Headlines

मुंबा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात 'हलगी' आणि 'मलावाझी'ने मारली बाजी:लघुपट निर्मितीसाठी आशादायी चित्र; एफटीआयआयचे कुलगुरू धीरजसिंह उपस्थित

लघुपट निर्मितीचा एकूणच वेग मंदावल्याचे चित्र असताना, या महोत्सवाला मिळालेला उत्साही प्रतिसाद उमेद वाढविणारा आहे आणि लघुपट निर्मितीसाठी आशादायी चित्र यामुळे निर्माण होईल, असे प्रतिपादन फिल्म ॲण्ड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूटचे कुलगुरू धीरज सिंह यांनी व्यक्त केले. मुंबा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या समारोप आणि पुरस्कार वितरण सोहळ्यात ते प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. याप्रसंगी महोत्सवाचे आयोजक जय भोसले,…

Read Full News

तालचक्र युवा महोत्सवात कथक, सरोद, तबला, गजलचे सादरीकरण:युवा कलाकारांनी रसिकांची मने जिंकली; दोन दिवसीय महोत्सवाला चांगला प्रतिसाद

युवा कलावंतांना व्यासपीठ उपलब्ध करून देणाऱ्या पद्मश्री पं. विजय घाटे प्रस्तुत तालचक्र युवा महोत्सवाने यंदा पाच वर्षांचा टप्पा पूर्ण केला. या निमित्ताने आयोजित दोन दिवसीय महोत्सवात कथक नृत्य, सरोदवादन, तबलावादन आणि गजलगायन अशा विविध कलाविष्कारांनी रसिकांना सांगीतिक मेजवानी अनुभवायला मिळाली. युवा कलाकारांच्या तयारीच्या आणि दमदार सादरीकरणाने रसिकांची मने जिंकली. शिवाजीनगर येथील बीएमसीसी रस्त्यावरील सारथी सभागृहात…

Read Full News

सौर ऊर्जेच्या प्रसारासाठी 'सौर संवाद 2026' यात्रेचे आयोजन:गोपाल काबरा फाउंडेशन व जीके एनर्जीचा संयुक्त उपक्रम; 14 जिल्ह्यात साधणार संवाद

सौर ऊर्जेबाबत जनजागृती करण्यासह या क्षेत्रातील उद्योजकता आणि रोजगाराच्या संधी ग्रामीण भागापर्यंत पोहोचविण्यासाठी गोपाल काबरा फाउंडेशन आणि जीके एनर्जी लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने ‘सौर संवाद २०२६’ यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. दि. १२ ते १८ ऑक्टोबर २०२६ यादरम्यान होणाऱ्या या यात्रेचा शुभारंभ सोमवारी (दि. १२) सकाळी ९.३० वाजता अहिल्यानगर येथून होणार आहे. महाराष्ट्रातील १४ शहरांमध्ये…

Read Full News

एआय युगात मानवी विवेक आवश्यक:एमआयटी-एडीटी विद्यापीठातील आंतरराष्ट्रीय परिषदेत कुलगुरू प्रा. डॉ. एन. नागराजू यांचे प्रतिपादन

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (एआय) युगात माहिती मिळविणे आणि उत्तरे तयार करणे सोपे झाले असले, तरी सत्य-असत्यातील फरक ओळखणे, चिकित्सक विचार करणे आणि नैतिक निर्णय घेणे यासाठी मानवी विवेकाची आवश्यकता कायम राहणार आहे. त्यामुळे भविष्यातील विद्यापीठांनी तंत्रज्ञानाच्या वापरासोबतच विद्यार्थ्यांमध्ये स्वतंत्र विचारक्षमता, नैतिक जाणीव आणि मानवी मूल्ये विकसित करण्यावर भर द्यावा, असे प्रतिपादन इंग्लिश अँड फॉरेन लँग्वेजेस विद्यापीठाचे…

Read Full News

पुणे शहरात तीन वेगवेगळ्या अपघातांत तिघांचा मृत्यू:शंकरशेठ, मंगळवार पेठ आणि कात्रज-कोंढवा रस्त्यावर घडल्या घटना, गुन्हे दाखल

पुणे शहरात वेगवेगळ्या अपघातांत तिघांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. शंकरशेठ रस्ता, मंगळवार पेठ, तसेच कात्रज-कोंढवा रस्त्यावर अपघाताच्या घटना घडल्या. शंकरशेठ रस्त्यावर डंपरच्या धडकेत दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. या प्रकरणी डंपर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. रिहान मुनीर खान (वय २०, रा. घोरपडे पेठ) असे मृत्युमुखी पडलेल्या दुचाकीस्वार तरुणाचे नाव आहे. याबाबत रिहानचा मावसभाऊ…

