Headlines

Rahul Gandhi Seeks Meeting With CJI

नवी दिल्ली5 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक काँग्रेसचे महासचिव के. सी. वेणुगोपाल यांनी रविवारी सांगितले की, मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात नवी दिल्ली येथे विरोधकांकडून मोठे आंदोलन करण्यात येणार आहे. वेणुगोपाल यांनी पत्रकारांशी बोलताना आरोप केला की, कार्यकर्त्यांना दिल्लीत येण्यापासून रोखले जात आहे आणि ते ज्या ठिकाणी थांबले आहेत, तिथे छापे टाकले जात आहेत. दरम्यान,…

Read Full News

SC म्हणाले- शांततापूर्ण आंदोलकांना ताब्यात घेऊ नका:मेट्रो-इंटरनेट सेवा पूर्ववत करा; CJPच्या आंदोलनादरम्यान 45 मेट्रो स्थानके बंद आणि 7000 लोकांना ताब्यात घेतले

दिल्लीमध्ये कॉकरोच जनता पक्षाच्या आंदोलनादरम्यान मेट्रो-ट्रेन सेवा बंद करणे, इंटरनेटमध्ये अडथळा आणणे आणि लोकांना ताब्यात घेण्याशी संबंधित याचिकांवर रविवारी सर्वोच्च न्यायालयाच्या विशेष खंडपीठाने सुनावणी केली. न्यायालयाने म्हटले की, मेट्रो सेवा सुरळीतपणे सुरू राहायला हवी. इंटरनेटमध्ये अडथळा आणला जाऊ नये आणि लोकांची ये-जा रोखली जाऊ नये. याचिकाकर्त्यांनी आरोप केला होता की, 9 ऑक्टोबर रोजी सर्वोच्च न्यायालयाने…

Read Full News

राज्यभर FDA ची धडक कारवाई:13 जणांना अटक, 1.09 कोटींचा मुद्देमाल जप्त; मुंबईतील 10 अन्न आस्थापनांचे परवाने निलंबित

अन्नसुरक्षेच्या दृष्टीने अन्न व औषध प्रशासनाने (FDA) प्रतिबंधित अन्नपदार्थांची विक्री, साठवणूक आणि वाहतूक रोखण्यासाठी राज्यभर विशेष मोहीम राबवली आहे. या मोहिमेअंतर्गत राज्यात आतापर्यंत 12 गुन्हे दाखल करण्यात आले असून, 13 जणांना अटक करण्यात आली आहे. या कारवाईत प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे 79.29 लाख रुपयांचा साठा आणि तीन वाहने जप्त करण्यात आली आहेत. एकूण जप्त केलेल्या मुद्देमालाची…

Read Full News

मित्रांसोबत राजगड किल्ला चढताना 35 वर्षीय तरुणाचा दुर्दैवी अंत:पर्यटकांनी सीपीआर देण्याचा प्रयत्न केला, मात्र जीव वाचवण्यात अपयश

पुणे जिल्ह्यातील ऐतिहासिक राजगड किल्ल्यावर पर्यटनासाठी आलेल्या 35 वर्षीय पर्यटकाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. शनिवारी (10 ऑक्टोबर) दुपारी दोनच्या सुमारास ही घटना घडली. जिज्ञेश सदाशिव खंडाळकर असे मृत पर्यटकाचे नाव असून, ते मूळचे छत्रपती संभाजीनगर येथील रहिवासी होते. सध्या ते पुण्यातील हडपसर परिसरातील भेकराईनगर येथे वास्तव्यास होते. मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील तीन मित्र…

Read Full News

'आज संध्याकाळपर्यंत निर्णय घ्या, अन्यथा..':रोहित पवारांचा सरकारला अल्टिमेटम; MPSC आंदोलनाचा 11 वा दिवस

पुण्यातील एस. एम. जोशी पुलावर सुरू असलेल्या एमपीएससी आंदोलनाचा आज अकरावा दिवस आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन सुरू आहे. आज माध्यमांशी बोलताना रोहित पवार यांनी एमपीएससीचे अध्यक्ष भीमनवार यांच्यावर टीका केली. भीमनवार जे आहेत, एमपीएससीचे अध्यक्ष, ते मुख्यमंत्री साहेबांचे जीवलग मित्र आहेत. ते विद्यार्थ्यांऐवजी मित्राची जास्त काळजी…

