दहा दिवस उपक्रम; विराहितच्या तुळजाभवानी मंदिरात नवरात्रोत्सव:18 ऑक्टोबरला संगीतमय सुंदरकांड, 20 ला काल्याचे कीर्तन
मूर्तिजापूरपासून सुमारे १६ किलोमीटर अंतरावर, अकोला-वाशीम जिल्ह्यांच्या सीमेलगत असलेल्या विराहित येथे रविवार, ११ ऑक्टोबरपासून श्री तुळजाभवानी संस्थानचा नवरात्र महोत्सव सुरू होत आहे. घटस्थापना, देवी भागवत ज्ञानयज्ञ, काकडा, हरिपाठ, कीर्तन, ग्रामस्वच्छता असे उपक्रम दहा दिवस मंदिर परिसरात होतील. धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल राहणार आहे. यंदाच्या महोत्सवातील विशेष आकर्षण म्हणजे १८ ऑक्टोबरला होणारा संगीतमय सुंदरकांड पाठ. २० ऑक्टोबरला…