Headlines

हातभट्टीची दारू विकणारा सराईत गुंड अतुल खंडाळे स्थानबद्ध:अमरावती ग्रामीण पोलिसांनी MPDA कायद्यांतर्गत वर्षभरासाठी केली कारवाई

अमरावती ग्रामीण पोलिसांनी अवैध गावठी दारू विकणाऱ्या अतुल बाबाराव खंडाळे (वय ३९, रा. लोणी, ता. वरुड) याला वर्षभरासाठी स्थानबद्ध केले आहे. तो परिसरात दहशतही पसरवत होता. महाराष्ट्र धोकादायक व्यक्तींच्या घातक कृत्यांना प्रतिबंध करण्याबाबतच्या (एमपीडीए) अधिनियमान्वये ही कारवाई झाली. पोलीस अधीक्षक निकेतन कदम यांच्या निर्देशानुसार, बेनोडा पोलिसांनी खंडाळेविरुद्ध एमपीडीए कायद्यांतर्गत स्थानबद्धतेचा प्रस्ताव तयार केला. जिल्हाधिकारी आशिष…

Read Full News

दुष्काळामुळे बांधकाम क्षेत्राला फटका, स्थलांतर वाढण्याची शक्यता:मँत्रा समूहाचा प्रकल्प वेळेत पूर्ण करण्यावर भर; रणबीर कपूर ब्रँड प्रतिनिधी

राज्यातील यंदाच्या दुष्काळी परिस्थितीचा परिणाम बांधकाम क्षेत्रावरही होण्याची शक्यता आहे. पाणी ही शहरी तसेच ग्रामीण भागातील जीवनावश्यक गरज असल्याने त्याचा तुटवडा निर्माण झाल्यास त्याचे परिणाम सर्वच क्षेत्रांवर दिसून येतील. त्यातून आगामी काळात शहरांकडे होणारे स्थलांतरही वाढू शकते, असे मत मँत्रा समूहाचे व्यवस्थापकीय संचालक रोहित गुप्ता यांनी व्यक्त केले. पुण्यात २००७ मध्ये सुरू झालेल्या मँत्रा समूहाने…

Read Full News

नागपुरात एका दिवसात 2,080 बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई:7.91 लाख रुपयांचा दंड वसूल; विनाहेल्मेटची 1,156 प्रकरणे, पोलिसांची मोहीम

नागपूर शहर वाहतूक पोलिसांनी एका दिवसात २,०८० बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई केली. या कारवाईतून ७ लाख ९१ हजार २०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. वाहतूक शिस्तीसाठी ही विशेष मोहीम राबवली. या कारवाईत सर्वाधिक १,१५६ जणांवर विनाहेल्मेट वाहन चालवल्याबद्दल दंड आकारला. चुकीच्या ठिकाणी पार्किंग करणाऱ्या ३२८ वाहनचालकांवरही कारवाई झाली. परवाना नसलेले आणि अवैध प्रवासी वाहतूक करणारे प्रत्येकी…

Read Full News

छत्रपती संभाजीनगर पंचायत समितीत शिवसेनेचे भुमरे-शिरसाट गट भिडले:शिवसेनेचा सभापती असतानाही विरोधी पक्षनेते पदावरून जोरदार वाद

छत्रपती संभाजीनगर पंचायत समितीच्या मासिक सभेत शिवसेनेच्या दोन गटांमध्ये विरोधी पक्षनेते पदावरून वाद झाला. उबाठाचे सदस्य दत्तात्रय वर्पे आणि शिवसेना खासदार भुमरे गटाचे अनुराग शिंदे यांनी हे पद व केबिनची मागणी केली. सभापती कल्याण गायकवाड यांनी सत्ताधारी गटात असताना विरोधी पद कसे देणार, असा प्रश्न केला. शिंदे यांनी पालकमंत्री गटाच्या उपसभापतींना मानत नसल्याचे सांगितले. यावर…

Read Full News

अमरावतीत घरगुती गॅस सिलींडरमधून गॅस चोरीवर छापा:महाजनपुऱ्यातून दोन 25 वर्षीय तरुण ताब्यात, 9.54 लाखांचा मुद्देमाल जप्त.

अमरावती शहर गुन्हे शाखेने घरगुती एलपीजी गॅस सिलींडरमधून गॅस काढून चोरी करणाऱ्या दोन २५ वर्षीय तरुणांना ताब्यात घेतले आहे. महाजनपुरा, माताखिडकी परिसरात हा गोरखधंदा सुरू होता. पोलिसांनी बुधवारी, ७ ऑक्टोबर रोजी ही कारवाई केली. गुन्हे शाखेचे अधिकारी अवैध धंद्यांची तपासणी करत असताना त्यांना गोपनीय माहिती मिळाली. या माहितीनुसार, काही जण ग्राहकांना विकल्या जाणाऱ्या सिलींडरमधून १…