Read Full News

दुष्काळात फी वसूल करणाऱ्या शाळांनी खोडसाळपणा करू नये:मंत्री शिवेंद्रराजे भोसलेंचा इशारा; दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क माफ

दुष्काळात सरकारने फीस माफीचा जीआर काढला आहे, त्यामुळे फी वसूल करून शाळांनी खोडसाळपणा करू नये, असा इशारा सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी दिला आहे. राज्यातील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय पथकाकडूनही पाहणी करण्यात आली आहे. आता लवकरात लवकर मदत जाहीर केली जाईल. आज केंद्रीय दुष्काळ पाहणी पथक मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार आहे. नुकसान मोठे असल्याने पंचनामे…

Read Full News

PM मोदींनी विजय यांच्यासह मेट्रोने केला प्रवास:चेन्नईत मेट्रोच्या फेज-2 चे उद्घाटन; विधानसभा निवडणुकांनंतर तामिळनाडूचा पहिला दौरा

पंतप्रधान मोदी आज चेन्नई दौऱ्यावर आहेत. त्यांनी चेन्नई मेट्रोच्या फेज-२ प्रकल्पातील १४.६ किमी लांबीच्या पूनमल्ली-वडापालानी मार्गाचे उद्घाटन केले. यानंतर पंतप्रधानांनी स्वतः ट्रेनने प्रवास केला. यावेळी तमिळनाडूचे मुख्यमंत्री विजयही त्यांच्यासोबत उपस्थित होते. त्यानंतर मोदी या मार्गावर पूनमल्ली ते पोरूरपर्यंत ट्रेनने प्रवास करणार आहेत. दौऱ्यापूर्वी अनेक भागांत ड्रोन उडवण्यावर बंदी घालण्यात आली आहे. ग्रेटर चेन्नई पोलिसांनी मीनंबक्कम,…

Read Full News

अंबानी कुटुंबाच्या कार्यक्रमात पोहोचला रणवीर सिंह:आमिर खान पत्नी गौरीसोबत दिसले, कृती सेनन-गौरी खानही पोहोचल्या

मुंबईत शनिवारी संध्याकाळी अंबानी कुटुंबाने नवरात्रीपूर्वी ‘देवी शक्ती’ उत्सवाचे आयोजन केले. स्वदेश इरॉसला एक वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यात रणवीर सिंह, कृती सॅनन, आमिर खान यांच्यासह अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी सहभाग घेतला. स्वदेश इरॉस हे रिलायन्स रिटेलचे एक प्रमुख लक्झरी स्टोअर आहे. भारताचा समृद्ध सांस्कृतिक वारसा, पारंपरिक कला, हस्तकला आणि…

Read Full News

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना केंद्राकडून मदतीची आशा; वर्षा बंगल्यावर बैठक पार:राज्याच्या दुष्काळी अहवालावर सकारात्मक प्रतिसाद- कृषिमंत्री दत्तात्रय भरणे

महाराष्ट्रात सध्या सर्वत्र दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली असून शेतकऱ्यांवर मोठे संकट ओढवले आहे. शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान तर झाले आहेच पण तोंडाशी आलेला घासही या दुष्काळाने हिरावला आहे. राज्य सरकारने महाराष्ट्रात दुष्काळ जाहीर केला असून पंचनामे देखील सुरू केले आहेत. याच पार्श्वभूमीवर केंद्रीय पथकाने देखील राज्यात अनेक ठिकाणी पाहणी केली. या पाहणी दौऱ्यानंतर आज…

Read Full News

पिंपरी-चिंचवडमध्ये धावत्या रुग्णवाहिकेतून रुग्ण स्ट्रेचरसह रस्त्यावर पडला:निगडीतील घटनेचा व्हिडिओ व्हायरल; नागरिकांनी पाठलाग करून वाहनाला रोखले

पिंपरी-चिंचवडमध्ये रुग्णवाहिकेतून रुग्ण थेट रस्त्यावर पडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. रुग्णाला रुग्णालयात घेऊन जाणारी रुग्णवाहिका रस्त्यावरून जात असताना अचानक मागील दरवाजा उघडला आणि रुग्ण स्ट्रेचरसह खाली पडला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, ही घटना निगडी परिसरात घडल्याचे सांगितले जात आहे. समोर आलेल्या व्हिडिओनुसार, रुग्णवाहिका भररस्त्यातून जात असताना तिचा मागील दरवाजा अचानक…

Read Full News