Read Full News

सायन रुग्णालयातील निवासी डॉक्टरची वसतिगृहात आत्महत्या:भूल देणाऱ्या औषधाचा ओव्हरडोस घेतल्याचा संशय, खोलीचा दरवाजा बराच वेळ न उघडल्याने घटना उघडकीस

मुंबईतील लोकमान्य टिळक महानगरपालिका सर्वसाधारण रुग्णालय अर्थात सायन रुग्णालयातील एका निवासी डॉक्टरने वसतिगृहातील आपल्या खोलीत आत्महत्या केल्याची घटना शनिवारी संध्याकाळी उघडकीस आली. डॉ. शिवचरण आप्पा पाटील असे मृत डॉक्टरचे नाव आहे. ते रुग्णालयाच्या सर्जरी विभागात पदव्युत्तर पदवीच्या (एमएस) पहिल्या वर्षात शिक्षण घेत होते. या घटनेमुळे रुग्णालय परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. प्राथमिक माहितीनुसार, भूल देण्यासाठी…

Read Full News

CJP च्या आंदोलनावर कंगना रणौत संतापल्या:म्हणाल्या- राष्ट्रद्रोही आणि दहशतवादी शक्तींचा पर्दाफाश होत आहे; देश अस्थिर करण्याचा कट रचला जातोय

अभिनेत्री कंगना रणौत यांनी कॉकरोच जनता पार्टी (CJP)च्या नेतृत्वाला ‘देशद्रोही आणि दहशतवादी शक्ती’ असे संबोधले आहे. मुख्य निवडणूक आयुक्त (CEC) ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यासाठी दिल्लीतील जंतर-मंतरवर CJP च्या आंदोलनानंतर कंगना यांचे हे वक्तव्य समोर आले आहे. शनिवारी दिल्ली पोलिसांनी कठोर कारवाई करत सुमारे ७ हजार लोकांना ताब्यात घेतले. अयोध्येला जाताना लखनौमध्ये कंगना यांनी…

Read Full News

मुख्यमंत्री पंचायतराज अभियानाचा शुभारंभ:नाशिक जिल्हा परिषदेलाही राज्यात प्रथम क्रमांक, दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना निकष बाजूला ठेवून मदत देण्याची मुख्यमंत्र्यांची ग्वाही

गावाच्या विकासासाठी लोकसहभाग, नियोजन आणि प्रभावी अंमलबजावणीच्या बळावर पुरंदर तालुक्यातील आडाचीवाडी ग्रामपंचायतीने राज्यात सर्वोत्तम ग्रामपंचायतीचा पहिला पुरस्कार पटकावला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या ग्रामपंचायतीचा गौरव करण्यात आला. ग्रामविकास व पंचायतराज विभागाच्या वतीने आयोजित कार्यक्रमात राज्यातील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या जिल्हा परिषदा, पंचायत समित्या आणि ग्रामपंचायतींना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. याच कार्यक्रमात नाशिक जिल्हा…

Read Full News

कॉक्रोच जनता पार्टीचे मुंबईत आंदोलन:शिवाजी पार्कला छावणीचे स्वरूप, आंदोलनापूर्वीच पोलिसांकडून कार्यकर्त्यांची धरपकड

कॉक्रोच जनता पार्टीने दिल्लीनंतर आता मुंबईत आंदोलनाची हाक दिली आहे. दिल्लीत आंदोलन करण्यापूर्वी पोलिसांनी हजारो कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले होते. तसेच, पोलिसांनी बळाचा वापर करून कार्यकर्त्यांना आंदोलन करण्यापासून रोखल्याचा आरोप करण्यात आला. त्यानंतर आता पक्षाने मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथे आंदोलन करण्याची घोषणा केली आहे. या घोषणेनंतर शिवाजी पार्क परिसरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात…

Read Full News

परदेशी गुंतवणूकदारांनी ऑक्टोबरमध्ये भारतीय बाजारातून ₹44,166 कोटी काढले:2026 मध्ये निर्गुंतवणूक ₹3 लाख कोटींच्या पुढे; कारण- US बॉन्ड यील्ड आणि कच्च्या तेलाच्या किमती

विदेशी गुंतवणूकदारांकडून भारतीय शेअर बाजारातून पैसे काढण्याचा सिलसिला सुरूच आहे. ऑक्टोबर महिन्यात विदेशी गुंतवणूकदारांनी आतापर्यंत इक्विटी मार्केटमधून ₹44,166 कोटींची गुंतवणूक काढून घेतली आहे. यासह 2026 मध्ये आतापर्यंत FPIs चा एकूण निव्वळ आउटफ्लो वाढून ₹3.04 लाख कोटींपेक्षा जास्त झाला आहे. कच्च्या तेलाच्या वाढलेल्या किमती, मजबूत होत असलेला अमेरिकी डॉलर आणि 10 वर्षांच्या अमेरिकी बाँडच्या यील्डमध्ये झालेली…

Read Full News