभाग होता आणि आरोपींना या गुन्ह्यासाठी…

Read Full News

Maharashtra Census 2027 Preparation: Rajesh Agarwal Issues Directives

जनगणना-2027 च्या दुसऱ्या टप्प्यातील लोकसंख्या गणनेचे काम प्रभावीपणे आणि निर्धारित वेळापत्रकानुसार पूर्ण करण्यासाठी राज्यातील सर्व प्रशासकीय विभागांनी समन्वयाने काम करावे. या टप्प्यातील प्रत्येक कामाचे सूक्ष्म नियोजन करून त्याची वेळेत अंमलबजावणी करावी . मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय जनगणना समन्वय समितीची दुसरी बैठक पार पडली. या बैठकीत जनगणना-2027 च्या पहिल्या टप्प्यातील कामाचा आढावा घेण्यात…

Read Full News

‘विवेक भीमनवार यांचा राजीनामा झालाच नाही’:‘पेपरफुटी झाली तर नुकसानाला जबाबदार कोण?'- सुषमा अंधारे

एमपीएससी पेपरफुटी प्रकरणी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष विवेक भीमनवार यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. गेल्या 11 दिवसांपासून राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वात पुण्यातील विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू होते. या आंदोलनाला यश आले असून सरकारने विद्यार्थ्यांच्या सगळ्या मागण्या मान्य केल्या आहेत. तसेच पेपरफुटी प्रकरणी चौकशी पूर्ण होईपर्यंत आयोगाचे अध्यक्ष विवेक भीमनवार…

Read Full News

Delhi HC Relief to Kangana Ranaut on Personality Rights; AI Deepfake Order

6 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक बॉलिवूड अभिनेत्री आणि भाजपा खासदार कंगना रणौत यांना दिल्ली उच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. न्यायालयाने त्यांच्या ओळखीचा गैरवापर करणारे एआयच्या मदतीने तयार केलेले डीपफेक व्हिडिओ, बनावट भाषणे, एडिट केलेली छायाचित्रे आणि इतर आक्षेपार्ह कंटेंटविरोधात अंतरिम संरक्षण दिले आहे. न्यायालयाने मेटाला आदेश दिला आहे की, अशा कंटेंटची माहिती मिळाल्यानंतर आणि आदेशाची…

Read Full News

आनंद दुबे यांचा शिवसेना उबाठाला जय महाराष्ट्र!:म्हणाले- शर्जील इमाम, उमर खालिद अन् ध्रुव राठी माझे नेते होऊ शकत नाहीत; ज्या डब्यात कॉकरोच शिरले तो डबा सोडला!

सध्या विविध आंदोलनांनी राजकारण ढवळून निघालेले असताना शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाला मुंबईत मोठा धक्का बसला आहे. पक्षाचे प्रमुख प्रवक्ते आणि आक्रमक उत्तर भारतीय चेहरा म्हणून ओळखले जाणारे नेते आनंद दुबे यांनी पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वासह सर्व पदांचा तडकाफडकी राजीनामा दिला आहे. “गेल्या अनेक वर्षांपासून ज्या पक्षासाठी तन-मन-धनाने काम केले, तिथे आता डास, माश्या, पाली आणि…

Read Full News

डॉ. नीलम गोऱ्हे, ॲड. प्रमोद आडकर यांना क्रांतिज्योती स्मृती पुरस्कार:डॉ. श्रीपाल सबनीस म्हणाले- लोककल्याणाची वारी पुढे नेण्यासाठी अनुयायांनी एकत्र यावे

परिवर्तनाच्या चळवळीत महा त्मा ज्योतिराव फुले, महर्षी विठ्ठल रामजी शिंदे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य मोलाचे आहे. या महापुरुषांच्या लोककल्याणाची वारी पुढे नेण्यासाठी त्यांच्या अनुयायांनी एकत्र आले पाहिजे, अशी अपेक्षा ज्येष्ठ विचारवंत, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी व्यक्त केली. फुले-शाहू-आंबेडकर विचारमंचतर्फे क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या द्विशताब्दी जयंती व…

Read Full News

सासरच्या त्रासाला कंटाळून तरुणाची आत्महत्या:नोटमध्ये लिहिले- घरच्यांकडे पैसे मागत आहेत, ६ महिन्यांपूर्वी लग्न, २ दिवसांतच पत्नी सोडून गेली

राजस्थानच्या जयपूरमध्ये सासरच्या मंडळींना कंटाळलेल्या तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली. कुटुंबीय संध्याकाळी त्याला बोलवायला गेले असता खोली आतून बंद होती. दरवाजाच्या काचेतून आत पाहिले असता तरुण गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसला. कुटुंबीयांनी त्याला खाली उतरवून डॉक्टरांना बोलावले. त्यानंतर त्याला एसएमएस रुग्णालयात नेले, तेथे डॉक्टरांनी तरुणाला मृत घोषित केले. तरुण देवेंद्र शर्मा (३०) याच्या खोलीतून सुसाइड नोट…

Read Full News

नागपुरातील रॉयल मेंशन हॉटेलमध्ये देहव्यापाराचा पर्दाफाश:हॉटेल मालकीण अटकेत, मध्य प्रदेशातील युवतींची सुटका

नागपूर शहरातील हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या रॉयल मेंशन हॉटेलमध्ये सुरू असलेल्या कथित देहव्यापाराच्या प्रकाराचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी हॉटेलवर छापा टाकून मध्य प्रदेशातील ग्रामीण भागातून आलेल्या युवतींची सुटका केली. तसेच या प्रकरणात हॉटेलची मालकीण समीना वसीम खान हिला अटक करण्यात आली आहे. या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली असून, या प्रकारामागे आणखी…

Read Full News