इंडिगो फ्लाइटवर वीज कोसळली, लखनऊमध्ये आपत्कालीन लँडिंग:विमानाचा पुढील भाग खराब; पाटणाहून लखनऊला जात होते विमान
पाटणाहून लखनऊला येत असलेले इंडिगोचे एक विमान बुधवारी संध्याकाळी खराब हवामानादरम्यान आकाशातील विजेच्या कडकडाटाच्या तडाख्यात सापडले. त्यामुळे विमानाचा पुढील भाग म्हणजेच नोज खराब झाला आहे. विमान विजेच्या तडाख्यात सापडले, तेव्हा ते सुमारे 17 हजार फूट उंचीवर होते. मात्र, वैमानिकाने प्रसंगावधान राखत विमानाचे लखनऊ विमानतळावर सुरक्षित लँडिंग केले. विमानात 150 प्रवासी होते आणि सर्वजण सुरक्षित आहेत….