Read Full News

तीन हजार कोटींच्या ड्रग्ज प्रकरणात दोन आरोपींना जामीन:लंडनला कुरिअरने मेफेड्रॉन पाठविल्याचा आरोप; उच्च न्यायालयाने मुदतवाढ बेकायदेशीर ठरवली

राज्यातील मोठ्या अंमली पदार्थ प्रकरणात आरोपी असलेल्या संदीप यादव आणि देवेंद्र यादव (दोघेही, दिल्ली) यांना मुंबई उच्च न्यायालयाने ५ ऑक्टोबर रोजी जामीन मंजूर केला. या प्रकरणात तब्बल १,८३७.८४ किलो मेफेड्रॉन जप्त करण्यात आले असून, त्याची त्यावेळची अंदाजे किंमत तीन हजार कोटी रुपये असल्याचे तपास यंत्रणांचे म्हणणे आहे. दोघांवर हा ड्रग्जचा साठा लंडनला पाठविण्याच्या कटात सहभागी…

Read Full News

अमरावती जिल्हा परिषदेत 12 रुग्णवाहिका विना नंबर:मेळघाटातील रुग्णांसाठी आलेल्या रुग्णवाहिका आठवडाभर यार्डात पडून

अमरावती जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागात १२ रुग्णवाहिका विना नंबर आल्या. मेळघाटातील धारणी आणि चिखलदरा तालुक्यांसाठी जिल्हा नियोजन समितीने (डीपीसी) निधी दिला. या रुग्णवाहिका आठवडाभरापासून यार्डात धूळ खात आहेत. जुन्या, कालबाह्य रुग्णवाहिकाही तिथे उभ्या असल्याने मेळघाटात सध्या एकही रुग्णवाहिका उपलब्ध नाही. नव्यांना नंबर न मिळाल्याने त्या पोहोचल्या नाहीत. नियमानुसार, वाहनांना शोरूममधून बाहेर पडण्यापूर्वीच नंबर मिळणे आवश्यक…

Read Full News

अल निनोचा इशारा मिळूनही सरकारने उपाययोजना केल्या नाहीत:हेक्टरी 1 लाख रुपये मदत व संपूर्ण कर्जमाफी द्या, अन्यथा रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करू : विजय वडेट्टीवार

राज्यातील दुष्काळी परिस्थितीवरून काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे. अल निनोच्या प्रभावामुळे यंदा पाऊस कमी पडण्याची शक्यता फेब्रुवारी-मार्चमध्येच स्पष्ट झाली होती. त्यावेळी सरकारला आवश्यक उपाययोजना करता आल्या असत्या; मात्र सरकारने त्याकडे गांभीर्याने पाहिले नाही आणि आज शेतकऱ्यांना त्याचे परिणाम भोगावे लागत आहेत, असा आरोप वडेट्टीवार यांनी केला. हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव…

Read Full News

FDAचा मोठा प्रहार! दुधात डिटर्जंट अन् घातक रसायनांची भेसळ:पुणे-सोलापूरपर्यंत संघटित साखळी उघड, 37 आरोपी निष्पन्न; 25 जणांना अटक

महाराष्ट्रात दूध आणि दुग्धजन्य पदार्थांमधील भेसळ रोखण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाने सुरू केलेल्या विशेष मोहिमेत दूध भेसळीची संघटित साखळी उघडकीस आली आहे. पुणे जिल्ह्यातील मंचर परिसरातून सुरू झालेल्या तपासात दूध भेसळीसाठी स्किम्ड मिल्क पावडर, व्हे पावडर, व्हे परमिएट पावडर, खाद्यतेल, मिश्रक आणि डिटर्जंट यांसारख्या पदार्थांचा वापर होत असल्याचे समोर आले आहे. तपासादरम्यान काही दूध नमुन्यांमध्ये…

Read Full News

'रामायण' चित्रपटाच्या निर्मात्यांवर आयकर विभागाच्या छाप्याचे वृत्त:नमित मल्होत्रांच्या प्राइम फोकसच्या मुंबईतील कार्यालयांत झडती; परदेशी व्यवहारांशी संबंधित प्रकरण

चित्रपट ‘रामायण’चे निर्माते नमित मल्होत्रा यांच्या ‘प्राइम फोकस लिमिटेड’ कंपनीच्या मुंबईतील कार्यालयांवर छापेमारी झाल्याचे वृत्त आहे. CNBC-TV18 च्या वृत्तानुसार, प्राप्तिकर विभागाने ही कारवाई परदेशी व्यवहारांमध्ये (फॉरेन रेमिटन्स) झालेल्या अनियमिततेच्या संदर्भात केली आहे. नितेश तिवारी यांच्या दिग्दर्शनाखाली तयार होत असलेल्या बिग बजेट चित्रपट ‘रामायण’च्या प्रदर्शनाला काही आठवडे बाकी असताना ही कारवाई समोर आली आहे. प्रकरण परदेशी…

Read Full News